अनेकांच्या डोळ्यांखाली काळे डाग, वर्तुळ आणि सूज आपल्याला पाहायला मिळते. ही आजकाल अनेकांची मोठी तक्रार बनली आहे. अपुरी झोप, मोबाईल- लॅपटॉपचा अतिवापर, ताणतणाव, चुकीचा आहार आणि वाढतं प्रदूषण याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांभोवतालच्या नाजूक त्वचेवर होतो.(dark circles treatment) डोळ्यांखालची त्वचा खूप पातळ असल्यामुळे तिथे लवकर डार्क सर्कल्स, सूज आणि थकवा दिसू लागतो.(under eye puffiness) अनेकजण काळे वर्तुळ घालवण्यासाठी काकडी, बटाटा किंवा महागडे आय क्रीम वापरतात, पण त्याचा परिणाम कायमस्वरुपी होत नाही. (home remedy for dark circles)
डार्क सर्कल्स येण्यामागे अनेक कारण असू शकतात. शरीरातील पाण्याची कमतरता, सततचा मानसिक ताण आणि डोळ्यांवरील ताण यामुळे रक्ताभिसरण मंदावते.(natural remedies for under eye bags) ज्यामुळे डोळ्यांखालील त्वचा काळी पडू लागते. डार्क सर्कल घालवण्यासाठी आपण काकडी, बटाट्याचा वापर करतो. पण त्याऐवजी हा सोपा घरगुती उपाय करुन पाहिल्यास आठवड्याभरात आपल्याला फरक जाणवेल.
काकडी, बटाटाऐवजी आपण डोळ्यांच्या खाली कोरफडीचा गर लावू शकतो. कोरफड त्वचेसाठी नैसर्गिक औषध मानले जाते. यात अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट आणि हायड्रेटिंग गुणधर्म आहेत जे डोळ्यांखालची सूज कमी करण्यास मदत करते. तसेच त्वचेला थंडावा देऊन डाग हलके करण्यास मदत करतात. काळे वर्तुळ घालवण्यासाठी डोळ्यांखाली कोरफडीचा गर कसा लावायला हवा पाहूया.
कोरफडीचा जेल लावण्यासाठी सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवा. यानंतर चेहरा कोरडा करावा लागेल. नंतर आपल्याला डोळ्यांखाली ताजे कोरफडीचा जेल लावा. नंतर हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर हे डोळ्यांखाली राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ पाण्याने डोळे धुवा. हा उपाय आठवड्यातून तीन वेळा केल्यास फायदा होईल.
कोरफड हे केवळ त्वचेच्या बाहेरील सौंदर्यासाठी फायदेशीर नाही तर त्वचेला आतून देखील पोषण देते. त्वचेला नैसर्गिकरित्या रिपेअर करण्यास मदत करते. तसेच अतिसंवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी पॅच टेस्ट करणं आवश्यक आहे. यासोबतच आपला आहार आणि झोपेकडे देखील लक्ष द्या. कॅफिन किंवा मद्यपानचे सेवन प्रमाणात करा.
