बऱ्याच जणींना चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा त्रास खूप जास्त असतो. त्यांच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स आलेलेच असतात. आता पिंपल्स येऊन ४ ते ५ दिवसांत ते जातात पण त्यांचे काळपट डाग मात्र चेहऱ्यावर पुढचे काही दिवस तसेच राहतात. असे डागांवर डाग वाढत गेले की मग सगळा चेहराच डागाळलेला, खराब दिसू लागतो. चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं. म्हणूनच या डागांमुळे तुम्हीही वैतागून गेला असाल तर आता पुढे सांगितलेला एक उपाय लगेचच करून पाहा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीच्या पानांचा वापर करायचा आहे (use of tulsi leaves to remove pimples spots from face). तो नेमका कसा करायचा आणि त्याचे इतर काय फायदे होतात ते पाहूया..(home remedies to get rid of dark spots on face)
चेहऱ्यावरचे पिंपल्सचे काळे डाग कमी करण्याचा उपाय
चेहऱ्यावर पडलेले पिंपल्सचे काळे डाग कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा कशा पद्धतीने उपयोग करता येऊ शकतो, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ spicesmagicby_niharika या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. हा उपाय करण्यासाठी तुळशीची १० ते १५ पानं घ्या.
महिलांसाठी सुपरफूड: आजी असो की नात.. प्रत्येकीने खायलाच हवे ५ पदार्थ- थकवा, अशक्तपणा येणारच नाही
ती स्वच्छ धुवा आणि त्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात तुळशीची पानं ८ ते १० तास भिजत घाला. यानंतर भिजलेली पानं पाण्यासकट मिक्सरमधून फिरवून घ्या. यानंतर हे पाणी गाळून घ्या. आता हे पाणी एखाद्या काचेच्या स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि दिवसातून दोन- तीन वेळा तसेच रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्यावर शिंपडा. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास पिंपल्सचे काळे डाग तर कमी होतीलच, पण त्वचेवर अकाली सुरकुत्या येणंही बंद होईल.
हे उपायही करून पाहा..
चेहऱ्यावर जर पिंपल्सचे डाग पडले असतील तर जायफळाचा एक छोटासा तुकडा आणि थोडंसं हळकुंड कच्चं दूध घालून सहानीवर उगाळून घ्या. हा लेप जिथे पिंपल्सचे डाग पडले असतील त्या भागावर लावा. त्यानंतर १० मिनिटांची चेहरा धुवून टाका. काही दिवस रोज हा पाय करून पाहा. पिंपल्सचे डाग कमी होतील. हा उपाय करण्यापुर्वी पॅच टेस्ट मात्र जरूर घ्या.
