Join us

आयुर्वेदातील पारंपरिक पद्धतीने करा तुपाचे नॅचरल मॉइश्चरायझर, हिवाळ्यात त्वचेच्या समस्या होतील दूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2025 19:25 IST

exact procedure to make Shata Dhauta Ghrita according to Ayurveda : how to make shata dhauta ghrita at home : How is Shata Dhauta Ghrita prepared : Old Remedy For Skin Shata Dhauta Ghrita : शत धौता घृत' पद्धतीने करा तुपाचे मॉइश्चरायझर, कोरडी - सोलवटलेली त्वचा देखील होईल मऊमुलायम...

हिवाळ्यात 'तूप' हे सगळ्याच दृष्टीने आपले शरीर आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी तसेच शरीराला आतून उष्णता मिळावी यासाठी तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. थंडीच्या दिवसांत खाण्यासोबतच त्वचेचा कोरडेपणा घालवून, त्वचा मऊ - मुलायम करण्यासाठी देखील तुपाचा(exact procedure to make Shata Dhauta Ghrita according to Ayurveda) वापर होतो. शक्यतो हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी पडून(How is Shata Dhauta Ghrita prepared) फुटू लागते. या दिवसांत ओठ, पायांच्या टाचा, हाताचे कोपरे आणि एकूणच (how to make shata dhauta ghrita at home) संपूर्ण त्वचा कोरडी पडते. अशा त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी तूप उपयोगी ठरते. आयुर्वेदानुसार तूप हे त्वचेसाठी एक प्रकारचे वरदानच असल्याचे म्हटले जाते. आजकाल अनेक ब्यूटी प्रॉडक्टसमध्ये किंवा आपण घरगुती फेसमास्क तयार करताना त्यात तुपाचा वापर करतो.(Old Remedy For Skin Shata Dhauta Ghrita)

थंडीच्या दिवसांत 'तूप' हे त्वचेसाठी एखाद्या नैसर्गिक मॉईश्चरायझरप्रमाणेच काम करते. आयुर्वेदात त्वचेसाठी 'तूप' वापरताना ते एका प्रकारची खास विशिष्ट प्रक्रिया करूनच वापरण्याचा सल्ला दिला जातो, ज्याला 'शत धौता घृत' असे म्हटले जाते. "शत" म्हणजे "शंभर", "धौता" म्हणजे "धुतलेले" आणि "घृत" म्हणजे "तूप." आयुर्वेदात तूप १०० वेळा धुण्याची प्रक्रिया सांगितली आहे. पाणी वारंवार मिसळून घेतल्यास शेवटी लोणीसारखी पांढरी पेस्ट तयार होते, जी पाण्यापासून वेगळी करून एका भांड्यात साठवली जाते. हीच 'शत धौता घृत' (Shata Dhauta Ghrita) या प्रक्रियेचा वापर करुन तयार केलेली तुपाची नैसर्गिक मॉइश्चरायझर क्रिम आहे. घरच्याघरीच तुपापासून नॅचरल मॉइश्चरायझर कसे तयार करायचे ते पाहूयात.      

तूप १०० वेळा धुण्याची 'शत धौता घृत' पद्धती म्हणजे नेमकं काय? 

त्वचेसाठी तुपाचा वापर फार पूर्वीपासून केला जातो आहे. आपण त्वचेच्या अनेक समस्यांसाठी तुपाचा वापर तर करतोच. प्रामुख्याने हिवाळ्यात आपण कोरड्या, भेगा पडलेल्या किंवा फुटलेल्या त्वचेसाठी तूप वापरतो. काहीवेळा आपण तूप थेट त्वचेवर लावतो, याचा फायदा तर होतोच. परंतु त्वचेवर थेट तूप लावण्यापेक्षा  आयुर्वेदात तूप १०० वेळा धुवून त्यापासून तयार होणारी पांढरी पेस्ट त्वचेसाठी वापरणे अधिक फायदेशीर ठरते, असे मानले जाते. या १०० वेळा तूप धुण्याच्या प्रक्रियेला 'शत धौता घृत' असे म्हटले जाते.

 

तूप १०० वेळा धुण्याची 'शत धौता घृत' प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला एक मोठे चांदीचे किंवा तांब्याचे ताट तसेच वाटी लागणार आहे. याचबरोबर, अस्सल घरगुती तूप आणि थंड पाणी इतके साहित्य लागणार आहे. 

आता या चांदीच्या ताटात तूप घेऊन त्यात थोडे पाणी घालून वाटीच्या पृष्ठभागाच्या मदतीने गोलाकार फिरवत तूप धुवून घ्यायचे आहे. अशाप्रकारे १०० वेळा पाणी घालून आपल्याला हे तूप स्वच्छ धुवून घ्यायचे आहे.

चेहऱ्याला बेसन लावताना दुधात कालवावे की दह्यात? बघा नक्की काय लावल्याने चमकतो चेहरा...

प्रत्येक धुण्यानंतर जास्तीचे पाणी काढून टाकायचे आहे. पाणी काढून टाकल्यानंतर पुन्हा थोडे पाणी घेऊन वाटीच्या मदतीने गोलाकार फिरवत तूप धुण्याची प्रक्रिया सुरु ठेवायची आहे. असे एकूण १०० वेळा तूप पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. जसजसे आपण तूप धुवून गोलाकार पद्धतीने फेटून घ्याल तसे तूप अधिक जास्त घट्ट आणि क्रिमी टेक्श्चरचे होईल, असे मऊमुलायम, लुसलुशीत तूप ताटाच्या कडेला साचून राहील. असे तूप चमच्याच्या मदतीने काढून एका काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवू शकता. 

शरीराप्रमाणेच केसांना द्या प्रोटीनचा खास डोस, फक्त ५ पदार्थ, करा पार्लरसारखी प्रोटीन ट्रीटमेंट घरच्याघरीच...

पार्लर कशाला ? चक्क फुगे वापरुन केस करा परफेक्ट कुरुळे, पार्लर सारखा महागडा लुक्स घरच्याघरीच...

अशाप्रकारे तुपापासून आपण घरच्याघरीच आयुर्वेदातील 'शत धौता घृत' या जुन्या पारंपरिक पद्धतीचा वापर करून नॅचरल मॉइश्चरायझर तयार करू शकतो. या घरगुती नॅचरल मॉइश्चरायझरचा वापर करून आपण हिवाळ्यात होणाऱ्या त्वचेच्या अनेक समस्या दूर ठेवू शकतो.

 

'शत धौता घृत' पद्धतीने केलेले तुपाचे मॉइश्चरायझर वापरण्याचे फायदे :- 

१. त्वचेच्या सर्वात खोल थरांपर्यंत पोहोचण्याची आणि आतून बाहेरून पोषण करण्याची क्षमता यात असते. २. त्वचेच्या सर्व सात थरांना पोषण आणि पूर्णपणे त्वचेत शोषले जाऊन त्वचेची काळजी घेते. ३. शत धौता घृतामध्ये ओमेगा - ३, फॅटी अ‍ॅसिड आणि जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के असतात जे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.  ४. 'शत धौता घृत' तुपात नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुण असतात जे त्वचेला कोमल ठेवतात आणि चेहऱ्याची चमक वाढवतात.५. हे त्वचेवर एक नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करते आणि त्वचेला अतिनील किरणांपासून कित्येक तास सुरक्षित ठेवते.६. डोळ्यांच्या सभोवतालची काळी वर्तुळे दूर करते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजी