Join us

काळे डाग-डार्क सर्कलमुळे त्रस्त? दह्यात मिसळा २ गोष्टी; दिसाल सुंदर-काळी वर्तुळे झटक्यात गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2024 10:45 IST

How to Remove Dark Circles at Home Naturally by using Curd : चेहऱ्यावर लावा दही, दिसेल नैसर्गिक तेज; डागरहित चेहऱ्याचं नवं सिक्रेट..

डोळे ही माणसाची ओळख असते (Dark Circle). प्रत्येकाला आकर्षक-सुंदर डोळे हवे असतात. स्क्रीन टायमिंग यासह इतर काही कारणांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळाची समस्या निर्माण होते. शिवाय डार्क सर्कलमुळे सौंदर्यात बाधा निर्माण होते, ते वेगळच. यावर उपाय म्हणून काही जण सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात (Beauty Tips). पण यातील केमिकल रसायनांमुळे डोळे खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आपण दह्याचा देखील वापर करू शकता.

दह्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, साखर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन के, फॅटी ॲसिड्स इत्यादी घटक असतात. जे शरीर आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. पण चेहऱ्यावरील डार्क स्पॉट आणि डार्क सर्कल घालवण्यासाठी दह्याचा वापर कसा करावा? पाहा(How to Remove Dark Circles at Home Naturally by using Curd).

चेहरा आणि डार्क सर्कल घालवण्यासाठी दह्याचा वापर कसा करावा?

चेहरा उजळ आणि डोळ्यांखालील डार्क सर्कल घालवण्यासाठी आपण दह्याचा वापर करू शकता. दह्यातील पोषक घटक चेहऱ्यावरील डार्क स्पॉट कमी करण्यास मदत करतात. काळी वर्तुळे दूर करण्यासाठी आपण दह्यात हळद आणि लिंबाचा रस मिसळून फेस पॅक तयार करू शकता. हळद आणि लिंबाच्या रसातील घटक त्वचेतील पोर्स स्वच्छ करतात.

ऐन तारुण्यात केस पांढरे-टक्कल पडू लागले? रोज गुळासोबत खा मेथी दाणे, केस होतील घनदाट

या फेस पॅकचा वापर करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. नंतर टॉवेलने चेहरा पुसून घ्या. त्यानंतर फेस पॅक चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर चेहरा साफ करा. यामुळे डार्क स्पॉट आणि डार्क सर्कल निघून जातील.

चेहऱ्यावर हळद लावण्याचे फायदे

हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीफंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेची ऍलर्जी, फोड आणि मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करते.

केस घनदाट-त्वचा उजळ हवी? मग खोबरेल तेलात मिसळून लावा २ जादुई गोष्टी, रुप उजळेल

चेहऱ्यावर लिंबाचा रस लावण्याचे फायदे

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात आढळते, जे अँटी एजिंग म्हणून काम करते. यासह चेहऱ्याच्या छिद्रांमधून बाहेर पडणारे तेल नियंत्रित करते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी