सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपल्याला आरोग्याकडे लक्ष देता येत नाही.(skin care tips) त्यामुळे त्याचा परिणाम दिसून येतो. चेहरा हा आपले आरोग्य दर्शवितो.(dark circle issue) सततचा स्क्रीन टाइम, लॅपटॉप, मोबाइल आणि टीव्ही यामुळे डोळ्यांवर अधिक ताण येतो.(Under-eye solution) चेहऱ्याचा रंग बदलू लागतो. सध्या अनेकांमध्ये डार्क सर्कलची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.(Dull face glow up)
कमी वयात चष्मा लागणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार होणे अशी समस्या उद्भवते.(Home remedy for eye bags) बदलेल्या जीवनशैलीमुळे, डोळ्यांची निगा न राखल्यामुळे डोळे कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. काळी वर्तुळे घालवण्यासाठी आपण अनेक महागडे उत्पादने वापरतो.(15-minute skincare tip) ज्याचा वाईट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. पण काही घरगुती उपायांचा वापर करुन डार्क सर्कलपासून सुटका मिळवू शकता.
फक्त सात दिवस करा हा एक उपाय, चेहरा दिसेल नितळ-चमकदार-फेशियलचीही गरज पडणार नाही
डोळ्यांखाली असणारे काळी वर्तुळे घालवण्यासाठी आपण पुरेशी झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे. काळी वर्तुळे आणि डाग घालवण्यासाठी आपण क्रीम्स लावतो. पण यामुळे डाग अधिक वाढतात. अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास रासायनिक डार्क सर्कल्स रिमूव्हल उत्पादनांपेक्षा चांगले असतात. रसायनांमुळे डोळ्यांना नुकतान होते, पण लालसरपणा, ऍलर्जी आणि सूज यांसारख्या समस्या वाढतात.
इंस्टाग्रामवरील एका कंटेंट क्रिएटरने काळी वर्तुळे घालवण्यासाठी सोपा घरगुती उपाय सांगितला आहे. त्यांने सांगितलं की, डोळ्यांखालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी फक्त बटाट्याची गरज नाही तर त्याची सालं देखील फायदेशीर आहे. बटाट्याची साले कचरा समजून फेकून देण्याऐवजी त्याचा योग्य प्रकारे वापर करायला हवा.
काळी वर्तुळे घालवण्यासाठी आपण बटाट्याच्या सालीचा रस काढायला हवा. हा रस डोळ्यांखाली काळी वर्तुळे असणाऱ्या भागावर १५ मिनिटे लावा. त्यानंतर आपला चेहरा धुवा. काळी वर्तुळे कमी आणि डोळ्यांखाली असणारी सूजही कमी होईल. बटाट्याच्या सालीमध्ये ब्लीचिंगचे गुणधर्म असतात. जे टॅनिंग आणि डाग हलके करण्यास मदत करतात. याच्या मदतीने आपण काळे डाग घालवू शकतो. इतकेच नाही तर बटाट्याच्या सालीमध्ये नैसर्गिक एंजाइम असतात. जे त्वचा स्वच्छ आणि एकसारखी ठेवण्यास मदत करतात. यामुळे त्वचेचे रंगद्रव्य कमी होते आणि त्वचेचा रंग सुधारतो.