चेहऱ्याचे सौंदर्य कमी करणाऱ्या समस्यांपैकी नाकावरील ब्लॅकहेड्स ही एक अतिशय कॉमन पण त्रासदायक समस्या आहे. त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये तेल, मळ आणि डेड स्किन साचल्यामुळे ब्लॅकहेड्स तयार होतात, विशेषतः नाकाच्या भागावर हे जास्त प्रमाणात पटकन दिसून येतात. वारंवार पार्लर ट्रीटमेंट किंवा केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा, काही घरगुती उपाय आणि नैसर्गिक फेसमास्क वापरल्यास ब्लॅकहेड्स नैसर्गिकपणे कमी करता येतात. हे उपाय केवळ सुरक्षितच नाहीत तर त्वचेला नुकसान न करता स्वच्छ, गुळगुळीत आणि तजेलदार बनवतात. चेहऱ्याची त्वचा कितीही स्वच्छ ठेवली तरी नाकावरील ब्लॅकहेड्स चे सौंदर्य बिघडवतात(best way to remove nose blackheads).
धूळ, माती, प्रदूषण, अतिरिक्त तेल आणि मृत त्वचा रोमछिद्रांमध्ये साचल्यामुळे नाकावर लहान काळे ठिपके दिसू लागतात. हे ब्लॅकहेड्स वेळेवर काढले नाहीत तर त्वचा अधिक रफ दिसू लागते आणि पिंपल्सची समस्याही वाढू शकते. काही घरगुती उपाय आणि नॅचरल ब्लॅकहेड्स रिमूव्हर फेसमास्क वापरल्यास सुरक्षित आणि त्वचेसाठी अनके फायदे मिळू शकतात. ब्लॅकहेड्स हाताने दाबून काढणे त्वचेसाठी घातक ठरू शकते, यामुळे डाग पडण्याची शक्यता असते. परंतु काही खास घरगुती 'होममेड ब्लॅकहेड्स रिमूव्हर' मास्क आहेत, जे फक्त नाकावरील त्वचाच फक्त स्वच्छ करत नाहीत, तर त्वचेची छिद्रे आतून साफ करण्यास देखील फायदेशीर ठरतात. कोणतेही साइड इफेक्ट न होता, घरच्याघरीच सहज करता येणारे हे उपाय त्वचेला खोलवर स्वच्छ करून नाकावरील ब्लॅकहेड्स कमी करण्यास मदत करतात. नाकावरील ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी घरच्याघरी करता येणारे खास उपाय आणि ब्लॅकहेड्स रिमूव्हर (how to reduce blackheads on nose) फेसमास्क कोणते ते पाहूयात.
नाकावरील ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय...
१. वाफ घेणे :- आठवड्यातून १ ते २ वेळा चेहऱ्याच्या त्वचेला वाफ दिल्यास रोमछिद्रे उघडतात आणि ब्लॅकहेड्स सैल होतात. वाफ घेतल्यानंतर हलक्या हाताने स्क्रब केल्यास ब्लॅकहेड्स सहज निघतात.
केसांसाठी आई-आजीचा सुपरहिट फॉर्म्युला! चमचाभर पावडर करेल जादू - महिन्याभरात वेणी दिसेल दुप्पट जाड...
२. साखर आणि मध स्क्रब :- एका बाऊलमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून साखर आणि मध मिसळा. नाकावर हलक्या हाताने गोलाकार मसाज करा आणि कोमट पाण्याने धुवा. हा उपाय डेड स्किन काढून ब्लॅकहेड्स कमी करतो.
३. बेकिंग सोडा आणि पाणी :- प्रत्येकी १ टेबलस्पून बेकिंग सोडा आणि थोडे पाणी घेऊन एकत्रित पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट नाकावर लावा, ५ मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करून धुवा. तेलकट त्वचेसाठी हा उपाय उपयुक्त आहे आणि ब्लॅकहेड्स देखील अगदी झटपट निघतात.
४. मुलतानी माती आणि गुलाबपाणी :- प्रत्येकी २ टेबलस्पून मुलतानी माती आणि गुलाबपाणी मिसळा. नाकावर किंवा संपूर्ण चेहऱ्यावर लावा. पूर्ण सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हा मास्क त्वचा डीप क्लीन करतो आणि ब्लॅकहेड्स कमी करतो.
५. मध आणि दालचिनी पावडर :- मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि दालचिनी त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते. १ चमचा मध आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर एकत्र करा. हे नाकावर लावून १० ते १५ मिनिटे ठेवा आणि कोमट पाण्याने धुवा. यामुळे ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत मिळते.
