Join us
Daily Top 2Weekly Top 5

Skin Care: घरीच तयार करा ३ प्रकारचे टोनर, फक्त १० रुपयांत चेहऱ्यावर येईल लाखमोलाचा ग्लो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2026 11:08 IST

How to Make Toner at Home: चेहऱ्यावर जर तुम्ही टोनर नियमितपणे लावलं तर त्याचा त्वचेवर खूप छान परिणाम दिसून येतो.(bridal glow toner)

ठळक मुद्देघरातलेच साहित्य वापरून अतिशय उत्तम दर्जाचे ३ वेगवेगळे टोनर घरच्याघरी कसे तयार करायचे ते पाहा..

स्किन केअर रुटीनमध्ये त्वचेला टोनर लावणे हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. पण बऱ्याच जणी तो मिस करतात. खरंतर मेकअप करण्यापुर्वी आणि रोजच नियमितपणे टोनर लावलं तर कोणत्याही कॉस्मेटिक्सचा थेट परिणाम त्वचेवर होत नाही. त्वचेला एक प्रकारचं संरक्षण मिळतं. आणि त्यामुळे मग त्वचेवर ब्रेकआऊट्स किंवा इतर कोणतंही स्किन डॅमेज होत नाही. बाजारात खूप  वेगवेगळ्या प्रकारचे टोनर मिळतात. अगदी तसाच इफेक्ट देणारे काही टोनर आपल्याला घरीही तयार करता येतात. त्यासाठी खूप पैसा खर्च करण्याची मुळीच गरज नसते (home made skin care toner). म्हणूनच आता घरातलेच साहित्य वापरून अतिशय उत्तम दर्जाचे ३ वेगवेगळे टोनर घरच्याघरी कसे तयार करायचे ते पाहा..(how to make toner at home?)

घरच्याघरी स्किन केअर टोनर कसे तयार करावे?

 

१. ब्रायडल ग्लो सिरम

१ कप पाण्यामध्ये १ टेबलस्पून रोज वॉटर आणि १ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल घाला. त्यानंतर त्यामध्ये व्हिटॅमिन ई च्या २ कॅप्सूल आणि केशराच्या २ ते ३ काड्या घाला. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि दिवसातून दोन वेळा चेहऱ्यावर मारा. काही दिवसांतच चेहऱ्यावर ब्रायडल ग्लो येईल.

 

२. व्हिटॅमिन सी सिरम

एका पातेल्यामध्ये पाव लीटर पाणी घ्या. त्यामध्ये एका संत्रीच्या सालांचे बारीक तुकडे करून घाला. हे पाणी गॅसवर गरम करायला ठेवा.

चली चली रे पतंग...!! मकर संक्रांतीला मनसोक्त करा पतंगबाजी, मिळतील ५ जबरदस्त फायदे...

५ ते ७ मिनिटे उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी थंड झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. अतिशय उत्तम दर्जाचं व्हिटॅमिन सी टोनर घरीच झालं तयार. हे टोनर १५ दिवस नियमित वापरून पाहा..

 

३. ॲक्ने फ्री सिरम

जर चेहऱ्यावर थोडे काळसर डाग, ॲक्ने असतील तर ते घालविण्यासाठीही घरच्याघरी खूप चांगलं टोनर तयार करता येतं. त्यासाठी १ कप पाणी घ्या.

महिलांनो सावधान- राग, दु:ख मनात दाबून कुढत बसणं खूपच धोक्याचं, ५ आजार लागतील मागे 

त्यामध्ये २ ते ३ लवंग क्रश करून घाला आणि एखादं तेजपान घाला. हे पाणी ५ मिनिटे चांगलं उकळून घ्या. सकाळ, संध्याकाळ चेहरा धुतल्यानंतर हे पाणी चेहऱ्यावर शिंपडा. काही दिवसांतच त्वचा छान नितळ होईल.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Make 3 types of toner at home for glowing skin.

Web Summary : Homemade toners protect skin from cosmetics, preventing breakouts. Recipes include bridal glow serum with rose water, vitamin C serum from orange peels, and acne-free serum using clove and bay leaf. Apply regularly for clear, glowing skin.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी