आपल्या केसांचे सौंदर्य म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सगळ्यात मोठा भाग. आपलेही केस लांब- काळेभोर असावे असं प्रत्येकाला वाटतं. पण सध्याच्या धावपळीच्या, तणावाच्या आणि प्रदूषणाच्या काळात केसांची काळजी घेणं आपल्याला सगळ्यात जास्त अवघड वाटतं.(Hair oil for thick hair) दिवसभर बाहेर राहिल्याने धूळ, घाण, गरम हवा आणि चुकीच्या तेलांच्या वापरामुळे केस गळतात, कोरडे होतात आणि टाळूची त्वचा सुद्धा कमजोर होते. बऱ्याच वेळा आपण केसांसाठी महागडी सिरम्स, स्पा आणि केमिकल ट्रीटमेंट करुन पाहतो. पण काही दिवसांनी पुन्हा तिच समस्या आपल्यासमोर उभी राहते. केस तुटतात, गळतात आणि केसांची दाटी कमी होत जाते.(Reduce hair fall naturally)
दिवाळीत चेहरा उजळ-चमचमता हवा? आजच गुलाबाच्या पानात ३ पदार्थ मिसळून लावा- दिवाळीची चमक चेहऱ्यावर येईल
आपल्या आजी-आईच्या काळात असं नव्हतं. त्या आठवड्यातून दोनदा केसांना भरपूर तेल चोळायच्या. ज्यामुळे केसांची निगा व्यवस्थित राखली जायची.(Coconut oil benefits for hair) नारळाचं तेल म्हणजे घराघरातलं सौंदर्याच रहस्य. हे तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतं, टाळूतील कोरडेपणा दूर करतं आणि केसांना नैसर्गिक चमक देते. सध्या बाजारात विविध प्रकारचे तेल केसांसाठी पाहायला मिळतात.(Hair care tips in Marathi) पण याने केसांची वाढ होण्याऐवजी ते अधिक गळतात. जर आपल्यालाही केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर नारळाच्या तेलात काही पदार्थ मिक्स करुन केसांना लावल्यास फायदा होईल.
सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ शिजवून घ्यावा लागेल. तो शिजल्यानंतर तांदूळ पाण्याने मॅश करा, त्यात नारळाचे तेल घाला आणि केसांना लावा. २ ते ३ मिनिटे केसांना मालिश करा. कमीत कमी २० मिनिटे केसांवर तसेच राहू द्या. या तेलाने केसांना आठवड्यातून दोनदा मालिश करा. हे मिश्रण लावल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि ते मजबूत होतात. केसांना नैसर्गिक चमक येते आणि ते अधिक मुलायम होतात.
शिजवलेल्या भातामध्ये स्टार्च आणि आवश्यक पोषक घटक असतात.हे केसांना नैसर्गिकपणे मजबूत करतात. त्यांच्या मुळांना पोषण देऊन अधिक मऊ बनवतात. भातामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असते जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.