आपण आपल्या त्वचेची सगळ्यात जास्त काळजी घेतो. त्वचेवर अनेक केमिकल्स उत्पादनांचा वापर करतो.(Skin care tips) परंतु, शरीरातील काही भागांकडे आपण कळत-नकळतपणे दुर्लक्ष करतो.(dark neck and elbows remedies) चेहरा, हात-पाय यांची काळजी घेतो. कोपर, मान, गुडघे याकडे लक्ष द्यायला विसरतो. उन्हाळ्यात किंवा वाढत्या धूळ - प्रदूषणामुळे त्वचेचा रंग बदलतो.(how to lighten dark elbows naturally) चुकीच्या जीवनशैलीमुळे, आहारातील कमतरता किंवा त्वचा नीट एक्सफोलिएशन न केल्याने मान आणि कोपर काळवंडतात. (home remedies for dark neck)
ऑफिसला जाताना, पार्टीला जाताना किंवा अगदी साध्या कपड्यांमध्येही, जर मान काळी दिसत असेल तर तो लूक पूर्णपणे बिघडतो.(remove darkness from elbows fast) अशावेळी आपण महागडी क्रीम्स, सिरम्स, लोशन्स वापरतात. पण रिझल्ट मिळेलच याची खात्री नसते. शिवाय हे केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स दीर्घकाळ वापरले तर त्वचेला हानी पोहोचवू शकतात.(natural skin brightening tips with lemon)
आंघोळी दरम्यान मान व्यवस्थित स्वच्छ न केल्याने त्यावर घामाचा आणि घाणीचा थर साचतो. जर बराच काळ मान स्वच्छ केली नाही तर काळपटपणा वाढतो आणि काळ्या रेषा निर्माण होतात. यामुळे अनेकदा आपल्याला मान लपवावी लागते. अनेकदा कॉलर शर्ट किंवा टी-शर्ट सारखे कपडे घालताना देखील लाज वाटते. जर आपली देखील मान- कोपर अधिक काळे झाले असतील तर अर्धा लिंबाचा हा उपाय करुन पाहा.
मानेचा काळपटपणा दूर करण्यासाठी अर्धा लिंबाचा रस एक चमचा मधात मिसळा. हे मिश्रण आपल्या मानेवर लावा. पाच मिनिटे मालिश करा आणि १० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर मान स्वच्छ धुवा. लिंबूमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. यामुळे मानेवरील काळे डाग हळूहळू कमी होण्यास मदत होते. मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत तरते. ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते. लिंबूमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात, जे मानेची त्वचा घट्ट करण्यास मदत करतात.
मधात नैसर्गिक मॉइश्चरायझिंग आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. कोरड्या मानेची त्वचा मऊ आणि चमकवण्यास मदत करते. ते त्वचेला पोषण देते आणि जळजळ- खाज कमी करण्यास मदत करते. मधाचा नियमित वापर केल्याने मानेची त्वचा मऊ आणि गुळगुळीत होते.