उन्हाळ्याचे दिवस आता सुरु झाले आहेत. हळूहळू उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे जीवाची काहिली होते. नकोसा वाटणारा हा उन्हाळा (How To Remove Tan From Your Face and Skin) वेगवेगळ्या समस्या आणि शारीरिक कुरबुरी आपल्यासोबत घेऊन येतो. उन्हाळयात सगळ्यात जास्त जाणवणारी आणि कॉमन समस्या म्हणजे (2 Tips on How to Avoid Sun Tanning & Sun Damage) स्किन टॅनिंग. वारंवार प्रखर (How To Prevent Tan During Summer) सूर्यप्रकाशात गेल्याने आपली स्किन उन्हामुळे काळवंडली जाते. यामुळे पुढचे काही दिवस आपला त्वचेचा खरा (How to Remove Sun Tan from Skin Effectively) रंग गायब होऊन त्वचेवर एक प्रकारचा काळ्या रंगाचा थर जमा होतो. अशी काळवंडलेली स्किन पुन्हा पहिल्यासारखी होण्यासाठी किमान आठवडाभर तरी वाट बघावी लागते(How To Remove Tan From Your Face and Skin).
याचबरोबर, हे स्किन टॅनिंग लवकरात लवकर कमी करून आपली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी करण्यासाठी आपण अनेक उपाय करुन पाहतो. या उपायांमुळे आपल्या त्वचेवरील टॅनिंग कमी होण्यास मदत होते. परंतु हे स्किन टॅनिंग होऊच नये म्हणून आपण आधीच खबरदारी घेतली तर त्याचा आपल्याला फायदाच होतो. पण स्किन टॅनिंग होऊच नये यासाठी नेमकं काय करावं हे आपल्याला माहित नसते. परंतु अशा दोन गोष्टी आहेत की ज्यामुळे स्किन टॅनिंग होतच नाही, त्या नेमक्या कोणत्या ते पाहुयात.. स्किन टॅनिंग होऊ नये म्हणून सॅनस्क्रीन लोशन सोबतच आपण या दोन गोष्टींचा देखील वापर करु शकता.
उन्हाळयात स्किन टॅनिंग होऊ नये म्हणून वापरा या २ गोष्टी...
१. पपई जेल :- पपईचे जेल स्किन टॅनिंगची समस्या दूर ठेवण्यास अधिक फायदेशीर मानले जाते. पपई फळापासून तयार केलेलं हे जेल आपल्या त्वचेला टॅनिंग होण्यापासून रोखते. जर तुम्ही त्वचेसाठी पपई जेलचा वापर दररोज केला तर त्वचा ग्लोइंग होते तसेच त्वचेवरील काळे डाग देखील कमी होण्यास मदत होते. टॅनिंग कमी करण्यासाठी पपईच्या जेलमध्ये थोडे गुलाबपाणी मिसळून त्याचे एकत्रित मिश्रण त्वचेला लावावे. या मिश्रणाने मसाज करुन मगच घराबाहेर पडावे, यामुळे त्वचेच्या टॅनिंगची समस्या होत नाही.
मांड्यांच्या आतील भाग काळपट पडला? जाणून घ्या कारणं आणि उपाय - 'अशा' पद्धतीने घ्या त्वचेची काळजी...
उन्हाळ्यात अंगाला साबण नका लावू, ‘ही’ पावडर लावा-घामाची दुर्गंधी जाईल,डिओ-परफ्युमची गरजच नाही...
२. टी - ट्री ऑईल :- पपई जेल प्रमाणेच स्किन टॅनिंग होऊच नये यासाठी आपण टी - ट्री ऑईलचा देखील वापर करु शकतो. तुम्ही चेहऱ्याच्या त्वचेप्रमाणेच हातापायांची त्वचा देखील टॅन होऊ नये म्हणून याचा वापर करु शकता. यासाठी टी - ट्री ऑईलमध्ये गुलाबपाणी किंवा एलोवेरा जेल मिक्स करून त्यांचे एकत्रित मिश्रण त्वचेवर लावावे. या मिश्रणाने त्वचेला मसाज करून मगच घराबाहेर पडावे. टी - ट्री ऑईलमध्ये असलेल्या अँटी फंगल आणि अँटी इंफ्लेमॅट्री गुणधर्मामुळे टॅनिंग रोखण्याबरोबरच त्वचेवरील पिंपल्स देखील कमी करण्यास मदत करतात. टी - ट्री ऑईलमध्ये गुलाबपाणी किंवा एलोवेरा जेल सारखे इतर घटक पदार्थ मिक्स केल्याशिवाय चुकूनही त्वचेवर लावू नका, यामुळे त्वचेला इजा होऊ शकते.
केसांवर मेथीची जादू, सगळे विचारतील सुंदर केसांचं सिक्रेट! मेथीचे ४ उपाय, केसही म्हणतील थँक्यू!
यंदाच्या उन्हाळ्यात त्वचेचे टॅनिंग होऊ नये यासाठी, सनस्क्रीनसोबतच पपईचे जेल आणि टी - ट्री ऑईल यांसारख्या दोन नॅचरल गोष्टींची मदत घेऊ शकता.