ऋतू कोणताही असला तरी संत्री ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण तिचे साल देखील आपल्या सौंदर्यासाठी वरदान मानलं जातं.(orange peel soap) आपण अनेकदा संत्री खाल्ल्यानंतर तिचं सालं कचरा समजून फेकून देतो. पण या संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि नैसर्गिक तेल असते. बाजारात मिळणारे महागडे व्हिटॅमिन-सी सिरम किंवा ग्लोइंग सोप यापासून तयार केला जातो. (homemade orange soap)महागडे पार्लर आणि क्रीमरचा वापर आपण सतत चेहऱ्यावर करतो. त्यामुळे आपल्याला कमी वयात सुरकुत्या, टॅनिंग, मुरुमांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.(natural skincare remedy) केमिकल उत्पादनांचा चेहऱ्यावर जास्त वापर झाला की, त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. आपण महागड्या फेसवॉशपेक्षा घरच्या घरी सोप्या पद्धतीने संत्र्याच्या सालीपासून साबण तयार करु शकतो. ज्यामुळे टॅनिंग आणि मुरुमे कमी होतील आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.
जाड दंडांमुळे साडी नेसली की फार बेढब दिसता? बाह्यांचे ५ डिझाईन्स पाहा, दंड दिसतील सुबक आणि स्लिम!
संत्र्याच्या सालीपासून साबण तयार करण्यासाठी आपल्याला ४ ते ५ संत्र्यांची साले, ५०० ग्रॅम साबणाचा बेस, आणि सिलिकॉन मोल्ड लागेल. संत्र्याच्या सालीपासून साबण तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी संत्री घ्यावी लागेल. त्याची साल सोलून घ्या. सालींमध्ये थोडे पाणी घाला आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चाळणीतून गाळून घ्या.
आता आपल्याला साबणाच्या बेसचे लहान तुकडे करा आणि डबल बॉयलर वापरुन ते वितळवून घ्या. साबणाचा बेस पूर्णपणे वितळला की त्यात संत्र्याच्या सालीचे मिश्रण घाला. व्यवस्थित ढवळून घ्या. हे मिश्रण सिलिकॉन मोल्डमध्ये घाला आणि अर्धा तास तसेच राहू द्या. थंड झाल्यानंतर साबण तयार होईल. सुगंधित, नैसर्गिक आणि घरगुती संत्र्याच्या सालीचा साबण तयार होईल. हा साबण आपण अंघोळीसाठी किंवा हात धुण्यासाठी वापरु शकतो. यामुळे त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही. सालीमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या उजळते. संत्र्याच्या सालीत अँटी- बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
Web Summary : Orange peels, rich in vitamin C, can be used to make soap at home. This reduces tanning, acne, and brightens skin, offering a natural skincare solution. A homemade soap recipe is provided.
Web Summary : विटामिन सी से भरपूर संतरे के छिलकों का उपयोग घर पर साबुन बनाने के लिए किया जा सकता है। यह टैनिंग, मुंहासों को कम करता है और त्वचा को निखारता है, जो एक प्राकृतिक त्वचा देखभाल समाधान प्रदान करता है। एक घरेलू साबुन बनाने की विधि दी गई है।