चेहऱ्यावर पिंपल्स येणं ही सामान्य गोष्ट असली तरी जॉ लाईन आणि गालांच्या भागावर वारंवार पिंपल्स येत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. गालावर आणि जॉ लाईनवर येणारे पिंपल्स हे केवळ त्वचेच्या अस्वच्छतेमुळे नाही, तर अनेकदा हार्मोन्समधील बदल, चुकीचा आहार किंवा चुकीच्या सवयींचे लक्षण असतात. विशेषतः जॉ लाईनवर येणारे पिंपल्स हे तुमच्या अंतर्गत आरोग्याविषयी बरेच काही सांगून जातात. अनेकदा हे पिंपल्स दुखरे असतात आणि गेल्यानंतरही त्वचेवर मागे डाग ठेवून जातात(how to reduce small pimples on jawline).
चेहऱ्यावर, विशेषतः जॉलाईनवर (Jawline) अचानक छोटे-छोटे, लालसर पिंपल्स दिसू लागले की आपण महागडे फेसवॉश किंवा सीरम लावायला सुरुवात करतो. पण तज्ज्ञांच्या मते, हे पिंपल्स नेहमीच साधे पिंपल्स नसतात. अनेकदा हे पिंपल्स पिंपल्स आपल्या शरीराच्या अंतर्गत आरोग्याचे, विशेषतः पोटातील बिघाडाचे लक्षण असू शकतात. जर तुम्हालाही हा त्रास होत असेल, तर तुमच्या शरीराला 'डिवर्मिंग'ची (पोटातील जंत साफ करण्याची) गरज असू शकते. मुंबईच्या प्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी या समस्येवर एक खास ७ दिवसांचा आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे, जो आपली त्वचा आतून (home remedies for jawline pimples) स्वच्छ करू शकतो. यासाठी नेमकं करायचं काय आणि हा घरगुती उपाय काय आहे ते पाहूयात...
जॉलाईनवर (Jawline) छोटे-छोटे, लालसर पिंपल्स दिसू लागले की काय करावं ?
१. मॉर्निंग रुटीन :- सकाळी ग्लासभर पाण्यात कडुलिंबाची पावडर किंवा पाने, तुळस आणि काळीमिरी घालून ते एकत्रित उकळून, असे पाणी प्यायचे आहे. हे मिश्रण पोटातील जंत आणि हानिकारक बॅक्टेरिया स्वच्छ करण्यास मदत करते. कारण कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-पॅरासिटिक गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. तुळस पचनसंस्था मजबूत करते आणि काळीमिरी शरीरातील साचलेले टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते आणि त्वचेवर दिसणारे छोटे-छोटे पिंपल्स किंवा पुरळ हळूहळू कमी होऊ लागतात.
२. इव्हिनिंग रुटीन :- संध्याकाळच्या वेळी ग्लासभर पाण्यात ओवा आणि बडीशेप उकळून ते पाणी प्यायचे आहे. याचे कारण असे की, बडीशेपमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पचनसंस्था सुरळीत ठेवतात आणि गॅस किंवा पोटाची सूज कमी करतात. दुसरीकडे, ओवा पोटातील जंत आणि खराब बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करू शकतो. या दोन्ही गोष्टींपासून तयार केलेलं पाणी आतडे स्वच्छ करते, मेटाबॉलिझम सुधारते आणि शरीरातील अंतर्गत घाण बाहेर काढून त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करते.
कतरिना-दीपिका सारखी कर्वी फिगर हवी ? हिरोईनसारख्या किलर फिगरसाठी १० टिप्स - दिसा फिट आणि सुंदर...
पैठणीचा नवा 'रॉयल' ट्रेंड! पिकॉक-पॅरेट बॉर्डर पाहून पडाल प्रेमात - पिढ्यांपिढ्या जपावी अशी पैठणी...
३. नाईट रुटीन :- रात्री झोपण्यापूर्वी एरंडेल तेल (Castor Oil) घेतल्याने पोटातील जंत बाहेर पडण्यास मदत होते. हे तेल आतड्यांची आतून पूर्णपणे स्वच्छता करते आणि एका 'मॅजिक क्लींजर'प्रमाणे काम करते. यामुळे पचनसंस्था हलकी राहते आणि शरीर आतून नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते.
४. आठवड्यातून करायचा खास उपाय :- पपईच्या बियांची पावडर आणि मध एकत्रित खाल्ल्याने देखील पोट आतून स्वच्छ राहते. हे मिश्रण पचनसंस्था मजबूत करते, पोटात साचलेली घाण आणि जंत बाहेर काढण्यास मदत करते आणि आतड्यांचे आरोग्य (Gut Health) अधिक सुधारते.
