शरीरावर नको असलेले केस काढून टाकण्यासाठी आपण महागड्या पार्लरमध्ये जातो. अंडरआर्म्स , अपर लिप्स आणि हातापायावरील केसांची वॅक्सिंग करतो. (Home remedies for dark underarms) पण शरीरावरील कोणत्याही भागाचे वॅक्सिंग करताना आपल्याला प्रचंड वेदनांना सामोरे जावे लागते. काखेत नको असलेल्या केसांमुळे आपल्याला त्रास होतो. यामुळे घाम आणि दुर्गंधीचे प्रमाणात अधिक वाढते.
महिलांना अंडरआर्म्समुळे स्लीव्हलेस कपडे घालण्यासही लाज वाटते.(how to use home remedies for underarms hair removal) अशावेळी बहुतेक महिला अंडरआर्मवरील केस काढण्यासाठी रेझर किंवा वॅक्सिंगचा वापर करतात. (how to keep underarms hair clean without waxing) रेझरचा वारंवार वापर केल्याने त्वचा काळवडते. जर तुम्हालाही काखेतील केस काढायचे असेल तर काही घरगुती उपायाचा वापर करुन पाहा. ज्याच्या मदतीने तुम्हाला अंडरआर्म्सपासून सुटका मिळेल. जाणून घेऊया त्या उपायांबद्दल.
मुरुम,ओपन पोअर्स आणि ब्लॅकहेड्स होतील कमी, तुळशीच्या पानांचा ' असा ' करा उपयोग, समस्या गायब
1. बेसन आणि दही
अंडरआर्म्स वरील नको असलेले केस काढण्यासाठी आपण बेसन आणि दहीचा वापर करु शकतो. यासाठी भांड्यात २ चमचे बेसन, अर्धा चमचा दही आणि दोन चमचे दही घालून जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट अंडरआर्म्सवर लावा. १५ ते २० मिनिटानंतर चोळा आणि कोमट पाण्याने स्वच्छ करा. असे आठवड्यातून २ ते ३ वेळा केल्याने केसच नाही तर अंडरआर्म्सची समस्या देखील दूर होईल.
2. लिंबू आणि मध
काखेतील केस काढण्यासाठी लिंबू आणि मधाचा वापर करु शकता. लिंबू आणि मधाचे मिश्रण केस काढून टाकण्यास मदत करते. तसेच ते त्वचेचा काळा रंग कमी करण्यास मदत करते. एका भांड्यात एक चमचा मध घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस घालून चांगले मिसळा. आता ते अंडरआर्म्सवर लावून १५ ते २० मिनिटे ठेवा. त्यानंतर ओल्या सुती कापडाने हळुवारपणे पुसून धुवा. असे आठवड्यातून १ ते २ वेळा केल्यास वॅक्सिंगची गरज भासणार नाही.
3. बटाटा आणि डाळ
काखेतील नको असणारे केस काढण्यासाठी बटाटा आणि डाळीचा वापर करु शकता. बटाटा हा नैसर्गिक ब्लीचसारखे काम करतो. तसेच त्वचेवरील केस काढून टाकण्यास मदत करतो. त्यासाठी अर्धी वाटी मूग डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी याची पेस्ट तयार करुन त्यात २ चमचे बटाट्याचा रस घाला आणि चांगले मिसळा. ही पेस्ट अंडरआर्म्सवर लावा. सुमारे २० ते २५ मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून १ ते २ वेळा याचा वापर केल्याने नको असलेले केस हळूहळू कमी होतील.