Lokmat Sakhi >Beauty > हळदी समारंभासाठी हळद भिजवण्याची नवी ट्रिक, त्वचेची आग, जळजळ न होता - दिसेल उजळ...

हळदी समारंभासाठी हळद भिजवण्याची नवी ट्रिक, त्वचेची आग, जळजळ न होता - दिसेल उजळ...

Haldi Ceremony : Paste recipe for Indian weddings : How to prepare haldi for haldi ceremony : Haldi Ubtan Recipe for Bride & Groom : हळदी समारंभासाठी हळद भिजवताना अशा पद्धतीने भिजवा, त्वचेला मिळतील दुप्पट फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2024 14:36 IST2024-12-28T14:30:35+5:302024-12-28T14:36:23+5:30

Haldi Ceremony : Paste recipe for Indian weddings : How to prepare haldi for haldi ceremony : Haldi Ubtan Recipe for Bride & Groom : हळदी समारंभासाठी हळद भिजवताना अशा पद्धतीने भिजवा, त्वचेला मिळतील दुप्पट फायदे...

How to prepare haldi for haldi ceremony Haldi Ubtan Recipe for Bride & Groom Haldi Ceremony Paste recipe for Indian weddings | हळदी समारंभासाठी हळद भिजवण्याची नवी ट्रिक, त्वचेची आग, जळजळ न होता - दिसेल उजळ...

हळदी समारंभासाठी हळद भिजवण्याची नवी ट्रिक, त्वचेची आग, जळजळ न होता - दिसेल उजळ...

लग्नाआधीचा सर्वात महत्वाचा विधी म्हणजे (Haldi Ceremony) 'हळदी समारंभ'. हळदी समारंभाला नवरा - नवरी यांना हळद लावली जाते. हळदी समारंभ हा भारतीय विवाह विधींच्या विविधतेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. हा समारंभ विशेषतः भारतात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. हळदी समारंभाला भारतीय परंपरेनुसार   खूप महत्त्व आहे. हळद (Haldi Ubtan Recipe for Bride & Groom) ही आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या वनस्पतींपैकी एक आहे. हळदीमध्ये असलेल्या जीवाणुनाशक गुणधर्मांमुळे तिचा वापर अनेक धार्मिक विधींमध्ये केला जातो. विवाहाच्या आधी नववधू आणि वर यांच्या शरीरावर हळद (Paste recipe for Indian weddings) लावल्याने त्यांचे शरीर शुद्ध होते असे मानले जाते. तसेच, हळदीमुळे त्वचा तेजस्वी होते आणि विवाहाच्या दिवशी नववधू आणि वर अधिक सुंदर दिसतात(How to prepare haldi for haldi ceremony).

हळदी समारंभाच्या मुख्य विधीमध्ये हळदीचा लेप नववधू आणि वर यांच्या अंगावर लावला जातो. हळदीचा लेप तयार करण्यासाठी हळद, चंदन, गुलाबजल, आणि दूध यांचा वापर केला जातो. परंतु हळदीचा हा लेप लावल्याने काहीवेळा त्वचेची आग होते. याचबरोबर, काहीवेळा ही हळद त्वचेवर लावल्याने या हळदीचे पिवळे डाग त्वचेवर तसेच राहतात. यामुळे लग्नाच्या दिवशी आपला संपूर्ण लूक खराब होतो. यासाठीच हळदीच्या समारंभांसाठी हळद भिजवताना ती थोड्या वेगळ्या पद्धतीने भिजवली तर, हळद लावल्याने त्वचेची होणारी आग कमी होते किंवा हळदीचे पिवळे डाग त्वचेवर राहत नाहीत. यासाठीच हळदी समारंभासाठी हळद भिजवताना ती भिजवण्याची नवी पद्धत पाहा. 

हळदी समारंभासाठी अशी भिजवा हळद...     

साहित्य :- 

१. बॉडी लोशन - १ कप 
२. कस्तुरी हळद पावडर - २ ते ३ टेबलस्पून 
३. मुलतानी माती - २ ते ३ टेबलस्पून 
४. बेबी ऑइल - १ टेबलस्पून 
५. ऐलोवेरा जेल -  १ टेबलस्पून

वर्षानुवर्षे डोळ्यांखाली असलेले हट्टी डार्क सर्कल्स होतील गायब, आजीबाईच्या बटव्यातील पारंपरिक उपाय...


संत्री - लिंबाच्या साली फेकू नका, त्यापासून घरीच करा होममेड फेसवॉश, पैशांची बचत-स्किन दिसेल ग्लोइंग...

कृती :-

१. सगळ्यांत आधी एका बाऊलमध्ये आपल्या त्वचेला सूट होईल असे नेहमीच्या वापरातले बॉडी लोशन घ्यावे. 
२. त्यानंतर त्या बॉडी लोशनमध्ये कस्तुरी हळदी पावडर, मुलतानी माती आणि बेबी ऑइल घालावे. 
३. सगळ्यात शेवटी यात ऐलोवेरा जेल घालून सगळे घटक एकत्रित चमच्याच्या मदतीने मिसळून त्याची पातळसर पेस्ट तयार करून घ्यावी. 

अशाप्रकारे आपण ही नवी पद्धत वापरून हळदी समारंभांसाठी हळद भिजवू शकतो. अशा प्रकारे हळद भिजवल्याने त्याचे आपल्या त्वचेला अनेक फायदे मिळतात. बॉडी लोशन, बेबी ऑइल, ऐलोवेरा जेल यामुळे आपली त्वचा मॉइश्चराइज केली जाते. त्याचबरोबर कस्तुरी हळद पावडर, मुलतानी माती यामुळे त्वचेचा रंग उजळून नॅचरल ग्लो येण्यास मदत होते. हळदी समारंभासाठी अशा पद्धतीने हळद भिजवल्यास त्वचेचा होणारा दाह किंवा आग कमी होते त्याचबरोबर हळद लावल्याने त्वचेवर हळदीचे डाग देखील राहत नाही.

Web Title: How to prepare haldi for haldi ceremony Haldi Ubtan Recipe for Bride & Groom Haldi Ceremony Paste recipe for Indian weddings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.