वाढते प्रदूषण, ताण, धूळ आणि सूर्याच्या किरणांमुळे त्वचेवर डाग पडतात.(Skin Care Tips) चेहऱ्यावर घाणीचा थर जमा झाल्याने पिंपल्स किंवा मुरुमांची समस्या सतावते.(Glowing Sking Care) सुंदर दिसण्यासाठी आणि चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण महागडे पार्लर किंवा उत्पादनांचा वापर करतो.(Beauty Tips) परंतु, काहीही केले तरी चेहऱ्यावरील डाग कमी होत नाही.(Homemade skin glow remedies) वेळेवर झोप न घेतल्याने, जास्त प्रमाणात स्क्रीन टाइम वापरल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे जमा होतात.(Dark Circle in eyes) त्वचेवर साचलेली घाण वेळीच स्वच्छ नाही केली तर त्वचेचा रंग खराब होतो.(Natural skincare for pigmentation) अशावेळी त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आपण महागड्या उत्पादनांवर पैसे खर्च करण्यापेक्षा स्वयंपाकघरातील पावडरने त्वचा स्वच्छ केल्यास डाग आणि काळी वर्तुळे निघून जाण्यास मदत होईल. (Remove face spots naturally)
आपल्याला चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणायची असेल तर कॉफी पावडर चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. कॉफीमध्ये असणारे नैसर्गिक घटक त्वचेला एक्सफोलिएट करतात. ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारुन त्वचेला चमक येते. तसेच डार्क सर्कल आणि सुरकुत्या कमी होतात.
1. चेहऱ्यावर कॉफी पावडर लावण्यासाठी त्यात कोरफडीचा गर आणि चिमूटभर हळद मिसळून चेहरा आणि मानेवर लावा. १५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा धुवा, यामुळे टॅनिंग, मृत पेशी आणि पिग्मेंटेशन निघून जाण्यास मदत होईल. आठवड्यातून एकदा हा उपाय करुन बघा.
2. चमचाभर कॉफी पावडरमध्ये अर्धा चमचा ग्लिसरीन आणि बदामाचे तेल मिसळा. नंतर ते चेहऱ्याला लावा. यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स निघून जाण्यास मदत होईल. जर आपली त्वचा तेलकट असेल तर ग्लिसरीनऐवजी गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावर लावा.
3. डोळ्यांच्या समस्या जसे की काळी वर्तुळे असतील. कॉफी पावडरमध्ये मध मिसळून डोळ्यांखाली २० मिनिटे लावा. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे काळे डाग निघून जातील आणि त्वचा अधिक घट्ट होईल.