उन्हाळ्यात त्वचेची कितीही काळजी घेतली तरी ती टॅन होते. कडक ऊन, धूळ आणि प्रदूषणामुळे आपली त्वचा केवळ काळवंडत नाही तर त्यावर डेड स्किन सेल्सचा थरही साचतो.(Coffee face pack for instant brightness) यामुळे आपल्या चेहऱ्यासह शरीरही निस्तेज दिसू लागते. अनेकदा आपण हे टॅनिंग घालवण्यासाठी महागड्या पार्लर ट्रिटमेंट्स किंवा फेशियलचा आधार घेतो. पण याचा परिणाम हा तात्पुरता पाहायला मिळतो आणि आपले पैसे देखील जातात.(Summer skincare routine home remedies) अशावेळी आपल्या स्वयंपाकघरातील एक छोटीशी गोष्ट जादू करु शकते ती म्हणजे कॉफी. (5 rupayat glowing twacha tips marathi)
कॉफीमध्ये कॅफीन आणि अँटी - ऑक्सिडंट्स त्वचेचे रक्ताभिसरण सुधारतात. ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. कॉफी हे उत्तम एक्सफोलिएटर म्हणून काम करते. जी त्वचेवरील साचलेली घाण आणि मृत पेशी मुळापासून काढून टाकण्यास मदत करते. घरी अगदी कमी खर्चात बॉडी स्क्रब कसं तयार करायचं.(Tanning ani dead skin sathi natural scrub) या उन्हाळ्यात केमिकल्सला म्हणा 'बाय-बाय' आणि कॉफीच्या साहाय्याने मिळवा मखमली, डागविरहित आणि ग्लोइंग त्वचा.
उन्हाळ्यात ताक 'अमृत' पण 'या' ५ प्रकारच्या लोकांनी चुकूनही पिऊ नये ताक, आजार शरीर पोखरतील
1. कॉफी आणि खोबऱ्याच्या तेलाचा स्क्रब. यासाठी आपल्याला २ चमचे कॉफी पावडरमध्ये १ चमचा खोबऱ्याचे तेल मिसळा आणि त्वचेला लावा. खोबरेल तेल त्वचेला मॉइश्चरायझर करते. तर कॉफी डेड स्किन काढून टाकते. कोरड्या त्वचेसाठी हा चांगला उपाय आहे.
2. उन्हाळ्यामुळे त्वचा जास्त काळवंडली असेल, तर हा कॉफी आणि दह्याचा स्क्रब आपण वापरु शकतो. यासाठी आपल्याला १ चमचा कॉफीमध्ये २ चमचे ताजे दही मिसळा. हे मिश्रण शरीरावर लावून १० मिनिटे ठेवा नंतर स्क्रब करुन धुवा. दह्यातील लॅक्टिक ॲसिड टॅनिंग वेगाने कमी करते आणि त्वचा उजळवते.
3. कोपर, गुडघे आणि मानेचा काळपटपणा घालवण्यासाठी आपल्याला कॉफी आणि साखरेचा स्क्रब करायला हवा. यासाठी १ चमचा कॉफी, १ चमचा साखर आणि थोडे ऑलिव्ह ऑइल एकत्र करा. साखरेचे कण त्वचेला खोलवर स्वच्छ करतात. ज्यामुळे आपले त्वचा मऊ आणि ग्लो होण्यास मदत होते.
4. आपल्याला इन्स्टंट ग्लो हवा असेल तर कॉफी आणि मधाचा स्क्रब तयार करा. यासाठी चमचाभर कॉफी पावडरमध्ये मध मिसळून पेस्ट तयार करा. मधामध्ये नैसर्गिक आर्द्रता असते. जी आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवते आणि चेहऱ्यावर चमक आणते.
5. आपली त्वचा हा संवेदनशील असेल तर कॉफी आणि कोरफड जेलचा स्क्रब चांगला आहे. यासाठी १ कफ कॉफीमध्ये २ चमचे कोरफड जेल मिसळा. उन्हामुळे जळजळ होत असेल तर कोरफडमुळे शांत होईल आणि कॉफी त्वचेला डिटॉक्स करते. त्वचेवर स्क्रब करताना त्वचा जोर-जोरात घासू नका. वर्तुळाकार पद्धतीने हलक्या हाताने मसाज करा. आठवड्यातून १ ते २ वेळा स्क्रब करणं पुरेसे आहे. कोणताही स्क्रब संपूर्ण शरीरावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.
