काही जणांची तब्येत अगदी स्लीम असते. पण तरीही त्यांच्या हनुवटीच्या खाली जास्तीची चरबी साचलेली दिसते. यालाच आपण डबल चीन असं म्हणतो. अशी डबलचीन ज्यांना असते त्यांचा चेहरा खूप प्रौढ दिसायला लागतो. जॉ लाईन पुर्णपणे गेलेली असते. त्यामुळे हे लोक कमी वयातच वयस्कर वाटायला लागतात. अंगकाठी सुडौल असली तरी मग असे लोक डबलचीनमुळे जाड, लठ्ठ वाटतात. म्हणूनच डबल चीन कमी करण्यासाठी आणि आहोत त्यापेक्षा जास्त तरुण दिसण्यासाठी हे काही उपाय करून पाहा (simple exercise for getting perfect jaw line). यामुळे तुम्हाला अगदी परफेक्ट जॉ लाईन मिळेल.(how to reduce double chin to get perfect jaw line?)
डबल चीन किंवा हनुवटीच्या खाली असणारी चरबी कशी कमी करावी?
डबल चीन कमी करण्यासाठी कोणता सोपा उपाय करता येऊ शकतो, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ faceyoga.eva या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
किचनमधला पसारा काही केल्या कमी होईना? ४ टिप्स- स्वयंपाक घर नेहमीच दिसेल टापटीप- आवरलेलं
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की तुमचे खालचे दात वर घ्या आणि त्यांनी तसेच खालच्या ओठाने वरचा ओठ पुर्णपणे झाकून टाकण्याचा प्रयत्न करा. यानंतर मान वर करून आकाशाकडे बघा. असं साधारण ५ मिनिटांसाठी करून ठेवा. यामुळे डबलचीन तसेच गळ्यावरची चरबी कमी होऊन जॉ लाईन परफेक्ट होण्यास मदत होईल.
डबल चीन कमी करण्यासाठी हे उपायही करून पाहा
१. नियमितपणे भुजंगासन केल्याने डबलचीन कमी होऊ शकते.
२. मान खालून वर आणि वरून खाली या पद्धतीने हलविणे.
तुमचा सगळा स्ट्रेस, थकवा १ मिनिटात पळूवन लावणारा खास उपाय, ताठ बसा आणि फक्त....
३. क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने मान गोलाकार फिरवणे.
४. डोकं वर करून छताकडे पाहणे आणि त्याचवेळी खालचे दात वरच्या दातांवर ठेवून चावताना जशी तोंडाची हालचाल होते तसे करणे.