आरोग्यासोबतच सौंदर्यासाठी देखील तांदळाचा वापर करण्याची परंपरा तशी फार जुनीच आहे, विशेषतः जपान आणि कोरियातील महिलांची काचेसारखी चमकणारी त्वचा आणि लांबसडक, घनदाट केसांचे खास सिक्रेट म्हणजे तांदुळाचे पाणी...आजकाल महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये 'राइस वॉटर' आणि 'राइस क्रीम'चा वापर केला जातो, हीच क्रीम आणि केसांसाठी खास राइस वॉटर आपण अगदी घराच्या स्वयंपाकघरातील तांदळापासून सहज तयार करू शकतो. तांदळाचे पाणी हे फक्त त्वचेचा रंग उजळण्यासाठीच नाही, तर केसांच्या मजबूतीसाठी आणि नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही(how to make skin care cream using rice water).
आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या तांदुळामध्ये त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त असे अनेक पोषक घटक असतात. तांदुळाच्या पाण्याचा नियमित वापर केल्याने त्वचा मऊ, उजळ आणि ग्लोइंग दिसू लागते, तसेच केस मजबूत, चमकदार आणि निरोगी होतात. विशेष म्हणजे घरातीलच तांदुळापासून त्वचेसाठी असरदार क्रीम सहज तयार करता येते आणि त्याच तांदुळाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करून केसांची निगा देखील राखता येते. जर तुम्हालाही महागडे पार्लर ट्रीटमेंट्स टाळून घरगुती पद्धतीने सुंदर त्वचा आणि लांबसडक केस हवे असतील, तर तांदुळाचा हा उपाय नक्की करुन पाहा... तांदळाच्या पाण्याचा केसांसाठी ( how to make hair serum with rice water) योग्य वापर कसा करावा आणि घरच्याघरीच 'मॅजिकल राइस क्रीम' कशी तयार करावी ते पाहूयात...
त्वचा आणि केसांसाठी तांदुळाचे पाणी आहे वरदान...
तांदुळाच्या पाण्याचे सौंदर्यविषयक फायदे, त्वचेसाठी क्रीम कशी तयार करायची आणि केसांसाठी तांदुळाचे पाणी कसे वापरायचे याची खास सोपी पण भन्नाट ट्रिक पाहूयात. मसाला किचनच्या पूनम देवनानी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत त्वचा आणि केसांसाठी तांदुळाची क्रीम आणि तांदुळाच्या पाण्याचा वापर कसा करावा ते सांगितले आहे.
त्वचा आणि केसांसाठी तांदुळाचे पाणी कसे तयार करायचे ?
सर्वातआधी एका बाऊलमध्ये २ टेबलस्पून तांदूळ घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालून ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर या स्वच्छ धुवून घेतलेल्या तांदुळाच्या पाण्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून ३ ते ४ तासांसाठी भिजत ठेवावे. त्यानंतर चमच्याने हलकेच दाब देत हे तांदुळाचे दाणे हलकेच मॅश करून घ्यावेत तयार आहे तांदुळाचे पाणी...
या पाण्याचा त्वेचेसाठी नेमका कसा वापर करावा...(homemade rice water cream for glowing skin)
एका बाऊलमध्ये १ टेबलस्पून एलोवेरा जेल घ्यावे. त्यानंतर चमच्याच्या मदतीने गोलाकार आकारात फिरवत ही एलोवेरा जेल क्रिमी टेक्श्चर येईपर्यंत चांगली फेटून घ्यावी. त्यानंतर त्यात थोडे तांदुळाचे पाणी आणि २ व्हिटामिन 'ई' कॅप्सूल फोडून घालाव्यात. मग पुन्हा चमच्याने हलवत क्रीम नीट फेटून घ्यावी. जोपर्यंत या एलोवेरा जेलचा पारदर्शक रंग जाऊन पूर्णपणे पांढरा रंग आणि क्रिमी टेक्श्चर येत नाही तोपर्यंत क्रिम नीट फेटून घ्यावी. त्वचेसाठी तांदुळाच्या पाण्याचा वापर करून तयार केलेली क्रिम तयार आहे.
घरीच ५ रुपयांत हेअर कलर! पांढऱ्या केसांवर घरगुती रंगाची जादू - हेअर कलरिंग करणे होईल अगदी सोपे...
उरलेलं तांदुळाच पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये (rice water hair serum for hair growth) भरून स्टोअर करून ठेवावं. ते केसांवर स्प्रे करून लावावे आणि २ ते ३ तास केसांवर तसेच राहू द्यावे. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. या पाण्यांत आपण शाम्पू मिसळून देखील केसांवर लावू शकता. अशा प्रकारे आपण घरातीलच चमचाभर तांदुळाचा वापर करून त्यापासून त्वचेसाठी क्रीम आणि केसांसाठी खास हेअर ग्रोथ सिरम तयार करू शकता.
त्वचा आणि केसांसाठी तांदुळाच्या पाण्याचे फायदे...
तांदळाच्या पाण्यात असणारे घटक त्वचेचा रंग उजळण्यास आणि काळे डाग कमी करण्यास मदत करतात. हे कोलेजन वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी होतात. त्वचा अधिक तरुण दिसते. उन्हामुळे काळवंडलेली त्वचा शांत करण्यासाठी आणि दाह कमी करण्यासाठी तांदळाचे पाणी टोनर म्हणून काम करते. मोठे झालेले त्वचेचे छिद्र कमी करण्यासाठी हे एक उत्तम नैसर्गिक ॲस्ट्रिंजेंट आहे.
तांदळाच्या पाण्यात 'इनॉसिटॉल' नावाचे कार्बोहायड्रेट असते, जे खराब झालेले केस दुरुस्त करते आणि केसांच्या वाढीस वेग देते. यातील अमिनो ॲसिड केसांच्या मुळांना पोषण देते, ज्यामुळे केस गळणे कमी होते आणि ते मजबूत होतात. तांदळाच्या पाण्याने केस धुण्यामुळे केसांना एक वेगळीच चमक येते आणि केस मऊ, मुलायम होतात. केसांचा कोरडेपणा कमी झाल्यामुळे टोकांना फाटे फुटण्याची समस्या कमी होते.
Web Summary : Use rice water for radiant skin and strong hair. Create homemade cream with rice water, aloe vera gel, and vitamin E. Spray rice water for hair growth. Rice water brightens skin, reduces wrinkles, and strengthens hair.
Web Summary : दमकती त्वचा और मजबूत बालों के लिए चावल के पानी का उपयोग करें। चावल के पानी, एलोवेरा जेल और विटामिन ई के साथ घर का बना क्रीम बनाएं। बालों के विकास के लिए चावल के पानी का स्प्रे करें। चावल का पानी त्वचा को निखारता है, झुर्रियाँ कम करता है और बालों को मजबूत बनाता है।