रोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्याला त्वचेची काळजी व्यवस्थित घेता येत नाही. आपण चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी हजारो रुपये खर्च करतो, महागडे फेशियल्स आणि नवीन क्रीम्स लावतो.(How to remove dark knees and elbows) पण आपले लक्ष कोपर आणि गुडघ्यांकडे सहसा जात नाही. अनेकदा असं घडत की चेहरा तर अगदी टवटवीत दिसतो पण कोपर आणि गुडघ्यांवरील काळेपणामुळे आपल्याला शॉर्ट ड्रेसेस किंवा स्लिव्ह्जलेस कपडे घालताना आपल्याला संकोच वाटतो. (Get rid of dark elbows in 7 days)
हा काळेपणा धूळ-मातीमुळेच नाही, सतत होणारे घर्षण, कोरडेपणा आणि मृत त्वचेच्या थरामुळे साचतो. अनेक स्त्रिया आणि पुरुष हा काळेपणा घालवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या व्हाईटनिंग क्रीम्सचा आधार घेतात. (Gudghyancha kalepan kasa ghalvaycha) पण याचा परिणाम तात्पुरता असतो किंवा कधीकधी त्यातील केमिकल्समुळे त्वचेला इजा पोहोचते. पण काही घरगुती उपाय केल्यास आठवड्याभरात काळेपणा दूर होईल.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका लिंबाची फोड आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्यावा लागेल. लिंबाच्या फोडीवर थोडा बेकिंग सोडा टाका. तो कोपर किंवा गुडघ्यांवर गोलाकार पद्धतीने ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने घासा. १० मिनिटानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा. यानंतर मॉइश्चरायझर किंवा खोबऱ्याचे तेल लावा.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. हे त्वचेचा रंग उजळण्यास आणि काळे डाग फिके करण्यास मदत करते. बेकिंग सोडा हा उत्तम स्क्रबर आहे. यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते.
आपली त्वचा खूपच संवेदनशील असेल, तर दही आणि बेसन एकत्र करुन त्याचा लेप लावा. यामुळे त्वचा स्वच्छ होते. कोरफडीचा गर रोज रात्री कोपर आणि गुडघ्यांवर लावल्याने तिथला कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा नैसर्गिकरित्या उजळते. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा हा प्रयोग केल्यास तुम्हाला १५ दिवसांत फरक दिसेल. कोपर आणि गुडघ्यांची त्वचा जाड असते, त्यामुळे तिथे लवकर कोरडेपणा येतो. आंघोळीनंतर तिथे नियमित तेल किंवा लोशन लावण्याची सवय लावा.
