Join us

उन्हाळ्यात जास्त घामामुळे मान काळवंडली, विचित्र दिसतेय? २ उपाय- टॅनिंग जाणार शंभर टक्के..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2025 18:03 IST

How To Remove Tanning From Neck?: उन्हाळ्यात घाम जास्त येतो. त्यामुळे मान आणि गळा खूप काळवंडतो. म्हणूनच त्वचेवरचं टॅनिंग कमी करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा...(2 simple home hacks to clean neck tanning)

ठळक मुद्देहे काही सोपे घरगुती उपाय पाहा आणि उन्हामुळे, घामामुळे काळवंडलेली मान स्वच्छ करा..

उन्हाळ्यात त्वचेची सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसांत ऊन खूप प्रखर असल्याने नाजुक त्वचेला त्याचा त्रास होतो. त्वचा काळवंडते, घामोळ्या येतात तर काही जणांना सनबर्नचा त्रासही होतो. या दिवसांत खूप जास्त घाम येत असल्याने मानेच्या किंवा गळ्याच्या भागातली त्वचाही जरा जास्तच काळी पडलेली दिसते. चेहरा स्वच्छ आणि मान काळी असं या दिवसांत अनेकांच्या बाबतीत हाेतं (how to clean blackness of neck?). शिवाय काळवंडलेली मान पाहून खूपच अस्वच्छ वाटतं (How To Remove Tanning From Neck?). त्यामुळेच आता हे काही सोपे घरगुती उपाय पाहा आणि उन्हामुळे, घामामुळे काळवंडलेली मान स्वच्छ करा..(2 simple home hacks to clean neck tanning)

काळवंडलेली मान, गळा स्वच्छ करण्याचे उपाय

 

१. बटाटा आणि लिंबू

बटाटा आणि लिंबू हे दोन्हीही नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्वचेवरचा काळेपणा कमी करण्यासाठी या दोन्ही पदार्थांचा खूप चांगला उपयोग होतो. हा उपाय करण्यासाठी बटाटा किसून घ्या आणि त्याचा रस काढा.

टरबूज खाऊन बिया टाकून देऊ नका! अतिशय गुणकारी असलेल्या टरबूज बियांचे वाचा ५ फायदे

बटाट्याचा रस जर ४ चमचे असेल तर त्यामध्ये दिड ते दोन चमचे लिंबाचा रस, चिमूटभर हळद आणि या पाण्यात जेवढे भिजवता येईल तेवढेच बेसन डाळीचे पीठ घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित कालवून घ्या आणि हा लेप तुमच्या मानेला, गळ्याला चोळून लावा.. ८ ते ९ मिनिटे राहू दिल्यानंतर चाेळून धुवून टाका. मान स्वच्छ होईल.

 

२. कोरफड

दुसरा उपाय करण्यासाठी कोरफडीचा ताजा गर घ्या. त्यामध्ये एक चमचा कॉफी, १ चमचा पिठी साखर आणि १ चमचा तांदळाचं पीठ घाला.

सायीपासून १० मिनिटांत करा तूप आणि खवा! लाेणी काढण्याचीही गरज नाही- बघा भन्नाट रेसिपी 

सगळं एकदा व्यवस्थित हलवून घेतलं की हा लेप तुमच्या गळ्याला, मानेला लावून ४ ते ५ मिनिटे मसाज करा. यानंतर थंड पाण्याने मान- गळा धुवून घ्या. वर सांगितलेले दोन्ही उपाय एक दिवसाआड करा. अगदी आठवडाभरातच मानेवरचं सगळं टॅनिंग निघून ती खूप स्वच्छ दिसेल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीसमर स्पेशल