Lokmat Sakhi >Beauty > मांड्यांच्या आतील भाग काळपट पडला? जाणून घ्या कारणं आणि उपाय - 'अशा' पद्धतीने घ्या त्वचेची काळजी...

मांड्यांच्या आतील भाग काळपट पडला? जाणून घ्या कारणं आणि उपाय - 'अशा' पद्धतीने घ्या त्वचेची काळजी...

Dark Inner Thighs Causes & Prevention : How To Remove Inner Thigh Darkness : Say goodbye to dark inner thighs with these tips : How to Get Rid of Dark Inner Thighs : How to Lighten Dark Inner Thighs : मांड्यांच्या आतील भाग काळपट झाल्याने फक्त ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरु नका, नेमकी कारणं काय ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 12:19 IST2025-04-03T12:18:48+5:302025-04-03T12:19:53+5:30

Dark Inner Thighs Causes & Prevention : How To Remove Inner Thigh Darkness : Say goodbye to dark inner thighs with these tips : How to Get Rid of Dark Inner Thighs : How to Lighten Dark Inner Thighs : मांड्यांच्या आतील भाग काळपट झाल्याने फक्त ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरु नका, नेमकी कारणं काय ते पाहा...

How To Remove Inner Thigh Darkness How to Lighten Dark Inner Thighs How to Get Rid of Dark Inner Thighs How To Remove Inner Thigh Darkness | मांड्यांच्या आतील भाग काळपट पडला? जाणून घ्या कारणं आणि उपाय - 'अशा' पद्धतीने घ्या त्वचेची काळजी...

मांड्यांच्या आतील भाग काळपट पडला? जाणून घ्या कारणं आणि उपाय - 'अशा' पद्धतीने घ्या त्वचेची काळजी...

आपल्यापैकी बऱ्याचजणींना मांड्यांच्या आतील भाग काळपट होण्याची समस्या असतेच. संपूर्ण मांड्यांचा रंग वेगळा आणि आतील भागच तेवढा काळा यामुळे त्वचेच्या रंगातील (Dark Inner Thighs Causes & Prevention) फरक दिसून येतो. खरंतर, मांड्यांची त्वचा अतिशय नाजूक असते. नेहमीच मांडीचा वरचा भाग नेहमीच कापडानं (How To Remove Inner Thigh Darkness) झाकलेला असतो. तरीही आतील त्वचेला काळपटपणा ( Say goodbye to dark inner thighs with these tips) येतोच. बऱ्याच महिलांची अशी तक्रार असते की, त्वचेची योग्य ती काळजी (How to Lighten Dark Inner Thighs) घेऊनही मांड्यांचा भाग काळपट पडतो(How to Get Rid of Dark Inner Thighs).

मांड्यांच्या आतील भागातील हा काळपटपणा दूर करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. परंतु काहीवेळा हे उपाय देखील फेल ठरतात. अशावेळी मांड्यांच्या आतील भाग नेमका कोणत्या कारणाने काळा पडतो याची कारणं आधी समजून घेतली पाहिजेत. मगच त्या कारणांनुसार आपल्याला त्यावर उपाय करता येतात. इंस्टाग्रामवर डॉ. निरंजन समानी यांनी मांड्यांच्या आतील भाग कोणकोणत्या कारणांमुळे काळा पडू शकतो याची कारणं आणि उपाय शेअर केले आहेत. त्यानुसार, त्वचेची कशी काळजी घ्यावी याचे उपाय देखील पाहूयात. 

मांड्यांच्या आतील भाग काळपट पडण्याची कारणं...     

१. त्वचेचे घर्षण (Friction) :- काहीवेळा चालताना आपल्या मांड्या एकमेकांना घासल्या जातात. दीर्घकाळ अशा पद्धतीने मांड्या घासल्या तर वारंवार असे त्वचेचे घर्षण होऊन त्वचा काळी पडते. 

२. अ‍ॅकॅन्थोसिस निग्रिकन्स (Acanthosis Nigricans) :- ही एक त्वचेसंबंधित समस्या आहे. जी लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिरोध किंवा हार्मोनल असंतुलनाशी संबंधित आहे. यामध्ये त्वचेवर काळे आणि जाड पॅच तयार होऊ लागतात.

३. शेव्हिंग किंवा वॅक्सिंग :- चुकीच्या पद्धतीने वारंवार शेव्हिंग किंवा वॅक्सिंग केल्याने त्वचेला त्रास होऊ शकतो, ज्यामुळे हायपरपिग्मेंटेशन होऊन त्वचा काळी पडू शकते. 

केसांवर मेथीची जादू, सगळे विचारतील सुंदर केसांचं सिक्रेट! मेथीचे ४ उपाय, केसही म्हणतील थँक्यू!

४. घाम आणि बॅक्टेरिया :- मांड्यांच्या आतील भागात आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर घाम येतो. या घाम आणि बॅक्टेरियामुळे त्वचा काळी पडू शकते. 

५. हार्मोनल बदल :- गर्भधारणा, गर्भनिरोधक गोळ्या किंवा PCOS सारख्या समस्या देखील त्वचेच्या रंगावर परिणाम करू शकतात.

६. त्वचेची अ‍ॅलर्जी किंवा जळजळ :- काही साबण, लोशन किंवा डिटर्जंट्सच्या अ‍ॅलर्जीमुळे त्वचेची जळजळ होऊ शकते, ज्यामुळे ती काळी पडू शकते.

उन्हाळ्यात परफ्यूम लावूनही घामाची दुर्गंधी येतेच? ५ टिप्स- परफ्यूम उडणार नाही, वाटेल फ्रेश...

त्वचा काळी पडू नये म्हणून काय काळजी घ्यावी... 

१. कायम त्वचेला श्वास घेता येईल असे सुती कपडे घालावेत, विशेषतः उन्हाळ्यात. याचबरोबर, त्वचेचे घर्षण कमी करण्यासाठी क्रीम किंवा पावडर वापरा. खूप घट्ट कपडे घातल्याने त्वचेवर घर्षण वाढते, ज्यामुळे जळजळ आणि काळेपणा येऊ शकतो. त्यामुळे नेहमी सैल कपडेच घालावेत.  

२. शेव्हिंग किंवा वॅक्सिंग करताना ते अगदी हळूवारपणे करा. नेहमी स्वच्छ रेझर वापरा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा.

त्वचेवर केमिकलचा मारा, ऐन तारुण्यात चेहरा दिसतो म्हातारा! ‘हे’ नैसर्गिक पदार्थ लावा, दिसा सदासतेज तरुण...

३. साबण, क्रीम किंवा डिओड्रंट सारख्या केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सपासून दूर राहा कारण ते त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. त्याऐवजी, सौम्य आणि हायपोअलर्जेनिक प्रॉडक्ट्सची निवड करा. 

४. मांड्यांचा आतील भाग हा झाकलेलाच असतो. तरीही सूर्यप्रकाशापासून त्याचे संरक्षण करणे गरजेचे असते. यासाठी त्या भागावर देखील सनस्क्रीन लावा. 

५. त्वचा कोरडी पडू देऊ नका. कोरड्या त्वचेला जळजळ आणि पिग्मेंटेशन होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून नेहमी तुमची त्वचा मॉइश्चरायझ करा.  

जर हे उपाय केले तर मांड्यांच्या आतील भागाचा काळेपणा कमी होऊ शकतो आणि त्वचा निरोगी ठेवता येते.

Web Title: How To Remove Inner Thigh Darkness How to Lighten Dark Inner Thighs How to Get Rid of Dark Inner Thighs How To Remove Inner Thigh Darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.