कामाच्या धावपळीमुळे बऱ्याच जणींचं रोजच्या रोज स्वत:कडे लक्ष देणं होत नाही. त्यामुळे मग त्वचेशी, केसांशी संबंधित काही त्रास वाढत जातात. त्यापैकीच एक त्रास म्हणजे पाठीला येणारे फोडं. काही जणींच्या पाठीवर सतत फोड किंवा बारीक पुटकुळ्या आलेल्या दिसतात. काही जणींच्या पाठीवर नेहमीच पुरळ उठलेलं असतं. असा कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर पाठीला खूप खाज येते. कधी कधी तर त्यातून रक्तही येतं. शिवाय यामुळे पाठीवर काळे डाग पडतात (How To Reduce Acne And Pimples On Back?). मोठ्या गळ्याचं ब्लाऊज घालायचं तरी मग प्रश्न पडतो. हा त्रास नेमका का होतो आणि तो कसा कमी करावा, ते पाहूया..(simple trick and home remedies to get rid of acne and pimples on back)
पाठीवर वारंवार फोडं, पुरळ का येतात?
ज्यांच्या केसांमध्ये खूप कोंडा असतो, त्यांना हा त्रास नेहमीच होतो. कारण केस विंचरताना किंवा इतरवेळी केसांमधला कोंडा पाठीवर पडतो आणि त्यामुळे मग पाठीवर फोडं येतात. त्यामुळे जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर त्याचा लवकर उपाय करा.
कोंडा, पांढरे केस हे दिसतं तेवढं साधं नाही! हलक्यात घेऊ नका- बघा ही कशाची लक्षणं
जेणेकरून पाठीवरील फोडांचा त्रासही जाईल. तुमचे कपडे, जिथे झोपता ते बेडशीट, उशांच्या खोळी अस्वच्छ तर नाहीत ना, हे देखील एकदा तपासून पाहा. काही कपड्यांच्या मागे आतल्या बाजुने असणारे स्टिकर पाठीवर घासले जातात. त्याचाही त्रास होऊन त्या जागी पुरळ उठते.
पाठीवरचे पुरळ, फोडं कमी करण्यासाठी उपाय
पाठीवरचे पुरळ, फोडं कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा कडुलिंबाच्या पानाने पाठ धुवून काढा. हा उपाय करण्यासाठी कडुलिंबाची काही पाने घ्या आणि एक- दोन लीटर पाण्यात ती उकळवा. यानंतर पाणी गाळून घ्या आणि कोमट झाल्यानंतर ते पाणी पाठीवर टाकून पाठ धुवून घ्या.
चंदनाचा लेप पाठीवर लावा. यानंतर १५ ते २० मिनिटांनी पाठ धुवून टाका. चंदनामुळेही पाठीला थंड वाटेल, दाह थांबेल आणि फोडं येण्याचे प्रमाणही कमी होईल
हरबरा डाळीचे पीठ, दही आणि थोडीशी हळद हे पदार्थ कच्च्या दुधामध्ये कालवून घ्या आणि हा लेप पाठीला चोळून लावा. यामुळे पाठीवरची डेड स्किन निघून जाईल. त्यामुळेही फोडं कमी होण्यास मदत होईल.