Join us

डार्क सर्कल्स वाढल्याने डोळे खोल गेल्यासारखे दिसतात? करा बटाट्याचा ‘हा’ उपाय- काळी वर्तुळं गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2025 18:06 IST

Home Hacks To Get Rid Of Dark Circles: डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे खूप वाढली असतील तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून पाहा.. (use of potato juice for reducing dark circles)

ठळक मुद्देपुढे सांगितलेले काही उपाय नियमितपणे करून पाहा, डार्क सर्कल्स कमी होतील.

बऱ्याच जणींच्या बाबतीत असं दिसून येतं की डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे खूप जास्त वाढलेली असतात. यामुळे मग त्या व्यक्ती आजारी, निस्तेज, उदास दिसू लागतात. कारण डार्क सर्कल्स एवढे वाढलेले असतात की त्यामुळे डोळेही खोल गेलेले दिसतात. डोळ्यांभोवतीची वर्तुळे वाढण्यासाठी अनेक गोष्टी जबाबदार आहेत. पाणी योग्य प्रमाणात पिणे, हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळं पुरेशा प्रमाणात खाणे, रात्रीचे जागरण टाळणे, स्क्रिन टाईम कमी करणे अशा अनेक गोष्टी केल्या तर डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे निश्चितच कमी होऊ शकतात (use of potato juice for reducing dark circles). त्यासोबतच पुढे सांगितलेले काही उपायही नियमितपणे करून पाहा (home hacks to get rid of dark circles). यामुळेही डार्क सर्कल्स कमी होतील.(how to reduce dark circle?)

डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी काय उपाय करावे?

 

१. बटाट्याचा रस

बटाट्यामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स आणि काही असे एन्झाईम्स असतात जे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. हा उपाय करण्यासाठी बटाटा किसून घ्या आणि नंतर त्याचा किस घट्ट पिळून रस काढून घ्या.

आईबाबांनी नकळत केलेल्या २ गोष्टी मुलांचा आत्मविश्वास कमी करतात, मुलं होतात कुढी-अबोल-बुजरी

यानंतर बटाट्याच्या रसामध्ये कापसाचा बोळा बुडवून घ्या आणि तो डोळ्यांच्या भोवती ५ ते ७ मिनिटांसाठी ठेवा. रात्री झोपण्यापुर्वी हा उपाय केला तरी चालेल. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा. डार्क सर्कल्स कमी होतील.

 

२. बटाटा आणि लिंबाचा रस

बटाटा आणि लिंबाचा रस हे दोन्ही पदार्थ नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखले जातात. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये बटाट्याचा रस घ्या.

एक केसर चाय की प्याली हो! रिमझिम पावसात प्या केशर चहा, मन आनंदी करणारी स्पेशल चहा रेसिपी

२ चमचे बटाट्याचा रस असेल तर त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा गुलाबपाणी टाका. या पाण्यामध्ये आता कापसाचा बोळा बुडवून हलकासा पिळून घ्या. त्यानंतर तो डोळ्यांवर ठेवा. ५ ते ७ मिनिटांनी डोळे धुवून टाका. बटाट्याचा रस, लिंबाचा रस आणि गुलाबजल यांचा एकत्रित परिणाम होऊन डोळ्यांखालची काळी वर्तुळं कमी होण्यास निश्चितच मदत होईल.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी