Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरच्या घरी ५ रुपयांत पिंपल्स होतील गायब! 'अशी' घ्या काळजी- टॅनिंग, डेडस्किन गायब, आठवड्याभरात त्वचा तजेलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2026 15:23 IST

home remedies for pimples: remove tanning naturally: dead skin removal at home: ५ ते १० रुपयांच्या खर्चात आपण घरच्या घरी पार्लरसारखा ग्लो मिळवता येईल. यासाठी काय करायला हवं पाहूया.

ऋतू बदलला की त्याचा सगळ्यात जास्त परिणाम त्वचेवर होतो. अनेकदा महागडे ट्रीटमेंट्स घेऊनही त्वचेच्या समस्या अगदी जशाच्या तशाच राहतात.(home remedies for pimples) पिंपल्स, टॅनिंग आणि निस्तेज झालेली त्वचा. पिंपल्समुळे अनेकदा त्वचेवर खाज सुटते. त्वचा लाल होते किंवा आपला चेहरा अधिक खराब दिसू लागतो. (remove tanning naturally)उन्हाळ्याच्या दिवसात किंवा प्रदूषणामुळे आपली त्वचा आपली नैसर्गिक चमक गमावते. त्वचेवर डेडस्किन जमा होते आणि उष्णतेमुळे पिंपल्सचा त्रास वाढतो.(dead skin removal at home) अशावेळी त्वचेला थंडावा देण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील खास उपाय त्वचेला आतून स्वच्छ करण्याचे काम करते.(glowing skin tips) अवघ्या ५ ते १० रुपयांच्या खर्चात आपण घरच्या घरी पार्लरसारखा ग्लो मिळवता येईल. यासाठी काय करायला हवं पाहूया. 

जाड दंडांमुळे साडी नेसली की फार बेढब दिसता? बाह्यांचे ५ डिझाईन्स पाहा, दंड दिसतील सुबक आणि स्लिम!

डिंक आणि लिंबाचा फेसपॅक 

आपल्याला फेसपॅक तयार करण्यासाठी १ छोटा डिंकाचा तुकडा, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि गुलाब पाणी लागेल. रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा डिंकाचा तुकडा अर्ध्या वाटी पाण्यात भिजवा. सकाळी फुगून तो जेलीसारखा तयार होईल. यातील १ ते २ चमचे जेली एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात अर्धा चमचा ताज्या लिंबाचा रस मिक्स करा.

आता चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. १५ ते २० मिनिटे हा पॅक चेहऱ्यावर राहू द्या. चेहरा सुकल्यानंतर कोमट किंवा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. डिंक अर्थात गोंद कटिरामध्ये शरीराला थंडावा देणारे गुणधर्म असतात. याचे हा खाल्ल्याने किंवा चेहऱ्यावर लावल्याने नैसर्गिक थंडावा मिळतो. ज्यामुळे त्वचेला केवळ मॉइश्चरायझेशन मिळत नाही तर सुरकुत्या देखील कमी होतात. रोड खाल्ल्याने यातील विषारी घटक बाहेर निघण्यास मदत होते. ज्यामुळे मुरुमे, सुरकुत्या आणि टॅनिंग सारख्या त्वचेच्या समस्या कमी होतात. ज्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. 

यासाठी आपल्याला डिंक रात्रभर पाण्यात भिजवावे लागेल. दुसऱ्या दिवशी यात थंड पाणी घालून लिंबाचा रस घाला. व्यवस्थित मिसळून हे पाणी प्या. ३ ते ४ दिवस सलग हे पाणी प्यायल्याने त्वचेमध्ये बदल पाहायला मिळेल. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग एजंट असतात. ते त्वचेवरील काळे डाग आणि टॅनिंग कमी करण्यास मदत करतात, तर डिंकामध्ये डेडस्किनच्या पेशी काढून टाकून नवीन त्वचा येण्यास मदत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Get rid of pimples in 5 rupees at home!

Web Summary : Fight pimples, tanning, and dead skin with a simple 5-rupee home remedy. A Dinka and lemon face pack cleanses and cools, removing impurities and revealing glowing skin within a week.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी