उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेची खूप काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसांत त्वचा खूप जास्त टॅन होते. अगदी तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हात जरी घराबाहेर पडलात तरीही त्वचा लगेच काळवंडल्यासारखी दिसते. शिवाय अनेकांन सनबर्नचा त्रासही होतोच.. हा त्रास कमी करण्यासाठी आणि टॅन झालेल्या त्वचेचं सौंदर्य पुन्हा एकदा खुलविण्यासाठी (homemade face pack for tanned skin) हा एक अगदी सोपा घरगुती उपाय करून पाहा (how to remove tanning?).. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला स्वयंपाक घरातलेच काही नेहमीचे पदार्थ वापरायचे आहेत.(best homemade face pack for skin care in summer)
त्वचेवरचं टॅनिंग कमी करण्यासाठी उपाय
त्वचेवरचं टॅनिंग कमी करून तिला पुन्हा चमकविण्यासाठी काय उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ ek.udaan या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी अर्धा टोमॅटो घ्या आणि तो किसून त्याचा रस काढून घ्या.
कोंड्यामुळे डोक्यातून कुबट, घाण वास येतो? ६ घरगुती हेअरमास्क- कोंडा जाऊन केस होतील सिल्की
आता टोमॅटोच्या रसामध्ये १ चमचा कॉफी पावडर, १ चमचा तांदळाचं पीठ आणि १ चमचा दही घाला.
सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि हा लेप आता तुमच्या चेहऱ्याला, मानेला, गळ्याला लावा.
यानंतर २० मिनिटे लेप चेहऱ्यावर तसाच राहू द्या. तो सुकत आला की हलक्या हाताने मसाज करून थंड पाण्याने चेहरा धुवून टाका..
टॅनिंग कमी होऊन त्वचेवर खूप छान ग्लो आलेला दिसेल. शिवाय त्वचा खूप मऊ झालेली असेल..
टॅनिंग कमी करण्यासाठी हे उपायही करू शकता
१. त्वचा खूप टॅन झाली असेल तर थंडगार दह्यामध्ये थोडा लिंबाचा रस घालून त्वचेला मालिश करा. १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका.
रोपांना फुलंच येईना? फक्त १ चमचा चहा पावडरचा उपाय करा- ८ दिवसांत येतील भरपूर फुलं
२. कच्चं दूध आणि कॉफी पावडर एकत्र करून चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. यानंतर १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचा छान चमकेल..
३. मिल्क पावडर आणि पिठीसाखर सम प्रमाणात एकत्र घ्या आणि त्यामध्ये थोडा मध घाला. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. चेहऱ्यावर छान चमक येईल.