Lokmat Sakhi >Beauty > मिठाच्या पाण्यानं चेहरा धुवा-बघा तुमच्या चेहऱ्यावरचं वाढणारं तेज! चवीपुरतं मीठ बदलून टाकेल रुप...

मिठाच्या पाण्यानं चेहरा धुवा-बघा तुमच्या चेहऱ्यावरचं वाढणारं तेज! चवीपुरतं मीठ बदलून टाकेल रुप...

washing face with salt water : benefits of washing face with salt water : salt water for face : salt water skincare : मिठाच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे आणि ते वापरण्याची योग्य पद्धत काय आहे ते पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2025 18:17 IST2025-07-19T17:51:43+5:302025-07-19T18:17:09+5:30

washing face with salt water : benefits of washing face with salt water : salt water for face : salt water skincare : मिठाच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे आणि ते वापरण्याची योग्य पद्धत काय आहे ते पाहा..

how to make salt water face cleanser at home benefits of washing face with salt water salt water for face | मिठाच्या पाण्यानं चेहरा धुवा-बघा तुमच्या चेहऱ्यावरचं वाढणारं तेज! चवीपुरतं मीठ बदलून टाकेल रुप...

मिठाच्या पाण्यानं चेहरा धुवा-बघा तुमच्या चेहऱ्यावरचं वाढणारं तेज! चवीपुरतं मीठ बदलून टाकेल रुप...

मीठ चवीनुसार...असं म्हणून आपण प्रत्येक पदार्थांत मीठ आवर्जून घालतोच. मिठाशिवाय पदार्थाला चवच येत नाही, पदार्थ अळणी - बेचव लागतो. यासाठी कोणत्याही पदार्थात मीठ घालणे गरजेचे असते. घरात सहज मिळणारं मीठ केवळ जेवणातच नव्हे, तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर ठरू शकतं. प्रत्येकीला आपण सुंदर दिसावं (how to make salt water face cleanser at home) असंच कायम वाटत, यासाठी अनेकजणी दर महिन्याला पार्लर गाठतात. पार्लर आणि स्किन केअर (washing face with salt water) प्रॉडक्ट्सवर बऱ्याचजणी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. सुंदर (salt water skincare) दिसण्यासाठी प्रत्येकवेळी पार्लरलाच (benefits of washing face with salt water) जाण्याची गरज नसते, साधेसोपे घरगुती उपाय करून देखील आपण घरच्याघरीच आपल्या त्वचेची योग्य ती काळजी घेऊ शकतो( salt water for face).

मिठामध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल आणि डीटॉक्सिफायिंग गुणधर्म त्वचेवरील धूळ, तेलकटपणा, मुरुमांचे जंतू इत्यादी सहज दूर करतात. यामुळे त्वचा केवळ स्वच्छच होत नाही, तर तिचा पोतही सुधारतो आणि नैसर्गिक तेज येतं. इतकंच नाही तर त्वचेवरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी आपण थ्रेडींग, वॅक्सिंग अशा वेदनादायी पर्यायांचा वापर करतो. परंतु त्वचेवरील अनावश्यक केस काढण्यापासून त्वचेच्या अनेक समस्यांवर मिठाचं पाणी हे वरदान ठरु शकत. मिठाच्या पाण्याने चेहरा धुतल्याचे फायदे आणि ते वापरण्याची योग्य पद्धत नेमकी काय आहे ते पाहूयात. 

mansifaceyoga या इंस्टाग्राम अकाउंटवरून मिठाच्या पाण्याचा वापर त्वचेसाठी कसा करावा आणि त्याचे फायदे नेमके काय आहेत ते पाहूयात. त्वचेसाठी खास उपाय करण्यासाठी आपल्याला पिंक सॉल्ट म्हणजेच सैंधव मीठ आणि पाणी इतक्या दोन पदार्थांची गरज लागणार आहे. पाण्यात थोड सैंधव मीठ मिसळून त्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुतल्याने, सैंधव मीठ त्वचेतील अशुद्धता दूर करण्यात, त्वचेला डीटॉक्स करण्यात आणि नैसर्गिक चमक वाढवण्यात मदत करते. 

चिमूटभर आयुर्वेदिक पावडर ताकासोबत घ्या, किंवा पदार्थांवर भुरभुरवून खा - बघा, केसगळती कशी होईल कमी...

त्वचेसाठी मिठाच्या पाण्याचा वापर नेमका कसा करावा ? 

ग्लासभर पाण्यांत चमचाभर सैंधव मीठ घालावे. चमच्याने हलवून मीठ संपूर्णपणे पाण्यांत विरघळवून घ्यावे. त्यानंतर हे मिठाचे पाणी थेट चेहऱ्यावर ओतावे आणि या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. दररोज सकाळी उठल्यावर सैंधव मिठाच्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.  

आणा बेकिंग सोडा, विसरा केसातला कोंडा! बेकिंग सोड्यासह ३ पदार्थ मिसळून केसांना लावा, कोंडा गायब...

१. चेहऱ्यावरील केसांची वाढ होते कमी :- दररोज सैंधव मीठ घालून तयार केलेल्या पाण्याने चेहरा धुतला, तर चेहऱ्यावर उगवणाऱ्या केसांची वाढ कमी होऊ शकते. त्यामुळे अनावश्यक केसांची समस्या हळूहळू कमी होण्यास मदत होते. हा एक नैसर्गिक आणि सोपा उपाय आहे, जो नियमित केल्याने चेहरा स्वच्छ दिसतो आणि चेहऱ्यावरील अनावश्यक केसांची वाढ रोखली जाते. 

२. त्वचेची छिद्र होतात स्वच्छ :- सैंधव मिठाचे पाणी त्वचेवरील छिद्र स्वच्छ करण्याचे काम करते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते. त्वचेला श्वास घेण्यास मदत करणाऱ्या या पोअर्समधून नैसर्गिक तेल (सीबम) बाहेर पडते. पोअर्स साफ असल्यास चेहऱ्यावर मुरुमांची शक्यता कमी होते आणि त्वचा निरोगी राहते.

३. डेड स्किनसाठी फायदेशीर :- सैंधव मिठाचे पाणी त्वचेवरील मृत पेशी दूर करण्यास मदत करते. हे पाणी त्वचेला नैसर्गिकरीत्या एक्सफोलिएट करते, ज्यामुळे कोणत्याही केमिकलचा वापर न करता त्वचेवर सुंदर, उजळ आणि छान लूक येतो. त्यामुळे त्वचेचा रंग खुलतो आणि नैसर्गिक उजळपणा येतो.


Web Title: how to make salt water face cleanser at home benefits of washing face with salt water salt water for face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.