Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > १० मिनिटांत चेहऱ्यावरील टॅन होईल गायब! किचनमधील 'या' २ वस्तू करतात जादू, चेहऱ्यावर येते तेज

१० मिनिटांत चेहऱ्यावरील टॅन होईल गायब! किचनमधील 'या' २ वस्तू करतात जादू, चेहऱ्यावर येते तेज

home remedies for tan: remove tan naturally: instant tan removal: सनटॅन कमी करण्यासाठी घरगुती उपाय कोणते ते पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2026 12:11 IST2026-02-15T12:10:50+5:302026-02-15T12:11:33+5:30

home remedies for tan: remove tan naturally: instant tan removal: सनटॅन कमी करण्यासाठी घरगुती उपाय कोणते ते पाहूया.

how to remove face tan in 10 minutes naturally best kitchen ingredients for instant tan removal easy home remedy for sun tan on face natural de tan face pack using kitchen items | १० मिनिटांत चेहऱ्यावरील टॅन होईल गायब! किचनमधील 'या' २ वस्तू करतात जादू, चेहऱ्यावर येते तेज

१० मिनिटांत चेहऱ्यावरील टॅन होईल गायब! किचनमधील 'या' २ वस्तू करतात जादू, चेहऱ्यावर येते तेज

वाढतं ऊन, वाढतं प्रदूषण आणि सततची धावपळ… या सगळ्याचा सर्वात पहिला आणि खोल परिणाम जर कुठे दिसत असेल, तर तो आपल्या त्वचेवर. ऑफिसला जाताना, बाजारात फिरताना किंवा अगदी रोजच्या कामांसाठी बाहेर पडतानाही सूर्याच्या अतिनील किरणांचा त्वचेवर सतत मारा होत असतो.(home remedies for tan) त्यामुळं मेलानिनचं प्रमाण वाढतं आणि चेहरा हळूहळू काळवंडलेला, निस्तेज दिसू लागतो. महागडे सनस्क्रीन लावूनही टॅनिंग पूर्णपणे टाळता येत नाही, हीच खरी खंत.(remove tan naturally)
चेहऱ्याची चमक कमी झाली की लगेच पार्लर, डी-टॅन फेशियल, केमिकल ट्रीटमेंट अशा पर्यायांचा विचार केला जातो.(instant tan removal) पण प्रत्येक वेळी रासायनिक उपचार करून त्वचेला आणखी त्रास देणं योग्य आहे का? खरं तर, आपल्या स्वयंपाकघरातच अशा नैसर्गिक आणि प्रभावी गोष्टी उपलब्ध आहेत.ज्या कोणत्याही केमिकल फेशियलपेक्षा सुरक्षित, सौम्य आणि दीर्घकालीन परिणाम देणाऱ्या ठरू शकतात.(natural skin glow tips) काही घरगुती घटक केवळ टॅन कमी करत नाहीत, तर त्वचेचा पोत सुधारतात, डाग हलके करतात आणि हरवलेली नैसर्गिक चमक परत आणतात. सनटॅन कमी करण्यासाठी घरगुती उपाय कोणते ते पाहूया. (face tan removal at home)

साबुदाणा वडा विसराल! महाशिवरात्रीनिमित्त उपवासाला करा कच्च्या केळीचे कुरकुरीत वडे, कमी तेलकट- झटपट रेसिपी

या फेस मास्कसाठी लागणारे साहित्य:

तांदळाचे पीठ- १ मोठा चमचा, 
टोमॅटोचा पल्प- १ मोठा चमचा, 
ताजे दही- १ चमचा

मास्क कसा तयार करायचा

सगळ्यात आधी वाटीत एक चमचा तांदळाचे पीठ घ्या. त्यात ताज्या टोमॅटोचा गर घाला. टोमॅटोचा गर करताना त्यातील बिया आणि वरची साल काढून घ्या. यामध्ये दही घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. जर मिश्रण खूप घट्ट वाटत असेल, तर त्यात थोडे गुलाब पाणी घालू शकता.

सर्वात आधी आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हा मास्क चेहऱ्यावर आणि मानेवर जाड थरात लावा. २ ते ३ मिनिटे हलक्या हाताने वर्तुळाकार मसाज करा. यामुळे तांदळाचे पीठ स्क्रब म्हणून काम करेल. १५ ते २० मिनिटे हा मास्क चेहऱ्यावर तसाच राहू द्या.पूर्ण सुकल्यानंतर चेहरा गार पाण्याने धुवा. हलक्या हाताने पुसून मॉइश्चरायझर लावा.

तांदळाच्या पिठामध्ये पॅरा- अमीनोबेन्झोइक ॲसिड असते, जे नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करते. हे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते आणि त्वचा घट्ट करण्यास मदत करते. टोमॅटोमध्ये लायकोपिन आणि व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. हे नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे, जे जिद्दी टॅनिंग आणि काळे डाग वेगाने कमी करते. तसेच यामुळे त्वचेचा तेलकटपणाही नियंत्रणात राहतो. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे त्वचेचा रंग उजळण्यास मदत करते. हे त्वचेला आतून ओलावा देते. उन्हामुळे होणारी जळजळ शांत करते.


Web Title : 10 मिनट में टैन हटाएं: रसोई के सामान से पाएं चमकती त्वचा

Web Summary : धूप से टैनिंग होती है। चावल का आटा, टमाटर और दही का उपयोग करें। यह मास्क एक्सफोलिएट, ब्राइटन और मॉइस्चराइज़ करता है। चावल का आटा सनस्क्रीन है, टमाटर टैन कम करता है, दही निखारता और आराम देता है, जिससे त्वचा चमकती है।

Web Title : Remove tan in 10 minutes with kitchen ingredients for glowing skin.

Web Summary : Sun exposure causes tanning. This remedy uses rice flour, tomato, and yogurt. The mask exfoliates, brightens, and moisturizes skin. Rice flour acts as sunscreen, tomato reduces tan, and yogurt lightens and soothes, revealing radiant skin.