Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > १ रुपयाही खर्च न करता त्वचा दिसेल क्लिअर-स्पॉटलेस! चेहऱ्यावरचे पिंपल्स-डाग घालवणारा कडूनिंबाचा उपाय...

१ रुपयाही खर्च न करता त्वचा दिसेल क्लिअर-स्पॉटलेस! चेहऱ्यावरचे पिंपल्स-डाग घालवणारा कडूनिंबाचा उपाय...

how to reduce pimples naturally : neem leaves remedy for pimples : how to reduce pigmentation at home : neem leaves face pack benefits : natural remedy for acne and dark spots : त्वचेवरील पिंपल्स, काळे डाग आणि वांग कमी करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा झटपट उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2026 14:50 IST2026-01-19T14:42:06+5:302026-01-19T14:50:05+5:30

how to reduce pimples naturally : neem leaves remedy for pimples : how to reduce pigmentation at home : neem leaves face pack benefits : natural remedy for acne and dark spots : त्वचेवरील पिंपल्स, काळे डाग आणि वांग कमी करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा झटपट उपाय...

how to reduce pimples naturally neem leaves remedy for pimples how to reduce pigmentation at home | १ रुपयाही खर्च न करता त्वचा दिसेल क्लिअर-स्पॉटलेस! चेहऱ्यावरचे पिंपल्स-डाग घालवणारा कडूनिंबाचा उपाय...

१ रुपयाही खर्च न करता त्वचा दिसेल क्लिअर-स्पॉटलेस! चेहऱ्यावरचे पिंपल्स-डाग घालवणारा कडूनिंबाचा उपाय...

आपल्यापैकी अनेकजणींना त्वचेच्या अनेक समस्या त्रास देतात. चेहऱ्यावर सतत येणारे पिंपल्स, त्यानंतर राहणारे काळे डाग आणि वांग यामुळे त्वचेचा नैसर्गिक उजळपणा कमी होतो. त्वचेवर जर पिंपल्स तसेच पिंपल्स येऊन गेल्यावर त्याचे काळे डाग आणि वांग दिसत असतील तर त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य हरवते आणि आपला पूर्ण लूकच बिघडतो. त्वचेवर जर एकदा पिंपल्स आले तर ते जायचे नावाचं घेत नाहीत आणि गेलेच तर त्याचे काळे डाग त्वचेवर राहतात. अशावेळी, त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी लागते इतकेच नाही तर पिंपल्स व त्याचे काळे डाग आणि वांग घालवण्यासाठी घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरते(neem leaves remedy for pimples).

आपल्या घराच्या आजूबाजूलाच किंवा घराच्या गार्डनमध्ये सहज उपलब्ध असलेली कडुलिंबाची पाने ही एक असरदार आणि नैसर्गिक उपाय ठरू शकतात. अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि रक्तशुद्धी करणारे गुणधर्म असलेल्या कडुलिंबाचा वापर प्राचीन काळापासून त्वचेच्या अनेक समस्यांवर केला जातो. आयुर्वेदात औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाणारी कडुलिंबाची पाने त्वचेसाठी खऱ्या अर्थाने वरदान मानली जातात. अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे कडुलिंब पिंपल्स कमी करण्यास, डाग फिके करण्यास आणि वांगावर अधिक खोलवर जाऊन काम करते. त्वचेवरील पिंपल्स, काळे डाग आणि वांग कमी करण्यासाठी (natural remedy for acne and dark spots) कडुलिंबाच्या पानांचा योग्य वापर कसा करायचा याची साधीसोपी ट्रिक पाहूयात. 

त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी कडूलिंबाच्या पानांचा घरगुती उपाय... 

योग गुरु कैलाश बिश्नोई यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत, त्वचेवरील पिंपल्स, त्याचे डाग आणि वांग कमी करण्यासाठी एक खास घरगुती उपाय शेअर केला आहे. त्वचेवरील पिंपल्स, काळे डाग आणि वांग कमी करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी आपल्याला, १ कपभर कडीपत्त्याची पाने, १ टेबलस्पून बेसन, १ टेबलस्पून हळद इतक्या साहित्याच गरज लागणार आहे. 

प्रेशर कुकरमध्ये करा शिळ्या चपात्या गरम तव्यावर टम्म फुगल्यासारख्या! पाहा एकदम २० चपात्या गरम करण्याची ट्रिक...

सकाळी चेहरा धुण्यासाठी करा ३० सेकंदांचा उपाय! फेसवॉश - साबण नाही तर चमचाभर पीठानेही येईल सेलिब्रिटींसारखा ग्लो... 
 

नेमका 'हा' घरगुती उपाय आहे तरी काय ? 

हा घरगुती फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळ लागणार नाही; आपण अगदी सहजरित्या हा फेसपॅक घरच्याघरीच तयार करु शकता. सर्वात आधी घराभोवती किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या कडुलिंबाच्या झाडाची ताजी पाने तोडून आणा आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात ही पाने घ्या, त्यात थोडे पाणी टाका आणि पाने वाटून त्याचा रस तयार करा. हा तयार झालेला रस एका गाळणीने गाळून एका वाटीत वेगळा काढून घ्या. आता या हिरव्या रसात गरजेनुसार बेसन आणि चिमूटभर हळद मिसळा. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र केल्यावर तुमचा घरगुती फेसपॅक तयार होईल. हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्या आणि साधारण २० ते ३० मिनिटे किंवा सुकेपर्यंत तसाच राहू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

स्पेशल मॅजिक ट्रिक! केसांच्या समस्यांनुसार आवळ्याच्या रसात मिसळून ७ पदार्थ लावा, रुक्ष निस्तेज केस चमकू लागतील...

'हा' घरगुती उपाय कसा आहे फायदेशीर... 

१. कडुलिंबामध्ये नैसर्गिकरीत्या बॅक्टेरियाविरोधी, बुरशीविरोधी,आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे गुणधर्म मुरुम (Acne), पिंपल्स, त्वचेची जळजळ, सूज आणि कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात.

२. कडुलिंबाची पाने त्वचेतील नैसर्गिक तेलाचे प्रमाण संतुलित ठेवतात, ज्यामुळे चेहरा जास्त तेलकट दिसत नाही.

३. ही पाने त्वचेला आतून खोलवर स्वच्छ करतात ज्यामुळे रोमछिद्रे मोकळी होतात आणि त्वचा टवटवीत दिसते.

४. कडुलिंबाची पाने रक्तातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात, त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि निरोगी दिसते.

५. कडुलिंबाची पाने पिंपल्स, फोड, खाज आणि पुरळ यांसारख्या त्वचेच्या समस्यांवर फायदेशीर ठरतात. नियमित वापर केल्यास त्वचेवरील डाग हळूहळू फिके होण्यास मदत होते.


Web Title : नीम से पाएं साफ त्वचा, पिंपल्स और दाग हटाएं, बिना खर्च।

Web Summary : नीम की पत्तियां पिंपल्स, काले धब्बे और दाग-धब्बों के लिए एक प्राकृतिक समाधान हैं। नीम, बेसन और हल्दी से बना एक सरल घरेलू फेस पैक त्वचा को शुद्ध कर सकता है, सूजन को कम कर सकता है और एक स्पष्ट, स्वस्थ रंगत को बढ़ावा दे सकता है।

Web Title : Neem remedy clears skin, removes pimples and spots, costs nothing.

Web Summary : Neem leaves offer a natural solution for pimples, dark spots, and blemishes. A simple homemade face pack with neem, gram flour, and turmeric can purify the skin, reduce inflammation, and promote a clear, healthy complexion.