उन्हाळा सुरु झाला की त्वचा काळी पडणे, टॅन होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. सुंदर- डागविरहित त्वचा असावी असं प्रत्येकाला वाटतं.(face pack for dark spots) पण प्रदूषण, ताणतणाव आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे चेहऱ्यावर पिंपल्स, काळे डाग आणि अकाली सुरकुत्या येण्याचे प्रमाण वाढले आहे. बाजारात मिळणारी महागडे केमिकल्स प्रोडॅक्ट आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम करतात.(Step by step guide for glowing skin) पण आयुर्वेदानुसार त्वचेवर मुलतानी माती आणि मध मिसळून लावल्यास त्वचेसाठी जादूई ठरेल. (Natural facial at home)मुलतानी माती ही आपल्या त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि छिद्रे स्वच्छ करते. तर मध हे आपल्या त्वचेचा ओलावा टिकवून ठेवतो आणि त्यातील बॅक्टेरिया नष्ट करतो. जर पिंपल्सचे जुने व्रण किंवा उन्हामुळे झालेली काळी त्वचा यामुळे त्रस्त असाल तर हा घरगुती उपाय आपल्यासाठी रामबाण ठरेल. (Multani Mitti and Honey face pack)
फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
मुलतानी माती - २ चमचे शुद्ध मध - १ मोठा चमचा गुलाब पाणी
कृती
1. सगळ्यात आधी काचेच्या बाऊलमध्ये मुलतानी माती आणि मध एकत्र करा. त्यात गरजेनुसार गुलाब पाणी घालून जाडसर पेस्ट तयार करा. चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करा. नंतर हा पॅक मान आणि चेहऱ्यावर समप्रमाणात लावा. १५ ते २० मिनिटे किंवा अर्धा सुकल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
2. जर आपली त्वचा खूप तेलकट असेल तर थोडा लिंबाचा रस घाला. ज्यामुळे जास्तीचे तेल नियंत्रणात येईल. कोरडी त्वचा असणाऱ्यांनी मुलतानी मातीत अर्धा चमचा दही किंवा कच्चे दूध नक्की मिसळा. हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यास त्वचा कोरडी पडू शकते. पॅक धुतल्यानंतर त्वचेवर चांगले मॉइश्चरायझर किंवा कोरफडीचा गर लावा.
Web Summary : Combat summer skin issues with a Multani Mitti and honey face pack. This Ayurvedic remedy reduces dark spots, controls oil, and adds moisture, revealing naturally glowing skin. Use 2-3 times weekly.
Web Summary : मुल्तानी मिट्टी और शहद के फेस पैक से गर्मियों की त्वचा की समस्याओं से लड़ें। यह आयुर्वेदिक उपाय काले धब्बे कम करता है, तेल को नियंत्रित करता है और नमी जोड़ता है, जिससे प्राकृतिक रूप से चमकदार त्वचा मिलती है। सप्ताह में 2-3 बार प्रयोग करें।