Lokmat Sakhi >Beauty > ओपन पोअर्स, पिंपल्स वाढल्याने चेहरा थोराड वाटतो? १ सोपी ट्रिक- त्वचा होईल मऊ, तरुण, सुंदर

ओपन पोअर्स, पिंपल्स वाढल्याने चेहरा थोराड वाटतो? १ सोपी ट्रिक- त्वचा होईल मऊ, तरुण, सुंदर

Skin Care Tips: चेहऱ्यावरचे ओपन पोअर्स वाढल्याने तुमचा चेहराही थोराड, कमी वयातच प्रौढ झालेला दिसत असेल तर हे काही उपाय करून पाहा..(how to reduce open pores and pimples?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2025 15:24 IST2025-06-14T15:24:10+5:302025-06-14T15:24:54+5:30

Skin Care Tips: चेहऱ्यावरचे ओपन पोअर्स वाढल्याने तुमचा चेहराही थोराड, कमी वयातच प्रौढ झालेला दिसत असेल तर हे काही उपाय करून पाहा..(how to reduce open pores and pimples?)

how to reduce open pores and pimples, home remedies for radiant glow, instant facial to hide open pores  | ओपन पोअर्स, पिंपल्स वाढल्याने चेहरा थोराड वाटतो? १ सोपी ट्रिक- त्वचा होईल मऊ, तरुण, सुंदर

ओपन पोअर्स, पिंपल्स वाढल्याने चेहरा थोराड वाटतो? १ सोपी ट्रिक- त्वचा होईल मऊ, तरुण, सुंदर

Highlightsओपन पोअर्स कमी होऊन चेहरा एकदम फ्रेश, स्वच्छ, चमकदार झालेला दिसेल. आठवड्यातून एकदा या पद्धतीने त्वचेची काळजी घ्या. 

प्रत्येकाच्याच मागे कामाची प्रचंड धावपळ असते. या धावपळीतून स्वत:साठी वेळ काढणं अनेकांना जमत नाही. महिलांसाठी तर स्वत:साठी वेळ काढणे ही गोष्ट प्रचंड त्रासदायक ठरते. घर, ऑफिस, मुलं, त्यांच्या शाळा, अभ्यास, घरातली कामं, घरातल्या इतर सदस्यांची कामं अशा कित्येक गोष्टी त्यांच्यामागे असतात. या सगळ्या गोंधळातून स्वत:च्या सौंदर्यासाठी वेळ काढणं तर निव्वळ अशक्यच.. त्यामुळेच तर मग कमी वयातच त्वचेवरचे ओपन पोअर्स, सुरकुत्या वाढतात (instant facial to hide open pores ). त्यामुळे मग वय कमी असलं तरी चेहरा थोराड, वयस्कर दिसू लागतो (home remedies for radiant glow). असं तुमच्याही चेहऱ्याच्या बाबतीत झालं असेल तर घरच्याघरी अगदी कमी वेळेत हा एक अतिशय सोपा उपाय करून पाहा.(how to reduce open pores and pimples?)

 

त्वचेवरचे ओपन पोअर्स वाढले असतील तर..

१. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे एका भांड्यामध्ये बर्फाचे पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला शक्य होईल तेवढ्याच सेकंदासाठी तुमचा चेहरा बुडवून ठेवा. असं दोन ते तीन वेळा करा.

पपईचं फक्त १ पान खुलवेल तुमचं सौंदर्य! टॅनिंग जाऊन त्वचा उजळेल, चेहऱ्यावरचे डाग, ॲक्नेही जातील

हे शक्य नसेल तर एका कपड्यामध्ये बर्फ गुंडाळा आणि तो कपडा तुमच्या चेहऱ्यावरून फिरवून चेहऱ्याला आईस मसाज द्या. 

२. यानंतर फ्रिजमध्ये ठेवलेलं थंडगार कच्चं दूध घ्या आणि या दुधाने चेहऱ्याला एखाद्या मिनिटासाठी मसाज करा. यामुळे त्वचा छान मॉईश्चराईज आणि हायड्रेटेड होण्यास मदत होईल. 

 

३. यानंतर पिठीसाखर आणि मध हे दोन पदार्थ एकत्र करा आणि त्याने त्वचेला मालिश करा. यामुळे त्वचेवरचे टॅनिंग, डेडस्किन निघून जाईल. साखरेमुळे त्वचा जास्त फ्रेश आणि चमकदार होण्यास मदत होते. तसेच मधामुळे त्वचा हायड्रेटेड, मऊ होते.

बिनसाखरेच्या चहा, कॉफीमुळे वजन कमी होतं? डॉक्टर सांगतात साखरेमुळे नाही 'या' पदार्थामुळे वाढतं वजन 

४. आता सगळ्यात शेवटी बेसन, कॉफी, मध आणि दूध हे पदार्थ एकत्र करा आणि त्याचा लेप चेहऱ्याला लावा. १० ते १२ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. ओपन पोअर्स कमी होऊन चेहरा एकदम फ्रेश, स्वच्छ, चमकदार झालेला दिसेल. आठवड्यातून एकदा या पद्धतीने त्वचेची काळजी घ्या. 


 

Web Title: how to reduce open pores and pimples, home remedies for radiant glow, instant facial to hide open pores 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.