Join us

वॅक्सिंग- थ्रेडिंगची झंझट नको, पाण्यात मिसळून प्या ३ गोष्टी, अंगावरची लव होते कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2025 09:30 IST

natural hair removal tips: reduce body hair naturally: unwanted hair remedies: पाण्यात १ गोष्ट मिसळून त्वचेवर लावल्यास बॉडीवरील केस निघून जाण्यास मदत होईल.

शरीरावरील, हाता-पायांवरील केस काढण्यासाठी आपण वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करतो.(natural hair removal tips) वॅक्सिंग, थ्रेडिंग आणि शेव्हिंग हे शरीरावर नको असणारे केस काढण्याचे काम तर करते पण यासाठी आपल्याला भरपूर पैसे देखील मोजावे लागतात आणि त्रासही सहन करावा लागतो.(reduce body hair naturally) आपला अर्ध्यापेक्षा जास्त वेळ हा शरीरावरील केस काढण्यासाठी जातो. चेहऱ्यावर नको असणारे केस काढण्यासाठी थ्रेडिंग करतो. पण आपली त्वचा अतिसंवेदनशील असल्यामुळे आग होणे, जळजळणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. (unwanted hair remedies)चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी रेझर, थ्रेडिंग, वॅक्सिंग आणि लेझर ट्रिटमेंट केली जाते. रेझरमुळे चेहऱ्यावरील केस जास्त वाढतात आणि दाट होतात. त्यामुळे १५ दिवसांनी पुन्हा त्वचेवर केस येतात.(hair growth control drink) लेझर ट्रिटमेंट महागडी असल्यामुळे आपण काही घरगुती उपाय करतो.(beauty tips for women) पण अनेकदा त्याचाही हवा तसा रिजल्ट आपल्याला मिळत नाही. पण पाण्यात १ गोष्ट मिसळून त्वचेवर लावल्यास बॉडीवरील केस निघून जाण्यास मदत होईल. 

लवंग केसांसाठी संजीवनी! कोरड्या-रुक्ष केसांना 'या' पद्धतीने लावा- महिन्याभरात दिसेल फरक

महिलांच्या चेहऱ्यावर केस येण्याचे मुख्य कारण म्हणजे अँड्रोजन हार्मोन. हा हार्मोन्स शरीरात वाढल्यास बॉडीवरील केस वाढतात.या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे महिलांना पीसीओएससारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ही समस्या टाळण्यासाठी आपण वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगचा वापर करतो. पण याने देखील त्वचेवर वेदना होतात. पण ही सोपी ट्रिक वापरली तर वेदनाही होणार नाही. 

सगळ्यात आधी आपल्याला एक ग्लास गरम पाणी करावे लागेल. त्यात चिमूटभर काळी मिरी घालून ढवळा. पाण्याचा रंग बदलेस्तोवर हे पाणी आपल्याला ढवळायचे आहे. त्यानंतर हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. हे पाणी नियमित प्यायल्याने पचन सुधारण्यास, चयापचय वाढण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. यामुळे श्वसनाच्या  समस्या देखील टाळण्यास मदत होईल. हळदीचे पाणी प्यायल्याने आपल्या बॉडीवरील काळे डाग कमी होण्यास मदत होईल. ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळेल. हे पेय आपल्याला त्वचेचा रंग सुधारते. 

जर आपल्याला चेहऱ्यावर मुरुमांची समस्या अधिक असेल तर आपल्याला दिवसाची सुरुवात हिमालयीन मीठाने करा. कोमट पाण्यात गुलाबी मीठ घालून प्यायल्याने त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल. तसेच मुरुमे देखील कमी होतील. या पाण्यामुळे आपल्याला शरीरातील अँड्रोजन हार्मोन संतुलित राहण्यास मदत होईल. ज्यामुळे त्वचेवरील केस वाढणार नाही.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी