Lokmat Sakhi >Beauty > सतत एसीमध्ये बसून त्वचा व केस कोरडे झाले? १ खास ट्रिक, एसीमुळे त्वचेचं नुकसान टाळा...

सतत एसीमध्ये बसून त्वचा व केस कोरडे झाले? १ खास ट्रिक, एसीमुळे त्वचेचं नुकसान टाळा...

How to Reduce Indoor Humidity Using Your AC 1 Best Ways : House Feels Humid With AC Running? This is How To Fix It : How to remove humidity from room with AC : ए.सी मुळे त्वचा आणि केसांच्या समस्या वाढू नयेत म्हणून करा १ घरगुती सोपी ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2025 16:50 IST2025-05-31T16:30:11+5:302025-05-31T16:50:26+5:30

How to Reduce Indoor Humidity Using Your AC 1 Best Ways : House Feels Humid With AC Running? This is How To Fix It : How to remove humidity from room with AC : ए.सी मुळे त्वचा आणि केसांच्या समस्या वाढू नयेत म्हणून करा १ घरगुती सोपी ट्रिक...

How to Reduce Indoor Humidity Using Your AC 1 Best Ways House Feels Humid With AC Running This is How To Fix It How to remove humidity from room with AC | सतत एसीमध्ये बसून त्वचा व केस कोरडे झाले? १ खास ट्रिक, एसीमुळे त्वचेचं नुकसान टाळा...

सतत एसीमध्ये बसून त्वचा व केस कोरडे झाले? १ खास ट्रिक, एसीमुळे त्वचेचं नुकसान टाळा...

घर, असो किंवा ऑफिस कुठेही गेलं तरी ए. सी असतोच. वातावरणातील बदल, प्रचंड प्रमाणात होणारी गरमी, वाढती उष्णता यामुळे सध्याच्या काळात दिवसेंदिवस एअर कंडिशनर (A.C.)चा वापर वाढत चालला आहे. घामाघूम झालेले शरीर थंड करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाचं ए.सी लावून बसणेच (House Feels Humid With AC Running? This is How To Fix It) फार सोयीचे वाटते. आपल्यापैकी काहीजण असे आहेत जे ऑफिस, घर असे संपूर्ण दिवसाचे २४ तास ए.सी मध्येच असतात. ए.सी ची (How to remove humidity from room with AC) हवा आपल्याला थंडावा देऊन मन शांत करते, सुखद अनुभव देते. ए.सी लावून तासंतास बसणे आरामदायक वाटत असले तरी देखील त्याचे काही दुष्परिणाम आहेत(How to Reduce Indoor Humidity Using Your AC 1 Best Ways).

विशेषतः त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर त्याचा फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होताना दिसतो. सतत ए.सी.च्या हवेमध्ये राहिल्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि रखरखीत  होते, तर केस देखील कोरडे, कमकुवत होऊन अगदी सहज तुटतात. ए.सी मुळे त्वचा आणि केसांवर होणारे हे परिणाम हळूहळू दिसत असले तरी देखील  तरी त्याचा दीर्घकालीन प्रभाव लक्षात घेता आपण सजग होणे आवश्यक आहे. ए.सी मुळे होणाऱ्या त्वचा आणि केसांच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपाय करणे गरजेचे असते. 

 ए.सी मुळे त्वचा आणि केसांच्या समस्या वाढू नयेत म्हणून...

ए.सी.ची हवा खोलीतील नैसर्गिक ओलावा शोषून घेते, त्यामुळे खोलीचे वातावरण कोरडे (ड्राय) होते. अशा वातावरणात सतत राहिल्यामुळे आपल्या त्वचेतील आणि केसांतील नैसर्गिक आर्द्रता (ओलावा) कमी होऊ लागते. यामुळे त्वचा कोरडी, खरखरीत व निस्तेज होते. तसंच केसही कोरडे, कमकुवत होऊन सतत तुटतात. काहीवेळा त्वचेला खाज येणे, केस गळणे किंवा केसांमध्ये चमक कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यासाठीच, ए.सी च्या हवेचा आपल्या त्वचा आणि केसांवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून, masalakitchenbypoonam या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक सोपा उपाय सांगितला आहे. 

लग्नात केस सुंदर दिसावेत म्हणून दीपिका पादुकोणने वापरला होता 'हा' घरगुती हेअर स्प्रे...

नेमका हा उपाय काय आहे ते पाहूयात ?

सतत दिवसभर एकाच खोलीत ए.सी लावून बसल्याने जर तुमचे देखील केस आणि त्वचा रुक्ष, निस्तेज, रखरखीत होत असेल तर हा उपाय कराच. ए.सी लावल्याने खोलीतील वातावरण कोरडे होऊ नये, वातावरणात ओलावा टिकून राहावा यासाठी एका मोठ्या पसरट बाऊल किंवा डिशमध्ये पाणी घेऊन ते पाणी ए.सी च्या बरोबर खाली किंवा खोलीच्या एका कोपऱ्यात ठेवून द्यावे. 

जास्वंदीच्या पानाफुलांचा हेअर मास्क पावसाळ्यात करतो केसांवर जादू, कोरडे-राठ केस होतात मऊमऊ सुंदर...

अभिनेत्री रोशनी चोप्रा करते हा खास उपाय, डोळ्यांचा थकवा-डल स्किन होईल मिनिटांत गायब-दिसाल सुंदर...

जेव्हा तुम्ही खोलीत ए.सी. चालू असताना एका बाऊलमध्ये पाणी ठेवता, तेव्हा त्या पाण्यातून हळूहळू वाफ तयार होऊ लागते. ही वाफ हवेमध्ये मिसळून हवेमधील आर्द्रतेचा स्तर (humidity level) थोडा वाढवते. यामुळे ए.सी च्या हवेत जरी कमी आर्द्रता असली तरी पाण्यामुळे काही प्रमाणात खोलीत ओलावा टिकून राहतो. त्यामुळे त्वचा व केसांवर होणारा कोरडेपणाचा परिणाम कमी होतो.

जर आपण नीट पाहिले तर आपल्या हे लक्षात येईल की,  दोन-तीन दिवसात हे बाऊलमधील पाणी संपून जातं, याचा अर्थच असा की, ते पाणी वाफ होऊन हवेमध्ये मिसळतंय आणि खोलीत ओलावा टिकून राहण्यास मदत करते. ही एक नैसर्गिक humidifier सारखी युक्ती आहे. सोपी, स्वस्त आणि घरच्याघरीच  करता येणारी!


Web Title: How to Reduce Indoor Humidity Using Your AC 1 Best Ways House Feels Humid With AC Running This is How To Fix It How to remove humidity from room with AC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.