Join us

टॉवेलच्या मदतीने नाकावरील ब्लॅकहेड्स काढा सेकंदात! विसरा पार्लरची झंझट - त्वचा दिसेल कायम तरुण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2025 14:53 IST

how to remove blackheads at home : simple towel method for blackheads : blackhead removal home remedy : towel trick to remove blackheads : natural way to clean blackheads : घरच्याघरीच टॉवेलच्या मदतीने ब्लॅकहेड्स नेमके कसे काढायचे, असा सोपा ब्यूटी हॅक पाहा...

नाकावर दिसणाऱ्या काळ्याकुट्ट ब्लॅकहेड्सची समस्या आपल्यापैकी अनेकींना सतावते. नाकावरील या ब्लॅकहेड्समुळे आपला संपूर्ण लूकच खराब होऊन जातो. नाकावरील एखादया छोट्या तिळाप्रमाणे दिसणारे ब्लॅकहेड्स दिसताना फारच वाईट दिसतात. शक्यतो, नाकावरील ब्लॅकहेड्स काढणे खूपच कठीण जाते. नाकावरचे ब्लॅकहेड्स दिसायला जरी छोटे असले तरी चेहऱ्याचा पूर्ण लूक बिघडवतात. वारंवार स्क्रब, क्रीम किंवा मास्क वापरूनही ते पूर्णपणे जात ( blackhead removal home remedy) नाहीत. आपल्यापैकी बऱ्याचजणी (simple towel method for blackheads) नाकावरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी पार्लरला जातात, इतकंच नव्हे तर वेगवेगळे उपाय करूनही जेव्हा हे ब्लॅकहेड्स जात नाहीत तेव्हा अक्षरशः हे ब्लॅकहेड्स नकोसे वाटू लागतात. अशावेळी काहीजणी चक्क नखाने - बोटाने दाबून किंवा प्लकिंग करून हे ब्लॅकहेड्स काढतात, परंतु असे केल्याने आपल्या त्वचेला इजा होऊ शकते. यासोबतच, प्रत्येकवेळी ब्लॅकहेड्स काढण्यासाठी पार्लरला जाणे आणि महागड्या ट्रीटमेंट घेणे शक्य होत नाही( how to remove blackheads at home use simple towel method).

यासाठीच, घरच्याघरीच ब्लॅकहेड्स काढण्याची सर्वात सोपी आणि घरगुती ट्रिक पाहूयात. टॉवेलच्या मदतीने आपण अगदी सहज चटकन नाकावरील ब्लॅकहेड्स मिनिटांत काढून स्किन स्वच्छ करु शकतो. टॉवेलच्या मदतीने ब्लॅकहेड्स काढण्याची सर्वात सोपी आणि घरगुती ट्रिक काय आहे ते पाहूयात. या ट्रिकमुळे ब्लॅकहेड्स अगदी सहज आणि फारसे न दुखता सहज त्वचेतून निघतात आणि वारंवार ब्लकहेड्स येण्याचा त्रास फार कमी होतो. घरच्याघरीच टॉवेलच्या मदतीने ब्लॅकहेड्स नेमके कसे काढायचे याची ट्रिक पाहूयात... 

ब्लॅकहेड्स काढण्याची सर्वात सोपी आणि घरगुती ट्रिक... 

१. नाकावरील त्वचेवर खूप लहान काळे आणि पांढरे उंचवटे दिसतात, ज्यामुळे चेहरा खूप खराब दिसतो. अनेकजणी ब्लॅकहेड्सना नखाने दाबून काढण्याचा प्रयत्न करतात, पण असे केल्याने त्वचा आणखी काळी होते. हे ब्लॅकहेड्स त्वचेची छिद्रे बंद झाल्यामुळे तयार होतात, ते खूपच हट्टी असतात आणि त्यांना काढणे सोपे नसते.  

