Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलसारखा झणझणीत लसूण पनीर मसाला करा घरीच, सोपी ट्रिक, पनीर राहिल कुरकुरीत- चवीलाही मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2025 09:30 IST

Garlic Paneer Masala: Spicy Garlic Paneer: Paneer Masala recipe: लसूण पनीर मसाला कसा बनवायचा, यासाठी लागणारे साहित्य पाहूया.

पनीर हे आपल्या शरीरासाठी चांगले आहे. काहींच्या घरात आठवड्यातून एकदा तरी पनीर खाल्ले जाते. मग ती भाजी असो किंवा स्टार्ट. हॉटेलमध्ये गेल्यानंतरही अनेकदा आपण पनीरचा मेन्यू ठरवतो. (Garlic Paneer Masala) पनीरचे इतके पदार्थ असतात की आपल्याला अनेकांची नावे माहिती नसतात. कधीकधी घरी अचानक पाहुणे येतात. अशावेळी नेमकं काय बनवावं हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. (Spicy Garlic Paneer) पालक पनीर, पनीर भूर्जी, मसाला पनीरसारखे पदार्थ रोजचे. पण वेगळं आणि काही चविष्ट बनवायचे असेल तर आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो. (Restaurant style paneer recipe)अनेकदा आपल्याला हॉटेलसारखे पदार्थ घरी बनवण्याची इच्छा होते. पण बनवताना ग्रेव्ही चुकते, पातळ होते किंवा पनीर रबरासारखं होते. हॉटेलसारखा झणझणीत लसूण पनीर मसाला हा फक्त जेवणातच नाही तर पार्टी, गेट-टुगेदर किंवा लंचमध्येदेखील सुपरहिट ठरतो. भाकरी, चपाती किंवा भातासोबत याची चव दुप्पट होते. लसूण पनीर मसाला कसा बनवायचा, यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 

हिरव्या भाज्या किती वेळा धुवायला हव्या? 'या' चुका टाळा, अळ्या न कळत जातात पोटात- भाजी साफ करण्याची योग्य पद्धत

साहित्य 

लसूण पाकळ्या - १० ते १२भिजवलेली लाल मिरची - ४ ते ५मीठ - चवीनुसार कोथिंबीरचे देठ - १ चमचा पाणी - आवश्यकतेनुसार तेल - १ चमचाजिरे - १ चमचाबारीक चिरलेला कांदा - १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो - १ वाटीहळद - १ चमचा धने पावडर - १ चमचा जिरे पावडर - १ चमचा गरम मसाला - १ चमचाकोथिंबीर - १ चमचा पनीर - १ वाटी 

कृती 

1. सगळ्यात आधी पनीरचे तुकडे करुन घ्या. नंतर लाल मिरच्या पाण्यामध्ये १ तास भिजत घाला. कोथिंबीरीचे देठ बारीक चिरुन घ्या. आता एका मिक्सरच्या भांड्यात लसूण पाकळ्या, भिजवलेली लाल मिरची, मीठ, कोथिंबीरीचे देठ आणि पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट जास्त घट्ट किंवा पातळ नको असायला. 

2. यानंतर कढईत तेल गरम करुन त्यात जिरे, बारीक चिरलेला कांदा परतवून घ्या. लालसर झाल्यानंतर त्यात टोमॅटो घाला. हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि वाटलेली पेस्ट घालून मसाला तेलावर चांगला शिजू द्या. 

3. ग्रेव्हीला तेल सुटल्यानंतर थोडे पाणी घालून गरम मसाला घाला. पनीरचे तुकडे आणि वरुन कोथिंबीर घाला. वरुन झाकण ठेवून मंद आचेवर २ ते ३ मिनिटे शिजवून घ्या. ग्रेव्ही घट्ट झाल्यानंतर भात किंवा चपातीसोबत खा लसूण पनीर मसाला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Make restaurant-style garlic paneer masala at home, crispy and tasty.

Web Summary : Craving restaurant-style garlic paneer? This recipe makes it easy to create a flavorful, crispy paneer dish at home. Perfect for any meal!
टॅग्स :अन्नपाककृती