Lokmat Sakhi >Beauty > खोबरेल तेलात मिसळा 'हा' पदार्थ आणि सनस्क्रीन तयार, नको महागडे सनस्क्रीन - होईल पैशांची बचत...

खोबरेल तेलात मिसळा 'हा' पदार्थ आणि सनस्क्रीन तयार, नको महागडे सनस्क्रीन - होईल पैशांची बचत...

How To Make Sunscreen At Home With Coconut Oil & Aloe Vera : How To Make Sunscreen at Home : EASY Homemade NATURAL Sunscreen : How to make homemade sunscreen with aloe vera & coconut oil : महागडे सनस्क्रीन विकत घेण्यापेक्षा, खोबरेल तेलात मिसळा एक पारदर्शक पदार्थ, बघा कमाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2025 17:28 IST2025-04-29T17:14:53+5:302025-04-29T17:28:36+5:30

How To Make Sunscreen At Home With Coconut Oil & Aloe Vera : How To Make Sunscreen at Home : EASY Homemade NATURAL Sunscreen : How to make homemade sunscreen with aloe vera & coconut oil : महागडे सनस्क्रीन विकत घेण्यापेक्षा, खोबरेल तेलात मिसळा एक पारदर्शक पदार्थ, बघा कमाल!

How To Make Sunscreen At Home With Coconut Oil & Aloe Vera How To Make Sunscreen at Home How to make homemade sunscreen with aloe vera & coconut oil | खोबरेल तेलात मिसळा 'हा' पदार्थ आणि सनस्क्रीन तयार, नको महागडे सनस्क्रीन - होईल पैशांची बचत...

खोबरेल तेलात मिसळा 'हा' पदार्थ आणि सनस्क्रीन तयार, नको महागडे सनस्क्रीन - होईल पैशांची बचत...

उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. वातावरणातील वाढती उष्णता आणि गरमी यामुळे त्वचेचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. उन्हाळ्यात घराबाहेर पडताना प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून सनस्क्रीन लोशन किंवा क्रिम्स लावतो. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन फार मोठ्या प्रमाणावर (How To Make Sunscreen At Home With Coconut Oil & Aloe Vera) वापरले जाते. त्वचेला सनस्क्रीन लावल्याने सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होत नाही. जर आपण सनस्क्रीन न लावता कडक उन्हात बाहेर पडलो तर त्वचा (How To Make Sunscreen at Home) जळू शकते, सनबर्न होते किंवा टॅनिंग देखील होऊ शकते. प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्णता यामुळे त्वचेचा नैसर्गिक रंग बदलून त्वचा काळवंडली जाते, इतकेच नव्हे तर त्वचेचा नैसर्गिक पोत (EASY Homemade NATURAL Sunscreen) देखील बदलला जातो. यासाठीच, उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेण्यासाठी त्वचेला सनस्क्रीन लावणे गरजेचे असते(How to make homemade sunscreen with aloe vera & coconut oil).

या दिवसांत आपण वेगवेगळ्या प्रकारचे महागडे सनस्क्रीन लोशन आणि क्रीम्स विकत घेतो. परंतु या महागड्या सनस्क्रीनमध्ये केमिकल्सयुक्त पदार्थ आणि हानिकारक रसायनांचा वापर केलेला असतो. यामुळे त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसानच होते. यासाठी आपण घरच्याघरीच खोबरेल तेल आणि इतर काही नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने नॅचरल सनस्क्रीन अगदी मिनिटभरात तयार करु शकतो. घरच्याघरीच सनस्क्रीन तयार करण्यासाठी खोबरेल तेलात नेमका कोणता पदार्थ मिक्स करावा ते पाहा. 

घरच्याघरीच सनस्क्रीन कसे तयार करावे ? 

घरच्याघरीच सनस्क्रीन तयार करण्यासाठी तुम्हाला खोबरेल तेल आणि एलोवेरा जेल इतक्या दोनच गोष्टींची गरज लागणार आहे. सनस्क्रीन तयार करण्यासाठी  सर्वातआधी एका बाऊलमध्ये एलोवेरा जेल काढून घ्यावे. मग यात खोबरेल तेल मिक्स करावे. एलोवेरा जेल आणि खोबरेल तेल दोन्ही सम प्रमाणांत घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण एकत्रित चमच्याने फेटून घ्यावे. या मिश्रणाला जोपर्यंत एकदम क्रीम सारखे टेक्श्चर येत नाही तोपर्यंत चमच्याने हलवून फेटून घ्यावे. त्यानंतर, तयार सनस्क्रीन एका हवाबंद बाटलीत भरून स्टोअर करून ठेवावे. आपल्या गरजेनुसार आपण हे घरगुती सनस्क्रीन त्वचेला लावू शकता. 

उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी खा ५ पदार्थ , रणरणत्या उन्हाचा त्रास होणार नाही-तगमग होईल कमी...

त्वचेवर सनस्क्रीन लावताना कोणती काळजी घ्यावी ? 

१. त्वचेवर सनस्क्रीन लावताना त्याचे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते. गरजेपेक्षा कमी प्रमाणात सनस्क्रीन लावल्याने त्याचा त्वचेवर काहीच परिणाम होत नाही. याउलट जास्त सनस्क्रीन लावल्यास त्वचा खराब देखील होऊ शकते. 

२. सनस्क्रीन फक्त उन्हांत जातानाच लावले पाहिजे असे नाही. आपण घरात असताना देखील नियमितपणे त्वचेला सनस्क्रीन लावणे फायदेशीर ठरु शकते. 

३. सकाळी फक्त एकदाच त्वचेला सनस्क्रीन लावणे पुरेसे नाही, तर वारंवार सनस्क्रीन लावत राहणे आवश्यक असते. विशेषतः उन्हात बाहेर जाण्यापूर्वी २० मिनिटे आधी सनस्क्रीन लावावे.  

उन्हाळ्यांत प्या सातूच्या पीठाचे थंडगार ताक! पोटाला थंडावा आणि शरीराला तकवा देणारा सोपा पदार्थ...

४. मेकअप करत असाल तरी त्वचेला सनस्क्रीन लावणे गरजेचे असते. चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन लावावे. यानंतर पुन्हा मेकअप करावा.

५. बाहेर जास्त सूर्यप्रकाश नसला तरी त्वचेला सनस्क्रीन लावणे आवश्यक असते. त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आणि त्वचेशी संबंधित समस्या टाळण्यासाठी सनस्क्रीन लावता गरजेचे असते. 

६. फक्त चेहऱ्यावरच सनस्क्रीन लावू नका, तर हात आणि पायांना देखील सनस्क्रीन लावणे तितकेच आवश्यक असते. उन्हांत जाण्यापूर्वी चेहऱ्यासोबतच हातापायांना देखील सनस्क्रीन लावणे गरजेचे असते. 

७. उन्हात जातांना शक्यतो, संपूर्ण अंग झाकेल असे किंवा पूर्ण बाह्या असतील असे कपडे घालावेत जेणेकरून तुमची त्वचा कमीत कमी सूर्यप्रकाशात येईल.

Web Title: How To Make Sunscreen At Home With Coconut Oil & Aloe Vera How To Make Sunscreen at Home How to make homemade sunscreen with aloe vera & coconut oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.