२. टीओआय (TOI) मध्ये छापलेल्या एका बातमीनुसार, टॉवेलच्या मदतीने ब्लॅकहेड्स काढण्यासाठी, सर्वात आधी चेहऱ्याला हलक्या क्लीन्जरने स्वच्छ करा. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावरील मेकअप, सनस्क्रीन आणि धूळ, माती निघून जाते. यामुळे टॉवेल त्वचेवर योग्य प्रकारे काम करू शकतो.

फक्त ७ स्टेप्समध्ये घरीच करा पार्लरसारखा हेअर स्पा! सणावाराला केस दिसतील सुंदर - बदलून जाईल लूक... 

३. एक मऊ आणि स्वच्छ टॉवेल घ्या. तो गरम पाण्यात बुडवा. पाणी इतके गरम असावे की त्यातून वाफ बाहेर येईल. पण, पाणी इतकेही गरम नसावे की, तुमची त्वचा भाजेल. टॉवेल पिळून पाणी काढा आणि १ ते २ मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. तुम्ही पाण्यात लॅव्हेंडर ऑइल किंवा टी ट्री ऑइल देखील घालू शकता.

४. जेव्हा त्वचा गरम आणि मऊ वाटू लागेल, तेव्हा टॉवेल गोलाकार गतीने ब्लॅकहेड्स असणाऱ्या भागांवर हळू हळू घासत रहा. खूप जोरात घासू नका, नाहीतर त्वचा लाल होऊ शकते. हलका दाब पुरेसा आहे. टॉवेलची रचना एक सौम्य एक्सफोलिएटरसारखे काम करते. गरम पाण्याने मऊ झालेले ब्लॅकहेड्स आणि मृत त्वचा काढण्याचे काम करते.

अनन्या पांडे स्किन केअर रुटीनमध्ये न चुकता करते ४ गोष्टी कायम! म्हणून त्वचा दिसते कायम ग्लोइंग... 

५. त्यानंतर, त्वचा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेची छिद्र (pores) बंद होतील आणि त्वचा मऊ राहील.

६. त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी, चेहऱ्यावर एखादे हलके मॉइश्चरायझर (light moisturizer) चांगल्या प्रकारे लावा.

७. त्वचा आणि केसांमधील तेल उशीच्या कव्हरवर चिकटते. अशावेळी, जेव्हा आपण झोपतो, तेव्हा कव्हरवरील तेल तुमच्या चेहऱ्याच्या छिद्रांना लागते आणि त्यांना बंद करते. वारंवार आपल्या त्वचेला स्पर्श करू नका, कारण यामुळे घाण आणि जीवाणू छिद्रांमध्ये आणि त्वचेत पसरतात.

कोणतंही स्ट्रिक्ट डाएट नाही, ना जिम! तरीही भूमी पेडणेकरने केले तब्बल ३५ किलो कमी - पाहा फिटनेसचे सिक्रेट... 

८. आठवड्यातून एकदा तरी त्वचेला एक्सफोलिएट नक्की करा. यामुळे त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये घाण अडकणार नाही.

९. हा उपाय आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळाच करा. जास्त वेळा असे केल्यास त्वचेतील नैसर्गिक तेल (Natural oil) निघून जाऊ शकते, ज्यामुळे त्वचा जास्त प्रमाणात सेबम (sebum) म्हणजेच तेल तयार करू लागते. यामुळे ब्लॅकहेड्स आणखी वाढू शकतात.

पाण्याची वाफ देखील घेऊ शकता... 

पाण्याची वाफ घेतल्याने देखील ब्लॅकहेड्स सैल होतात आणि सहजपणे निघतात. गरम वाफ त्वचेची छिद्रे उघडते, तसेच अडथळा निर्माण करणारे सेबम (sebum), घाण आणि मृत त्वचेच्या पेशी मऊ करते. यामुळे त्यांना काढणे सोपे होते. स्टीम घेतल्याने ब्लड सर्क्युलेशन देखील वाढते, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि त्वचेला बरे होण्यास मदत मिळते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी