दाट, काळेभोर आणि चमकदार केस कोणाला आवडत नाहीत? केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी, पांढरे केस लपवण्यासाठी आणि केसांना पोषण मिळवण्यासाठी अनेकजणी मेहेंदीचा वापर करतात. आजही आपल्यापैकी कित्येकजणी केसांसाठी केमिकल रंगांऐवजी मेहेंदी लावण्यालाच पसंती देतात. मात्र, अनेकजणींची एकच तक्रार असते की, मेहेंदी लावल्यानंतर दोन-तीन धुण्यांतच तिचा रंग फिका पडू लागतो. केसांना मेहेंदी लावून तासंतास बसणे ही मोठी कसरत असते, पण जर पहिल्याच वॉशमध्ये रंग निघाला तर सगळ्या मेहेनतीवर पाणी फेरल्यासारखेच होते(mehendi soaking tips for dark color).
मेहेंदीचा तो गडद विटकरी किंवा लालसर रंग केसांवर टिकवून ठेवण्यासाठी केवळ मेहेंदीच उत्तम दर्जाची असून चालत नाही, तर ती योग्य पद्धतीने भिजवणे आणि ॲक्टिव्हेट करणे गरजेचे असते. आपल्या स्वयंपाकघरातील असे काही पदार्थ आहेत, जे मेहेंदी भिजवताना घातल्यास मेहेंदीचा रंग नैसर्गिक डायसारखा पक्का होतो. मेहेंदी भिजवताना त्यात काही साधे पण गुणकारी घटक मिसळले, तर तिचा रंग केवळ गडदच होत नाही तर तो दीर्घकाळ टिकूनही राहतो. केसांना कोळशासारखे (how to prepare mehendi for hair color) काळे किंवा दाट गडद रंग मिळवून देण्यासाठी मेहेंदी भिजवताना (how to soak mehendi for hair) नेमके कोणते 'सिक्रेट' पदार्थ घालावेत ते पाहूयात...
मेहेंदी भिजवताना त्यात घाला घरातील 'हे' सिक्रेट पदार्थ...
प्रत्यक्षात, मेहेंदीचा रंग किती गडद होईल आणि किती काळ टिकेल हे ती भिजवताना वापरलेल्या घटकांवर अवलंबून असतं. योग्य घटक पदार्थ योग्य प्रमाणात घातले, तर मेहेंदीचा रंग अधिक गडद, चमकदार आणि दीर्घकाळ टिकणारा होऊ शकतो. मेहेंदी भिजवताना, ग्लासभर पाणी, १ कप कडीपत्त्याची पाने, १ कप कडुलिंबाची पाने, २ टेबलस्पून तांदूळ, १ कप कोरफडीचा गर, २ कप मेहेंदी पावडर इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
केस गळतात तर शेपू खा, ऋजुता दिवेकरचा सल्ला-पाहा शेपूची भाजी खाण्याचे मस्त फायदे...
मेहेंदी नेमकी कशी भिजवावी ?
एका भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. या गरम पाण्यात कडुलिंबाची - कडीपत्त्याची पाने घालावीत त्यानंतर त्यात तांदुळाचे दाणे घालून पाण्याला एक उकळी येऊ द्यावी. दुसऱ्या एका बाऊलमध्ये मेहेंदी पावडर घेऊन त्यात हे तयार पाणी गाळणीच्या मदतीने गाळून ओतावे. मग या मिश्रणात कोरफडीचा गर घालावा. चमच्याने सगळे मिश्रण कालवून एकजीव करुन घ्यावे, वरुन झाकण ठेवून किमान ६ ते ७ तासांसाठी मेहेंदी व्यवस्थित भिजू द्यावी. मेहेंदी नेहमी लोखंडी कढईत भिजवावी, जेणेकरून आयर्नमुळे रंग काळा होतो.
मेहेंदी केसांवर कशी लावावी ?
मेहेंदी किमान ६ ते ७ तासांसाठी भिजल्यानंतर, ब्रशने किंवा हाताने स्काल्पपासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत संपूर्ण केसांवर व्यवस्थित लावून घ्यावी. त्यानंतर मेहेंदी पूर्णपणे सुकेपर्यंत किंवा ३ ते ४ केसांवर तशीच राहू द्यावी. मग फक्त पाण्याने केस स्वच्छ धुवून केसांवरील मेहेंदी काढून घ्यावी.
अशाप्रकारे मेहेंदी भिजवून केसांना लावण्याचे फायदे...
१. केसांना केवळ वरवरचा रंग न मिळता, तो मुळापर्यंत जातो आणि अधिक गडद व दीर्घकाळ टिकणारा रंग मिळतो.
२. मेहेंदीमध्ये कोरफड जेल मिक्स करून लावल्यास ते उत्तम कंडिशनिंगचे काम करते.
३. तांदुळाच्या दाण्यांमुळे केसांची मुळे घट्ट होतात, केसगळणे थांबते आणि केसांची वाढ वेगाने होण्यास मदत होते.
४. मेहेंदीमध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. यात कडुलिंबाची पाने मिसळून लावल्यास टाळूवरील कोंडा कमी होतो आणि खाज सुटण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
