लग्न ठरलं की नवरीच्या चेहऱ्यावर तेज दिसायला लागतं. चेहरा तेजलदार दिसावा, फोटोमध्ये ग्लो यावा आणि त्वचा एकदम सुंदर दिसावी असं प्रत्येकाला वाटतं.(bridal skincare tips) पण या महत्त्वाच्या दिवशी अनेकांचा चेहरा थकल्यासारखा वाटतो.(natural bridal glow) लग्नाची तयारी, भीती, झोप यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. त्वचा कोरडी पडते आणि नैसर्गिक चमक कुठेतरी हरवून जाते.(pre-wedding skincare oil) मेकअपने चेहरा सुंदर दिसू शकतो पण चेहऱ्यावर हवा तसा ग्लो दिसत नाही. (face glow oil for brides)लग्नापूर्वी अनेक मुली स्किन ट्रीटमेंट्स करतात. क्रीम्स, सिरम, फेसपॅक वापरतात. पण लग्नाच्या धावपळीत चुकीचे प्रॉडक्ट्स निवडल्यावर त्वचा अधिक कोरडी होते.(Indian bridal beauty tips) यासाठी काही घरगुती उपाय करणं फायदेशीर ठरतं. त्वचेला ओलावा देऊन आतून चमक आणणारी काही खास तेलं त्यात अत्यंत प्रभावी मानली जातात.(natural remedies for glowing skin) या तेलांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, नैसर्गिक फॅटी अॅसिड्स आणि व्हिटॅमिन्स असल्यामुळे त्वचेचा थकवा दूर होतो, कोरडेपणा कमी होतो आणि नववधूसारखा गुलाबी तेज चेहऱ्यावर येते.
केस सतत गळतात, तुटतात- फाटेही फुटले? चहा पावडरमध्ये मिसळा १ गोष्टी, डॅमेज केस होतील सुंदर- घनदाट
नववधुच्या चेहऱ्यावर आपण शेवग्याच्या शेंगांचे तेल लावू शकतो. हे तेल त्वचेसाठी नैसर्गिक स्किन क्लिंजर म्हणून काम करते. यात नॉन-स्टिकी, त्वचेला आतून पोषण देणारे घटक असतात. ज्यामुळे कोणत्याही त्वचेवर सहज लावता येते. हिवाळ्यात त्वचा कोरडी, निस्तेज, थकलेली त्वचा पुन्हा मऊ-मुलायम आणि ग्लोइंग करण्यासाठी हे तेल लावता येईल.
यात व्हिटॅमिन ए, सी आणि ई, तसेच ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आहेत. यामुळे त्वचेचे संरक्षण करण्यास मदत होते. हे तेल त्वचेच्या खोलवर पोषण देऊन हायड्रेशन टिकवून ठेवते. कोरडी, फाटलेली किंवा रखरखीत त्वचा मऊ होते. या तेलामुळे वयोवृद्धाची लक्षणं कमी होतात आणि त्वचा टाईट दिसते.हे तेल अँटीबॅक्टेरियल आहे. त्यामुळे त्वचेवरील जीवाणू कमी होतात,ओपन पोर्स क्लिन होतात आणि मुरुमे कमी होण्यास मदत होते. तेलकट त्वचेलाही हे तेल योग्य प्रमाणात वापरल्यास बॅलन्स मिळतो.
हे तेल त्वचेला कसं लावावं?
1. रात्री आपला चेहरा स्वच्छ धुवून या तेलाचे २ ते ३ थेंब चेहऱ्याला लावा. नंतर हलक्या हाताने मसाज करा.
2. ड्राय स्किन असणाऱ्यांसाठी हे तेल जादू आहे. ते दररोज वापरू शकता.
3. ऑयली स्किनसाठी आठवड्यातून 3–4 वेळा पुरेसे असते.
4. सीरम किंवा नाईट क्रीमसोबतही मिसळून वापरता येते.
Web Summary : Brides-to-be can combat pre-wedding dullness with moringa oil. Rich in vitamins and fatty acids, it hydrates, reduces dryness, fights bacteria, minimizes pores, and restores a youthful glow. Apply nightly for best results.
Web Summary : विवाह से पहले दुल्हनों के चेहरे की चमक बढ़ाने के लिए सहजन का तेल बहुत उपयोगी है। विटामिन और फैटी एसिड से भरपूर, यह तेल त्वचा को हाइड्रेट करता है, रूखापन कम करता है, बैक्टीरिया से लड़ता है, रोमछिद्रों को कम करता है, और एक युवा चमक लाता है। सर्वोत्तम परिणामों के लिए रात में लगाएं।