Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे कपाळ काळवंडलं? कपाळावरचे टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती 'मॅजिक पॅक' - काळपटपणा होईल गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2026 16:02 IST

how to remove dark forehead naturally : home remedies for dark forehead : यंदाच्या उन्हाळ्यात कपाळावरील काळे डाग आणि टॅनिंग घालवण्यासाठी खास घरगुती ५ उपाय...

अनेकदा असं होतं की, आपण खूप छान तयार होतो, पण आरशात पाहिल्यावर जाणवतं की चेहऱ्याचा रंग एकसारखा नाही आहे. उन्हामुळे कपाळ काळवंडलेलं असतं आणि चेहऱ्याच्या उरलेल्या त्वचेचा रंग वेगळा असतो. त्वचेच्या रंगातील हा फरक अगदी चटकन दिसून येतो. प्रखर ऊन, धूळ आणि प्रदूषणामुळे आजकाल चेहऱ्याचे टॅनिंग होणे फारच कॉमन झाले आहे. अनेकदा आपला चेहरा उजळ दिसतो, पण कपाळाचा भाग मात्र काळवंडलेला आणि रापलेला दिसतो. हा 'अनइव्हन स्किन टोन' आपले सौंदर्य कमी करतो...विशेषतः कपाळाचा भाग सतत सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येत असल्यामुळे तो चेहऱ्याच्या इतर भागांपेक्षा अधिक काळा दिसू लागतो. त्यामुळे चेहरा निस्तेज आणि असमान रंगाचा वाटू शकतो(how to remove dark forehead naturally).

त्वचेच्या रंगातील हा फरक घालवण्यासाठी स्वयंपाक (forehead tanning removal tips) घरातील काही नैसर्गिक पदार्थ अतिशय फायदेशीर ठरतात. काही सोपे आणि नैसर्गिक घरगुती उपाय करूनही त्वचेचा रंग उजळण्यास आणि कपाळावरील काळेपणा कमी करण्यास मदत होऊ शकते. यंदाच्या उन्हाळ्यात कपाळावरील काळे डाग आणि टॅनिंग घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय सर्वात (home remedies for dark forehead) जास्त असरदार आणि फायदेशीर आहेत ते पाहूयात... 

कपाळावरील काळेपणा आणि टॅनिंग घालवण्यासाठी... 

१. मुलतानी माती (Multani Mitti For Forehead) :- मुलतानी मातीमध्ये नैसर्गिकरीत्या 'क्लींजिंग' आणि 'एक्सफोलिएटिंग' गुणधर्म असतात. मुलतानी माती त्वचेची छिद्रे खोलवर स्वच्छ करते, ज्यामुळे साचलेली घाण बाहेर पडते. यामुळे त्वचेचा रंग एकसारखा होण्यास मदत होते. कपाळावरील काळे डाग आणि इतर खुणा फिकट करण्यासाठी मुलतानी माती अत्यंत फायदेशीर ठरते. त्वचेवर जमा होणारे अतिरिक्त तेल शोषून घेतल्यामुळे त्वचा तेलकट दिसत नाही. जेव्हा या सर्व समस्या दूर होतात, तेव्हा त्वचा नैसर्गिकरीत्या उजळू लागते आणि कपाळावरचा काळेपणा हळूहळू कमी होऊन चेहरा तजेलदार दिसू लागतो. दुधात किंवा पाण्यांत चमचाभर मुलतानी माती कालवून त्याचा लेप लावावा. 

उन्हाळ्यात लाडक्या लेकीच्या केसांना नेमकं कोणतं तेल लावावं? केसांची वाढ आणि थंडावा देणारे ३ पर्याय...

२. बेसन आणि कच्च्या दुधाचा जादुई लेप (Gram Flour & Raw Milk Pack) :- कपाळावरील काळेपणा दूर करण्यासाठी आणि संपूर्ण चेहरा उजळवण्यासाठी बेसन आणि कच्च्या दुधाचा लेप अत्यंत फायदेशीर ठरतो. २ चमचे बेसन घ्या. त्यात आवश्यकतेनुसार कच्चे दूध मिसळून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. बेसन त्वचेवरील साचलेली घाण आणि छिद्रांमधील अशुद्धी बाहेर काढण्यास मदत करते. कपाळासह पूर्ण चेहऱ्याचा काळपटपणा दूर करून त्वचा स्वच्छ करण्याचे काम बेसन करते. दुधामुळे त्वचा नैसर्गिकरीत्या एक्सफोलिएट होते, ज्यामुळे डेड स्किन निघून जाते आणि त्वचेचा पोत सुधारतो आणि रंग उजळण्यास मदत होते. हा लेप कपाळावर आणि पूर्ण चेहऱ्यावर लावून १० ते १५ मिनिटे राहू द्या. पूर्णपणे सुकण्यापूर्वी हलक्या हाताने चोळून कोमट पाण्याने चेहरा धुवा.

साडीच्या प्रकारानुसार ‘असा’ शिवा ब्लाऊजचा गळा-साधी साडीही दिसेल लाखांत एक, परफेक्ट लूकची सर्वत्र चर्चा...

३. चंदनाचा लेप (Sandalwood for Forehead) :- उन्हामुळे काळवंडलेल्या कपाळासाठी आणि त्वचेला थंडावा देण्यासाठी चंदन फायदेशीर ठरते. शुद्ध चंदनाची पावडर किंवा उगाळलेले चंदन घ्या. त्यात थोडे गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि कपाळावर लावा. १० ते १५ मिनिटे कपाळावर तसेच ठेवून मग कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. उष्णतेमुळे कपाळावर येणारे बारीक पुरळ किंवा पिंपल्स रोखण्यासाठी चंदन मदत करते. चंदन गुलाब पाण्याचा लेप कपाळावरील काळपटपणा फिकट करण्यास अत्यंत गुणकारी ठरतो.

लालचुटुक डाळिंबाच्या दाण्यांचा फेसस्क्रब! फक्त १५ मिनिटांत येईल पार्लरसारखा ग्लो - खास उपाय-वाचतील तुमचे हजारो रुपये...

४. कच्चे दूध (Apply Raw Milk Daily) :- जर कपाळावरील काळपटपणा नैसर्गिकरीत्या दूर करायचा असेल, तर 'कच्चे दूध' हा सर्वात सोपा आणि रामबाण उपाय आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी थोडे कच्चे दूध एका वाटीत घ्या. कापसाच्या मदतीने हे दूध कपाळावर लावा आणि रात्रभर ते तसेच कपाळावर राहू द्यावं.  सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ धुवा. कच्च्या दुधामुळे कपाळावरील काळपटपणा कमी होण्यास मदत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Remove forehead tan with these home remedies; get even skin tone.

Web Summary : Sun tan on the forehead? Use Multani mitti, besan, sandalwood, or raw milk. These home remedies help to remove tan and even out skin tone naturally and effectively.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसमर स्पेशलहोम रेमेडी