आपल्या प्रत्येकाला आपली त्वचा मऊ आणि चमकदार असावी असं वाटतं. पण हाता-पायांवरील नको असलेले केस सौंदर्य नेहमी कमी करतात. हे केस काढण्यासाठी आपण सहसा पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग करतो किंवा घरी रेझरचा वापर करतो.(Unwanted hair removal tips in Marathi) वॅक्सिंग करताना होणाऱ्या वेदना आणि रेझरमुळे त्वचा कोरडी किंवा काळी पडण्याची भीती नेहमीच असते. तसेच केमिकलयुक्त हेअर रिमूव्हल क्रीम्समुळे त्वचेवर रॅशेस येण्याची शक्यता असते. (Home remedies for unwanted hair removal for female)
पण जर आपल्याला वेदनेशिवाय आणि नैसर्गिक पद्धतीने केस काढायचे असतील तर स्वयंपाकघरातील काही घटक अत्यंत प्रभावी ठरु शकतात.(Natural hair removal for legs and arms) या उपायांमुळे फक्त नको असलेले केसच काढू शकत नाही तर त्वचेचा रंग उजळवून तिला आणखी सॉफ्ट करु शकता. हे घरगुती उपाय नियमित केल्यास केसांची वाढ हळूहळू कमी होते आणि त्वचा दीर्घकाळ क्लीन राहते.
बेसन आणि हळदीची पेस्ट त्वचा उजळवण्यास आणि त्वचेवरील केस काढण्यास मदत करते. बेसनात असणारे घटक त्वचेला एक्सफोलिएट करतात तर हळद अँटी-सेप्टिक म्हणून काम करते. ही पेस्ट तयार करण्यासाठी आपल्याला २ चमचे बेसन, अर्धा चमचा हळद, थोडे दूध आणि पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट हाता-पायांवर लावा. १० ते १५ मिनिटानंतर सुकल्यावर हाताने चोळून हा लेप काढा. यामुळे बारीक केस मुळापासून निघण्यास मदत होईल.
मसूर डाळ हा नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करते. यामुळे फक्त केसच निघत नाही तर त्वचेवरील टॅनिंगही दूर होते. यासाठी आपल्याला मसूर डाळ रात्रभर दुधात भिजत घाला. सकाळी ती मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. यात थोडे मध घातल्यास त्वचा अधिक मऊ होते. ही पेस्ट त्वचेवर लावून हलक्या हाताने गोलाकार मसाज करा. हा लेप वाळल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा प्रयोग केल्यावर फरक दिसेल.
साखर आणि लिंबाची पेस्ट हे कोल्ड वॅक्स म्हणून काम करते. २ चमचे साखर, १ चमचा लिंबाचा रस आणि थोडे पाणी एका भांड्यात घेऊन गरम करा. साखर विरघळून त्याचा चिकटपणा तयार झाला की गॅस बंद करा. हे मिश्रण कोमट असतानाच केसांना लावा. त्यावर कापडी पट्टी किंवा वॅक्स पट्टी ठेवून केसांच्या विरुद्ध दिशेने जोरात ओढा. यामुळे वॅक्सिंगसारखेच केस मुळापासून निघतात.
