Join us

पायाचे घोटे काळवंडून खूपच घाण दिसू लागले? ३ उपाय- ५ मिनिटांत घोटे होतील स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2025 14:09 IST

Tips For Cleaning Dark Ankles: पायाचे घोट काळे पडून त्यांच्यावर घट्ट पडले असतील तर लगेचच हे काही उपाय करून पाहा..(how to get rid of tanned ankle?)

ठळक मुद्देहा उपाय काही दिवस रोज केला तरी २- ३ दिवसांतच पायाचे घोटे स्वच्छ होतील. 

रोजच्या रोज आपण आंघोळ करतो. पण तरीही शरीराचे काही भाग अस्वच्छ राहतात. कारण त्यांना आणखी थोड्या स्वच्छतेची गरज असते. त्यापैकी एक म्हणजे पायाचे घोटे. ज्याप्रमाणे गुडघे, हाताचे कोपरे, मान हे शरीराचे भाग काळवंडून जातात, त्याचप्रमाणे अनेक जणांचे पायाचे घोटेही काळवंडलेले दिसतात. काही जणांचे घोटे तर एवढे जास्त काळे पडलेले असतात की तिथली काळवंडलेली त्वचा कडक झालेली असते. अशा पद्धतीचे काळवंडलेले घोटे स्वच्छ करणं खूप कठीण जातं (how to get rid of tanned ankle?). त्यामुळेच ते काळे पडायला सुरुवात झाली की लगेच हे काही उपाय करा (Tips to get rid of dark ankles). काही मिनिटांतच घोटे स्वच्छ होतील.(how to reduce blackness of ankle?)

पायाचे घोटे काळवंडून घाण झाले असल्यास काय उपाय करावे?

 

१. बटाटा आणि लिंबू

लिंबू आणि बटाट्याचा रस हे दोन्हीही काळवंडलेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात.

शिळ्या पोळ्या कुकरमध्ये ठेवा आणि जादू पाहा! १ मिनिटांत होतील ताज्या पोळीसारख्या गरमागरम

त्यामुळे एक मध्यम आकाराचा बटाटा घेऊन तो किसा आणि त्याचा रस काढा. बटाट्याच्या रसामध्ये काही थेंब लिंबाचा रस घालून घोट्यांवर लावा. एखाद्या मिनिटाने स्क्रबर घेऊन तो भाग घासून घ्या. घोट्यांचा काळेपणा बऱ्यापैकी कमी झालेला असेल.

 

२. कोरफडीचा गर

कोरफडीच्या पानांचा ताजा गर काढून घ्या. त्यामध्ये १ चमचा कॉफी पावडर आणि १ चमचा पिठीसाखर घाला.

वाळून गेलेल्या रोपालाही फुटेल नवी पालवी! घरीच करा 'हे' खत- फक्त ५ दिवसांतच दिसेल फरक

हा लेप व्यवस्थित कालवून पायाच्या घोट्याला लावून मसाज करा. एक ते दिड मिनिटे मसाज केल्यानंतर पाय धुवून टाका. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा.

 

३. बेसन पीठ

एका वाटीमध्ये १ चमचा बेसन पीठ घ्या. त्यामध्ये १ चमचा दही आणि चिमूटभर हळद घाला. सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि पायाच्या घोट्याला लावा.

Mother's Day wishes marathi: आईसाठी प्रेमाचा शुभेच्छा संदेश! आईला सांगा, तिचं प्रेम आभाळाएवढं..

एखाद्या मिनिटांत लेप थोडा सुकत आल्यावर हाताने चोळून काढून टाका. हा उपाय काही दिवस रोज केला तरी २- ३ दिवसांतच पायाचे घोटे स्वच्छ होतील. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी