आपल्या रोजच्या कामांमध्ये आपण एवढे जास्त अडकून गेलेलो असतो की त्वचेची काळजी घ्यायला वेळच नसतो. दिवसांतून २ ते ३ वेळा आपलं नेहमीच फेसवॉश घेऊन चेहरा धुवायचा, मॉईश्चरायजर लावायचं एवढं एकच आपलं स्किन केअर रुटीन असतं. पण ते त्वचेसाठी पुरेसं ठरत नाही. हळूहळू त्वचा टॅन व्हायला लागते. तिच्यावरचे पिगमेंटेशन, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स वाढत जातात. तसेच त्वचेचा ग्लो सुद्धा कमी होतो. आता असं काही झालं तर त्यासाठी लगेच पार्लर गाठून महागडे उपाय करण्याची गरज नसते. काही घरगुती उपाय करूनही तुम्ही त्वचेचं सौंदर्य खुलवू शकता (how to reduce black heads and white heads?). त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया..(use of masoor dal face mask for glowing skin)
पिगमेंटेशन, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स कमी करण्यासाठी घरगुती उपाय
बेसन पीठ आणि मसूर डाळीचं पीठ हे दोन पदार्थ आपल्याकडे खूप आधीपासून सौंदर्य खुलविण्यासाठी वापरले जातात. त्यांचाच वापर करून चेहऱ्यासाठी एक उत्तम दर्जाचा फेसपॅक कसा तयार करायचा ते पाहूया..
फेशियल, क्लिनअप करूनही चेहरा काळवंडलेलाच? 'या' व्हिटॅमिन्सचे पदार्थ खा, त्वचा होईल तुकतुकीत
हा उपाय करण्यासाठी आपण थोडेसे तांदूळही वापरणार आहोत. कारण सध्या कोरियन ब्यूटी ट्रेण्ड जगभर गाजत आहे आणि कोरियामध्ये तांदळाचं पाणी, तांदळाचं पीठ वापरून त्वचेवर वेगवेगळे सौंदर्योपचार केले जातात. त्यामुळे त्याचाही फायदा त्वचेसाठी कसा करून घ्यायचा ते आपण पाहणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी तांदूळ, मसूर डाळ आणि हरबरा डाळ हे सगळे पदार्थ सम प्रमाणात घ्या. यानंतर ते मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्या. आता ही पावडर एका काचेच्या एअरटाईट डब्यात भरून ठेवा.
दररोज रात्री झाेपण्यापुर्वी एका भांड्यात चमचाभर कच्चे दूध घ्या. त्यामध्ये तयार केलेली पावडर एक चमचा भिजत घाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. ५ ते ७ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. जेव्हा पेस्ट थोडी सुकत येईल तेव्हा पाण्याने धुवून टाका.
लग्नसराई स्पेशल: कमी सोन्यामध्ये येणाऱ्या नेकलेसचे नाजुक डिझाईन्स, लेकीला, सुनेला घ्या सुंदर दागिना
आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा उपाय करा. काही दिवसांतच पिगमेंटेशन, ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्स जाऊन त्वचेवर खूप छान चमक आलेली दिसेल. ज्यांची त्वचा खूप ऑईली आहे त्यांनी दुधाऐवजी गुलाब पाण्याचा वापर करावा. हा उपाय dr.sharmarobin या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
