Join us

त्वचा खूपच रखरखीत झाली- टॅनिंगही खूपच वाढलं? चिमूटभर साखर घेऊन करा 'हा' सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2025 16:27 IST

Beauty Tips For Dry And Tanned Skin: थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी घेण्यासाठी हा उपाय खूप चांगला आहे...(how to remove tanning of skin?)

ठळक मुद्देहा उपाय केल्यानंतर चेहऱ्यामध्ये खूपच छान फरक जाणवेल. 

सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे या दिवसांत त्वचेची खूपच जास्त काळजी घ्यावी लागते. कारण थंड- कोरड्या हवेचा परिणाम त्वचेवर होतो आणि त्यामुळे मग त्वचा कोरडी पडते. अंग उलते. अशी कोरडी पडलेली त्वचा खूप लवकर टॅन होऊन काळवंडते. म्हणूनच या दिवसांत त्वचेची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते (how to remove tanning of skin?). तुमची त्वचाही काेरडी पडून रखरखीत झाली असेल तर तिला पुन्हा एकदा मऊ मुलायम करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा..(best remedy for dry and tanned skin)

 

त्वचा कोरडी पडून काळवंडली असेल तर...

त्वचेवरील डेडस्किनचे प्रमाण जेव्हा खूप वाढलेले असते तेव्हा त्वचेचा स्पर्श आपल्या हातांना खूपच रखरखीत लागतो. अशी त्वचा पुन्हा एकदा कोमल करण्यासाठी एका वाटीमध्ये थोडा लिंबाचा रस घ्या.

Cervical Cancer: सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण वाढतंय!! ५ लक्षणं वेळीच ओळखा आणि सावध व्हा..

त्यामध्ये थोडी साखर घाला आणि साध्या पाण्याचे काही थेंब घाला. तुम्ही साध्या पाण्याऐवजी गुलाबजलही घालू शकता. त्यानंतर हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित कालवून घ्या आणि त्याने चेहऱ्याला हलक्या हाताने मालिश करा. ५ ते ७ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यानंतर तुम्हाला तुमची त्वचा अधिकच मऊ, कोमल आणि चमकदार झाल्यासारखी जाणवेल..

 

हा उपायही करू शकता..

त्वचा जर कोरडी पडून काळवंडली असेल तर तांदळाच्या पीठाचा खूपच चांगला उपयोग करता येतो. यासाठी एका वाटीमध्ये तांदळाचे पीठ घ्या.

ट्रम्पच्या डिनर पार्टीत नीता अंबानींच्या 'या' साडीची प्रंचड चर्चा, साडी विणायला लागले १९०० तास...

त्यामध्ये थोडा लिंबाचा रस, १ टीस्पून पिठीसाखर आणि थोडं कच्चं दूध घाला. आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्याला लावा. हा लेप जेव्हा थोडा सुकायला लागेल तेव्हा हलक्या हाताने चोळून तो काढून टाका. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. हा उपाय केल्यानंतरही चेहऱ्यामध्ये खूपच छान फरक जाणवेल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी