सध्या अनेकजण त्वचेची काळजी घेण्यासाठी काही ना काही करत असतात.(skin care) चेहरा हा आपले संपूर्ण आरोग्य दर्शवत असतो. कमी वयातच मुलींना पिंपल्स, डाग, फोड किंवा पिंग्मेंटेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते. आपली त्वचा सुंदर दिसावी यासाठी आपण अनेक महागड्या ट्रिटमेंट करतो.(ayurvedic remedy for pimples) महागडी उत्पादने त्वचेवर लावतो, ज्याचा परिणाम वेगळा होतो. यामुळे पिंपल्स कमी होण्याऐवजी अधिक वाढतात.(natural face brightening)
वाढते प्रदूषण, धूळ आणि त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास आपला चेहरा खराब- निस्तेज दिसू लागतो.(How to remove pimples naturally at home) चेहरा सुंदर- नितळ स्वच्छ करायचा असेल तर आयुर्वेदातील खास गोष्ट आपण त्वचेवर लावू शकतो.(Ayurvedic remedy to brighten face) ज्यामुळे त्वचेचा रंग तर उजळेल पण त्वचा नव्यासारखी चमकेल. यासाठी आपल्याला जास्त खर्च देखील करावा लागणार नाही. अगदी ५ रुपयांत आपण त्वचा चमकवू शकतो, पाहूया कसे..
कोरड्या-खराट्यासारख्या केसांवर जादू करेल 'हा' हेअर मास्क, केस होतील मऊ, सुळसुळीत आणि काळेभोर
त्वचेवरील पिंपल्स-डाग घालवण्यासाठी आपल्याला २ चमचे मुलतानी माती, १ चमचा कॉफी, १ चमचा मध आणि गुलाब पाणी मिक्स करुन त्याचा फेस पॅक तयार करावा लागेल. हा पॅक चेहरा आणि मानेवर लावा. २० मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
मुलतानी माती त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास आणि ओपन पोअर्स घट्ट करण्याचे काम करते. यामुळे मुरुमे, ब्लॅकहेड्स आणि पिंपल्ससारख्या अनेक त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळतो. आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. कॉफी त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. तसेच त्वचा घट्ट होते. मध आपल्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे मुरुमांच्या समस्या टाळण्यास मदत करतात. गुलाब पाणी त्वचेला थंड ठेवण्याचे काम करते. त्वचेचा रंग सुधारण्यास आणि त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते.