Join us
Daily Top 2Weekly Top 5

केस कोरडे-पातळ झाले? उन्हाळ्यात हा घरगुती हेअर मास्क लावा; महिनाभरात ३ इंच वाढतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 00:31 IST

How To make Summer Special Hair Mask (How To Grow Hairs Faster, Homemade Hair Mask) : हा समर स्पेशल हेअर मास्क कसा तयार करायचा पाहूया.

आपल्या केसांवर प्रत्येक महिलेला खूप प्रेम असते. आपले केस शायनी, दाट दिसावेत असं प्रत्येकालाच वाटतं. आजकाल प्रदूषण, धूळ, मातीमुळे केसांचे आरोग्य खराब होते. अशावेळी केसांची जास्त काळजी घ्यावी लागते. काही घरगुती उपाय करून तुम्ही दाट, लांबसडक केस मिळवू शकता. हा समर स्पेशल हेअर मास्क कसा तयार करायचा पाहूया. (How To make Summer Special Hair Mask For Fast Hair growth in 1 Month)

घरगुती हेअर मास्क तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

हा खास घरगुती हेअर मास्क तयार करण्यासाठी तु्म्हाला २ इंचाचा आल्याचा तुकडा, एक छोडा कांदा, १ छोटा चमचा मोरींगा पावडर, अर्धा छोटा चमचा ऑर्गेनिक मध, चार ते पाच चमचे ऑलिव्ह ऑईल हे साहित्य लागेल.

 हा घरगुती हेअर मास्क बनवण्याची योग्य पद्धत कोणती?

 हा हेअर मास्क तयार करण्यासाठी सगळ्यात आधी कांदा साल काढून बारीक वाटून घ्या. हातानं पिळून किंवा सुती कापडात बांधून कांद्याचा रस काढून घ्या. नंतर यात मोरींगा पावडर, ऑर्गेनिक मध आणि ऑलिव्ह ऑईल मिसळा. व्यवस्थित एकजीव करून या साहित्यांची पेस्ट तयार करा. ४५ मिनिटं लावून तसंच ठेवा नंतर सौम्य शॅम्पूनं केस धुवा. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून एकदा केसांना लावा.

या हेअर मास्कमध्ये वापरलेलं  साहित्य केसांसाठी कसं फायदेशीर ठरतं? आलं- आलं स्काल्पमध्ये ब्लड फ्लो वाढवते आणि केसांच्या मुळांना मजबूत बनवते. यातील एंटी सेप्टीक गुण कोंडा कमी करतात आणि डोक्याची खाजही कमी करतात.

  कांदा- यातील सल्फर केसांना तुटण्यापासून वाचवतो.  तसंच कोलोजन वाढवून नवीन केस उगवण्यास मदत करतो. स्काल्प इन्फेक्शन आणि कोंडा दूर होऊन केसांची चमक वाढते.

 मध- मध केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करते. ज्यामुळे कोरडे केस मऊ, मुलायम आणि चमकदार बनतात.

 ऑलिव्ह ऑईल- हे तेल केसांना आतून पोषण देते. यात व्हिटामीन ई आणि ओमेगा फॅटी एसिड्स असतात जे केसांचे मॉईश्चर टिकवून ठेवतात. तसंच केसांना फाटे फुटण्याची समस्याही कमी होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Dry, Thin Hair? Use this Homemade Mask; Grow Hair Faster!

Web Summary : A homemade hair mask with ginger, onion, moringa powder, honey, and olive oil can promote hair growth. Apply for 45 minutes weekly for best results. These ingredients strengthen hair follicles, reduce dandruff, and add shine.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी