Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावरील टॅनिंग, काळे डाग होतील गायब, बटाट्याची सालं 'अशी' चोळा त्वचेवर- १० मिनिटांत चेहऱ्यावर येईल चमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2026 11:49 IST

Potato peel for skin: Remove tanning naturally: Dark spots home remedy: बटाट्याची सालं त्वचेवर कशी लावायला हवी पाहूया.

आपला चेहरा सुंदर- चमकदार असावा असं प्रत्येकाला वाटतं. पण अगदी कमी वयातच चेहरा निस्तेज आणि कोरडा दिसू लागतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या, पिंपल्स, काळे डागामुळे आपण विद्रूप दिसू की काय अशी शंका सतत मनात येत असते.(Skin care tips) प्रदूषण, ऊन, धावपळीची जीवनशैली आणि त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळे आजकाल चेहऱ्यावर टॅनिंग, काळे डाग, निस्तेजपणा ही समस्या अनेकांना भेडसावत आहे. महागडे क्रीम, फेशियल किंवा पार्लर ट्रीटमेंट करूनही आपल्याला हवा तसा परिणाम मिळत नाहीत. अशावेळी आजीबाईंच्या बटव्यातील काही सोपे घरगुती उपायच जास्त प्रभावी ठरतात.(Potato peel for skin) सौंदर्य हे महागड्या क्रीम्समध्ये नाही, तर आपल्या स्वयंपाकघरातील साध्या गोष्टींमध्ये दडलेले असते, हे आपण विसरलो आहोत.(Remove tanning naturally) रोजच्या जेवणात वापरला जाणारा बटाटा केवळ चवीसाठीच नाही, तर त्वचेच्या आरोग्यासाठीही 'सुपरफूड' ठरतो. अनेकदा आपण बटाटा सोलतो आणि त्याची सालं कचऱ्यात फेकून देतो. पण या कचरा समजल्या जाणाऱ्या सालींमध्ये निसर्गाचे असे काही गुणधर्म दडलेले आहेत, जे आपल्या चेहऱ्यावरील टॅनिंग, काळे डाग आणि पिगमेंटेशन मुळापासून कमी करण्यास मदत करतात. बटाट्याची सालं त्वचेवर कशी लावायला हवी पाहूया. (Dark spots home remedy)

काळे डाग- पिंपल्स- वांग होतील गायब! 'असं' लावा जायफळ त्वचेवर, आजीबाईच्या बटव्यातील औषधी उपाय- चेहरा उजळेल

सगळ्यात आधी आपल्याला बटाटे धुवून त्याचे साले काढून घ्यावे लागतील. यानंतर मिक्सरमध्ये बटाट्याची साले, दही, भात आणि थोडे पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा. चेहरा स्वच्छ धुवून ही पेस्ट आपल्या त्वचेवर लावा. सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्याने आपल्याला फरक जाणवेल. 

बटाट्याची सालं चेहऱ्यावर ५ ते १० मिनिटे चोळा. जिथे जास्त काळे डाग किंवा टॅनिंग आहे, तिथे थोडा जास्त वेळ मसाज करा. त्यानंतर १० मिनिटे चेहरा तसाच राहू द्या आणि कोमट पाण्याने धुवा. आपली त्वचा जास्त तेलकट असेल, तर बटाट्याच्या सालीवर लिंबाच्या रसाचे २-३ थेंब टाका आणि त्याने चेहरा स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाईल आणि छिद्रे स्वच्छ होतील.

रात्रभर जागल्यामुळे किंवा तणावामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली असतील, तर बटाट्याची सालं डोळ्यांवर १० मिनिटे ठेवा. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होतो आणि डार्क सर्कल्स कमी होतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Potato peel remedy: Remove tan, dark spots, get glowing skin.

Web Summary : Potato peels can diminish tan, dark spots. Grind peels with yogurt, rice, water. Apply, rinse after drying. Rub peels for 10 minutes for radiant skin.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी