सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे ज्या तरुणी नवरी होणार आहेत त्या तर त्यांच्या त्वचेबद्दल, सौंदर्याबद्दल विशेष जागरुक आहेतच, पण ज्यांच्या अगदी जवळच्या नातलगाचे, मित्रमैत्रिणींचे लग्न आहेत, त्यांनाही लग्नापर्यंत चेहऱ्यावर मस्त ग्लो हवाच आहे. आता चेहरा छान चमकवायचा असेल तर त्यासाठी पार्लरमध्ये जाऊन महागडे उपचारच केले पाहिजेत, असं मुळीच नाही. काही घरगुती उपाय करूनही तुम्ही चेहऱ्यावरची चमक कायम ठेवू शकता (How to Reduce Open Pores?). त्यासाठी पपईच्या पानांचा हा एक खास उपाय पाहा. ही पानं त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी अतिशय उपयोगी ठरतात.(use of papaya leaves for skin care)
पपईच्या पानांचा त्वचेला होणारा फायदा
पपईच्या पानांचा लेप त्वचेला लावल्यास गालावर, कपाळाच्या भागात असणारे ओपन पोअर्स कमी होतात.
नाकावरचे, हनुवटीवरचे ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्स कमी करण्यासाठीही पपईची पानं खूप उपयुक्त ठरतात.
नॅचरल Botox ट्रिटमेंट देणारं जास्वंदाचं फूल! वय वाढलं तरी चेहरा राहील तरुण- टवटवीत, बघा उपाय
काही जणींच्या चेहऱ्यावर पिंगमेंटेशन असते, वांगाचे काळे डाग असतात. ते कमी करण्यासाठीही पपईच्या पानांचा लेप काही दिवस नियमितपणे लावून पाहा.
पिंपल्स आणि त्यामुळे त्वचेवर पडणारे काळसर डाग कमी करण्यासाठीही पपईच्या पानांचा रस उपयोगी ठरतो.
त्वचेसाठी पपईच्या पानांचा लेप कसा तयार करावा?
पपईची ५ ते ६ पानं आणा आणि ती एकदा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कपड्याने पुसून ती काेरडी करा.
आता पपईच्या पानांचे बारीक तुकडे करा आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका. आता या भांड्यातच अगदी थोडेसे पाणी घाला आणि पपईच्या पानांची बारीक पेस्ट करून घ्या.
अण्णाच्या हॉटेलमध्ये मिळते तशी मऊ, लुसलुशीत इडली घरी होण्यासाठी कोणता तांदूळ वापरावा? बघा टिप्स..
यानंतर पपईची पेस्ट गाळून घ्या. जे पाणी वाटीत जमा झालेलं असेल त्यामध्ये १ चमचा बेसन आणि १ चमचा मध घालून ते कालवून घ्या. हा लेप त्वचेवर लावा आणि १० ते १५ मिनिटे राहू द्या. त्यानंतर हलक्या हाताने मालिश करत लेप धुवून टाका. चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चराईज करा. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करा. त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.
