हिवाळ्याच्या दिवसांत बहुतांश लोकांना जाणवणारी एक समस्या म्हणजे तळपायांना पडणाऱ्या भेगा. काही जणींना तर वर्षभर तळपायाला भेगा दिसतात. पण हिवाळ्याच्या दिवसांत मात्र त्या भेगांचे प्रमाण खूप जास्त वाढते. बऱ्याचदा तर भेगा एवढ्या वाढतात की चालताना त्या अक्षरश: खूप दुखतात आणि त्यातून रक्तही येते. या भेगा कमी करण्यासाठी बाजारात कित्येक महागडे क्रिम मिळतात. पण आता क्रॅक हिल क्रिमवर पैसे वाया घालविण्यापेक्षा घरातलंच साहित्य वापरून एक खास क्रिम घरी तयार करा. हे क्रिम तुमच्या तळपायांच्या भेगा खूप जलदपणे कमी करेल..(home made cream to get relief from cracked heel)
तळपायांना पडलेल्या भेगा कमी करण्यासाठी उपाय
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये २ चमचे मोहरीचं तेल घ्या. मोहरीचं तेल नसेल तर खोबरेल तेल घेतलं तरी चालेल. यानंतर त्यामध्ये १ चमचा ग्लिसरीन, १ चमचा व्हॅसलिन आणि मध्यम आकाराच्या मेणबत्तीचा ३ ते ४ सेमीचा तुकडा टाका.
नव्या नवरीसाठी लेटेस्ट फॅशनचं मंगळसूत्र घ्यायचंय? ८ सुंदर डिझाईन्स- कमी वजनात घ्या ठसठशीत डिझाईन्स..
आता हे सगळे पदार्थ एकत्रितपणे गॅसवर गरम करायला ठेवा. काही सेकंदातच सगळे पदार्थ वितळून एकजीव होतील. यानंतर गॅस बंद करा आणि हे मिश्रण कोमट झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीत काढून घ्या. आता रोज रात्री झोपण्यापुर्वी पाय स्वच्छ धुूवा. टाचांना हे क्रिम लावा आणि त्यानंतर सॉक्स घालून झोपा. काही दिवसांतच टाचांमध्ये खूप चांगला फरक दिसून येईल..
ही काळजीही घ्या..
१. हिवाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळेही त्वचेचा कोरडेपणा वाढत जातो. तळपायांच्या भेगा वाढण्याचे ते एक कारणही आहेच. त्यामुळेच या दिवसांत पाणी पुरेशा प्रमाणात प्या.
हिवाळ्यातलं स्वस्तात मस्त टॉनिक म्हणजे 'ही' ५ फळं, सततची आजारपणं टळून सौंदर्यही खुलेल..
२. संत्री, मोसंबी, आवळा, काकडी अशी शरीर हायड्रेटेड ठेवणारी फळं याेग्य प्रमाणात खा.
३. या दिवसांत घरात सॉक्स, चप्पल अवश्य घाला. कारण जमिनीचा थंडावा थेट पायाला लागत नाही आणि त्यामुळे पायांच्या भेगा वाढत नाहीत.
