Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो! तांदळाची 'मॅजिकल क्रीम', सुरकुत्या -डाग कमी, चेहरा म्हाताराही दिसणार नाही..

चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो! तांदळाची 'मॅजिकल क्रीम', सुरकुत्या -डाग कमी, चेहरा म्हाताराही दिसणार नाही..

rice cream for glowing skin: natural face glow remedies: homemade rice cream benefits: तांदळाच्या पाण्यात अनेक पोषक घटक असतात. आपण याचा वापर टोनर किंवा क्लिंजर म्हणून वापरु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2026 14:26 IST2026-02-02T14:24:30+5:302026-02-02T14:26:07+5:30

rice cream for glowing skin: natural face glow remedies: homemade rice cream benefits: तांदळाच्या पाण्यात अनेक पोषक घटक असतात. आपण याचा वापर टोनर किंवा क्लिंजर म्हणून वापरु शकतो.

how to make rice cream at home for glowing skin rice cream benefits for wrinkles and pigmentation homemade natural cream for anti aging skin rice based skincare routine for youthful face natural remedies to reduce dark spots and fine lines | चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो! तांदळाची 'मॅजिकल क्रीम', सुरकुत्या -डाग कमी, चेहरा म्हाताराही दिसणार नाही..

चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो! तांदळाची 'मॅजिकल क्रीम', सुरकुत्या -डाग कमी, चेहरा म्हाताराही दिसणार नाही..

वय वाढू लागले की, त्वचेच्या अनेक तक्रारींना सामोरे जावे लागते. अपुरी झोप, प्रदूषण, ताण यामुळे चेहऱ्यावर परिणाम होतो. जंक फूड खाणे, व्यायाम न करणे यामुळे केवळ लठ्ठपणा वाढत नाही तर या वाईट सवयींचा आपल्या त्वचेवरही नकारात्मक परिणाम होतो.(rice cream for glowing skin) चुकीच्या जीवनशैलीमुळे आपली त्वचा वयस्कर होते. ज्यामुळे अकाली सुरकुत्या आणि बारीक रेषा येऊ शकतात. हे वयानुसार कोलेजन आणि इलास्टिनचे नुकसान करते. अतिनिल किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते. (natural face glow remedies)
वयाच्या विशीतच अनेकांना चेहऱ्यावर सुरकुत्या, काळे डाग आणि निस्तेजपणा जाणवू लागतो. यावर महागड्या पार्लर ट्रीटमेंट घेण्यापेक्षा आपल्या स्वयंपाकघरातील साधी गोष्ट म्हणजे तांदूळ.(homemade rice cream benefits) तांदळाचा वापर हा फक्त भात बनवण्यासाठी नाही तर अँटी- एजिंगसाठी देखील वरदान आहे. आपल्या त्वचेचे वृद्धत्व कमी करण्यासाठी तांदळाची क्रीम लावावी लागेल. ज्यामुळे चेहऱ्याची हरवलेली चमक पुन्हा आणू शकतो. तांदळाच्या पाण्यात अनेक पोषक घटक असतात. आपण याचा वापर टोनर किंवा क्लिंजर म्हणून वापरु शकतो. 

न भिजवता, न वाटता करा जाळीदार बेन्ने डोसा; १५ मिनिटांत होईल नाश्ता, पाहा सोपी साउथ इंडियन रेसिपी

तांदळाचे क्रीम बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ, अळशीच्या बिया, गुलाब पाणी, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि कोरफडीचा गर लागेल. यासाठी आपल्याला एका भांड्यात पाणी उकळवून त्यात तांदूळ आणि अळशी घाला. हे पाणी उकळवून घ्या. पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर गाळून घ्या. नंतर यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल, कोरफडाचा गर घाला. त्यात गुलाबपाणी देखील मिसळा. रात्री झोपण्यापूर्वी हे क्रीम त्वचेला लावल्यास फायदा होतो. 

तांदळाचे पाणी हे आपल्या त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करते. यात असणारे अँटीऑक्सिडंट्स टॅनिंग कमी करण्यास आणि आपल्या त्वचेचा रंग सुधारण्याचे काम करते. त्वचेवरील ओपन पोअर्स घट्ट करण्यास मदत होते. अळशीच्या बिया आपल्या त्वचेसाठी चांगल्या असतात. यात असणारे ओमेगा-३ त्वचेला हायड्रेट ठेवण्यास आणि मुरुमे, जळजळ कमी करण्यास मदत करते. 

ही क्रीम लावण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर आणि मानेवर क्रीम लावून हलक्या हाताने ५ मिनिटे मसाज करा. रात्रभर ही क्रीम चेहऱ्यावर राहू द्या आणि सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवा. नियमित वापराने त्वचा इतकी मऊ आणि चमकदार होते की आपल्याला मेकअपची गरज उरणार नाही.
 

Web Title : चावल की क्रीम से पाएं निखरी त्वचा: झुर्रियां कम करें, युवा दिखें।

Web Summary : चावल की क्रीम से उम्र बढ़ने के लक्षणों से लड़ें! यह घरेलू उपाय झुर्रियों, काले धब्बों और सुस्ती को कम करता है। चावल, अलसी के बीज और एलोवेरा से बनी यह क्रीम रात भर त्वचा को हाइड्रेट और चमकदार बनाती है, जिससे युवा निखार आता है।

Web Title : Rice cream for glowing skin: Reduce wrinkles and look younger.

Web Summary : Fight aging with rice cream! This homemade remedy reduces wrinkles, dark spots, and dullness. Made with rice, flax seeds, and aloe vera, it hydrates and brightens skin overnight for a youthful glow.