Lokmat Sakhi >Beauty > डागांमुळे चेहरा डल दिसतो- टॅन झाला? सणासुदीला त्वचा चमकेल आरशासारखी, सोपा घरगुती उपाय - ५ मिनिटांत चेहऱ्यावर येईल ग्लो

डागांमुळे चेहरा डल दिसतो- टॅन झाला? सणासुदीला त्वचा चमकेल आरशासारखी, सोपा घरगुती उपाय - ५ मिनिटांत चेहऱ्यावर येईल ग्लो

festive season skincare tips for instant glow : remove dark spots naturally: tanning removal home remedy: महिलांना स्वत:कडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. अशावेळी हा ५ मिनिटांचा उपाय केल्यास त्वचा ग्लो होण्यास मदत होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2025 16:31 IST2025-08-24T16:29:00+5:302025-08-24T16:31:02+5:30

festive season skincare tips for instant glow : remove dark spots naturally: tanning removal home remedy: महिलांना स्वत:कडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. अशावेळी हा ५ मिनिटांचा उपाय केल्यास त्वचा ग्लो होण्यास मदत होईल.

how to remove dark spots and tanning from face naturally at home festive season skincare tips for instant glow | डागांमुळे चेहरा डल दिसतो- टॅन झाला? सणासुदीला त्वचा चमकेल आरशासारखी, सोपा घरगुती उपाय - ५ मिनिटांत चेहऱ्यावर येईल ग्लो

डागांमुळे चेहरा डल दिसतो- टॅन झाला? सणासुदीला त्वचा चमकेल आरशासारखी, सोपा घरगुती उपाय - ५ मिनिटांत चेहऱ्यावर येईल ग्लो

आपला चेहराही सुंदर, नितळ असावा असं प्रत्येकाला वाटतं. (Skin care tips) त्यासाठी महिन्यातून एकदा तरी आपण पार्लरमध्ये जाऊन भरमसाठ पैसे खर्च करतो. चेहऱ्यावर पिंपल्स येणे, कोरडा पडणे, टॅनिंग किंवा डार्क सर्कलच्या समस्या देखील वाढतात.(festive season skincare) त्वचेची काळजी घेण्यासाठी महागडे केमिकल्स उत्पादने वापरतो. पण त्यामुळे चेहरा उजळण्याऐवजी अधिक प्रमाणात बिघडतो. (remove dark spots naturally)
स्वच्छ आणि चमकदार त्वचा आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते. सध्याच्या जीवनशैलीमुळे, वाढते प्रदूषण, त्वचा टॅन होणे ही समस्या सामान्य वाटत असली तरी यामुळे त्वचेचे सौंदर्य बिघडते.(5-minute face glow tips) अनेकदा पार्लरमधील काही केमिकल्स घटक आपल्याला त्वचेला हानी पोहचवतात. ज्यामुळे त्वचा कोरडी, लालसर पडते. पण सोपा घरगुती उपाय केल्यास ३ दिवसांत त्वचा चमकण्यास मदत होईल.(instant glowing skin) सध्या घरोघरी बाप्पाच आगमन देखील होणार आहे. या काळात महिलांना स्वत:कडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. अशावेळी हा ५ मिनिटांचा उपाय केल्यास त्वचा ग्लो होण्यास मदत होईल. (home facial for glowing skin)

गौरीगणपतीच्या सणाची किती कामं, पार्लरला जायलाच वेळ नाही? १५ मिनिटांत ‘एवढं’ करा, चेहरा चमकेल सोन्यासारखा

त्वचा ग्लो करण्यासाठी आपल्याला हळद, कॉफी, मध आणि कच्चे दूध लागेल. एका तव्यावर हळद कोरडी भाजून घ्या. रंग बदलल्यानंतर काढून घ्या. थंड झाल्यानंतर त्यात समप्रमाणात कॉफी पावडर मिक्स करा. यानंतर त्यात चमचाभर मध आणि कच्चे दूध घाला. याची पेस्ट तयार करा. 

टॅन रिमूव्हल पेस्ट वापरण्यापूर्वी चेहरा, मान आणि हात-पाय स्वच्छ पाण्याने धुवा. ही पेस्ट सगळीकडे १५ ते २० मिनिटे लावू ठेवा. हलक्या हाताने घासा. या पेस्टने त्वचेवरील टॅनिंग आणि मृत त्वचा देखील निघून जाईल. तीन दिवस सलग हा उपाय केल्यास फायदा होईल. 

या टॅन रिमूव्हलमध्ये हळद, कॉफी पावडर, मध आणि कच्चे दूध आहे. यामुळे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. या गोष्टी त्वचेवरील डाग देखील कमी करतात. हा सोपा घरगुती उपाय केल्यास सणासुदीत आपली त्वचा सोन्यासारखी ग्लो होण्यास मदत होईल. 

 


Web Title: how to remove dark spots and tanning from face naturally at home festive season skincare tips for instant glow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.