Join us
Daily Top 2Weekly Top 5

काळे डाग, पिगमेंटेशन होईल कायमचे गायब! किचनमधील फक्त एकच पदार्थ असरदार - त्वचा होईल बेबी सॉफ्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2025 14:45 IST

how to reduce black spots from cheeks : how to reduce pigmentation at home : face pigmentation home remedies : त्वचेवरील काळे डाग, पिगमेंटेशन कमी करून त्वचा उजळ दिसावी म्हणून घरगुती उपाय...

चेहऱ्याचे सौंदर्य गालांवर दिसणारे काळे डाग, पिगमेंटेशन आणि त्वचेचा असमान रंग मोठा अडथळा ठरतात. आपल्या चेहऱ्याची चमक टिकवून ठेवण्यासाठी अनेकजणी खूप वेगवेगळे प्रयत्न करतात, पण अनेकदा गालांवर येणारे काळे डाग (Dark Spots) किंवा पिगमेंटेशन (Hyperpigmentation) या समस्यांमुळे चेहऱ्याची नैसर्गिक सुंदरता कुठेतरी हरवून जाते. वाढते प्रदूषण, उन्हाच्या प्रखर झळा, हार्मोनल बदल किंवा चुकीची स्किन केअर यामुळे ही समस्या अनेकींना  सतावते. अशा परिस्थितीत, महागडी क्रीम्स किंवा ट्रीटमेंट्सऐवजी स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक पदार्थांची मदत घेणे अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरू शकते. 'दालचिनी' हा असाच एक मसाल्याचा पदार्थ आहे, जो फक्त पदार्थांना चव देण्यासाठीच नाही तर त्वचेवरील पिगमेंटेशन कमी करण्यासाठीही उपयुक्त मानला जातो(how to reduce black spots from cheeks).

दालचिनीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. गालांवरील काळ्या डागांना हलके करून त्वचेला एकसमान रंग आणि तेज आणण्यासाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे. निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. नवनीत कौर भाटिया यांनी दालचिनीचा वापर करून पिगमेंटेशनची समस्या कशी दूर करू शकतो, यासाठी असरदार घरगुती (how to reduce pigmentation at home) उपाय सांगितला आहे. 

गालावरील पिगमेंटेशन किंवा काळे डाग कमी करण्यासाठी काय करायचे ? 

एका छोट्या वाटीत १ चमचा दालचिनी पावडर घ्या. त्यात थोडेसे पाणी मिसळून त्याची एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट केवळ काळ्या डागांवर किंवा पिगमेंटेशन असलेल्या त्वचेवर लावा. ती १० ते १५ मिनिटे कोरडी होऊ द्या. साध्या पाण्याने चेहरा धुवा आणि त्यानंतर हलके मॉइश्चरायझर नक्की लावा.

महागडे कुमकुमादी तेल करा घरीच! हिवाळ्यात त्वचेसाठी अमृतासमान - चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या होतील गायब... 

हा दालचिनीचा फेसपॅक वापरण्याचे फायदे... 

१. चेहऱ्यावरील काळे डाग (Dark Spots) आणि पिगमेंटेशन (Pigmentation) हलके करतो.

२. त्वचेला नैसर्गिक चमक देतो.

३. रक्ताभिसरण वाढवून त्वचेला निरोगी बनवतो.

४. रसायन-मुक्त असल्यामुळे हा एक उत्तम नैसर्गिक पर्याय आहे.

शिळ्या भातानं चमकेल त्वचा, ५ प्रकारे लावा भाताचा पॅक-काचेसारखी कोरियन त्वचा मिळण्याचा सोपा उपाय...

पिगमेंटेशन, काळे डाग कमी करण्यासाठी दालचिनी असरदार... 

दालचिनी फक्त एक मसाला नाही, तर त्वचेसाठीही ती खूप फायदेशीर मानली जाते. विशेषतः पिगमेंटेशन आणि काळ्या डागांच्या समस्येसाठी दालचिनीचा वापर करणे फायदेशीर ठरते. 

दालचिनीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करतात, ज्यामुळे पिगमेंटेशन आणि काळे डाग हळूहळू हलके होऊ लागतात.

दालचिनी त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेला अधिक ऑक्सिजन आणि पोषण मिळते आणि तिला नैसर्गिक चमक येते.

हे नैसर्गिक एक्सफोलिएटर प्रमाणे काम करते, ज्यामुळे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते.

दालचिनीच्या नियमित वापराने त्वचेचा टोन एकसमान राखण्यास मदत मिळते, ज्यामुळे पिगमेंटेशन कमी झालेले दिसते.

English
हिंदी सारांश
Web Title : Erase Dark Spots & Pigmentation: Cinnamon for Baby-Soft Skin!

Web Summary : Cinnamon, a kitchen staple, helps fade dark spots and pigmentation. Its antioxidants and antibacterial properties cleanse skin. Mix cinnamon powder with water, apply to affected areas, leave for 10-15 minutes, then rinse. Regular use improves skin tone and provides a natural glow.
टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीघरगुती उपायत्वचेची काळजी